General Science Questions and Answers for Competitive Exams (सामान्य विज्ञान)
General Science Quiz
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.____ म्हणजे असे सर्व काही जे जागा व्यापते व ज्याला वस्तुमान असते?
-
A) द्रव्य
B) स्थायू
C) वायू
D) यापैकी नाही
2.दृढता, काठिण्यता आणि स्थिती स्थापकता हे खालीलपैकी पदार्थांचे गुणधर्म आहेत?
-
A) स्थायू
B) द्रव
C) वायू
D) वरील सर्व
3. वायूरूप पदार्थांवर दाब निर्माण केल्यास किंवा त्याचे तापमान कमी केल्यास त्यांचे आंकुचन होऊन द्रवात रूपांतर होते या गुणधर्माला _________ असे म्हणतात?
-
A) केशीकत्व क्रिया
B) संपीड्यता
C) पृष्ठताण
D) प्रवाहिता
4. इ.स. 1879 मध्ये विल्यम क्रूकस या शास्त्रज्ञाने __________या अवस्थेला रॅडियंट मॅटर असे संबोधले?
-
A) बोस-आईन्स्टाईन कंडेनसेट अवस्था
B) आयनायू अवस्था
C) संप्लवन अवस्था
D) यापैकी नाही
5.1920 मध्ये भारतीय भौतिक शास्त्रज्ञ _____________यांनी पदार्थाच्या पाचव्या अवस्थेसाठी काही गणना केल्या, त्यांचे नाव काय?
-
A) डॉ. होमीभाभा
B) डॉ. सी. व्ही. रमण
C) सत्येंद्रनाथ बोस
D) यापैकी नाही
6.___________या पदार्थांना थंड केल्यास त्याचे रूपांतर सरळ स्थायुमध्ये होते यालाच डिपॉझिशन किंवा डिसब्लिमेशन असे म्हणतात.
-
A) वायू
B) स्थायू
C) संप्लवनशील
D) यापैकी नाही
7.119 पेक्षा जास्त मूलद्रव्य ज्ञात आहेत त्यापैकी _______नसर्गिक आणि 27 कृत्रिम/ मानवनिर्मित आहेत?
-
A) 105
B) 120
C) 54
D) 92
8. __________या शास्त्रज्ञाने इ.स. 1814 मध्ये सुचविल्याप्रमाणे संज्ञांचा वापर करतात?
-
A) डाल्टन
B) बर्झेलिअस
C) लॅव्हाझुए
D) यापैकी नाही
9. जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्य निश्चित वजनी प्रमाणात आणि रासायनिक अभिक्रिया करून एकत्र येतात तेव्हा तयार होणाऱ्या नवीन पदार्थाला _____________ असे म्हणतात?
-
A) आम्लारी
B) मूलद्रव्य
C) संयुगे
D) आम्ल
10.रेणूसूत्र म्हणजे काय?
-
A) संयुगातील मूलद्रव्याच्या संज्ञा
B) अणूची संख्या
C) संयुगातील मूलद्रव्यांच्या संज्ञा व अणूची संख्या यांची एकत्रित मांडणी होय.
D) वरील सर्व बरोबर
सामान्य विज्ञान Top-10 प्रश्नांची स्पष्टीकरणांसह उत्तरे पुढील प्रमाणे
1) Correct Answer Aस्पष्टीकरण: द्रव्याला तीन भौतिक गुणधर्म असतात (स्थायू, द्रव आणि वायू) तर रासायनिक गुणधर्म हे मूलद्रव्य, सयुंगे आणि मिश्रणे हे आहते. स्थायूचे चे आणखी दोन प्रकार पडतात ज्यामध्ये स्फटिक आणि अस्फटिक. म्हणून उत्तर A बरोबर आहे.
2) Correct Answer A
स्पष्टीकरण: स्थायूचे गुणधर्म पुढीलप्रमाणे आहे ते दृढता, काठिण्यता, स्थिती स्थापकता आणि अकार्यता. काठिण्यता या गुणधर्माचे एकक म्होज प्रमाण आहे. याचा शोध 1812 मध्ये फ्रेडरिक म्हो या जर्मन शास्त्रज्ञाने लावला. अकार्यता म्हणजे मूळ रूपात न येणे. उदाहरण. काच, प्लास्टिक कणकेचा गोळा इत्यादी. 1907 मध्ये बॅकेलँड या शात्रज्ञाने बॅकेलाईट प्लास्टिक चा शोध लावला
3) Correct Answer B
स्पष्टीकरण: संपीड्यता (compressibility) हा वायूचा गुणधर्म आहे. केशिकत्व ही क्रिया जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 अंशापेक्षा कमी असेल तर पाण्याची पातळी वाढते आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 अंशापेक्षा जास्त असल्यास पातळी कमी होते. सर्व द्रव्यांचा पृष्ठताण तापमानानुसार कमी होत जातो तसेच क्रांतीक तापमानाला द्रवाचा पृष्ठताण शून्य असतो.
4) Correct Answer B
स्पष्टीकरण: आयनायू अवस्था (Palsma Ionised State) या अवस्थेचा शोध विल्यम क्रूकस या शास्त्रज्ञाने लावला. इ.स. 1928 मध्ये इर्विन लँगमुइर यांनी प्लाझ्मा हे नाव सुचवले. उदाहरण सूर्य, तारे आकाशात चमकणाऱ्या वीजा हे प्लाझ्माची उदाहरणे आहेत.
5) Correct Answer C
स्पष्टीकरण: भारतीय भौतिक शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांनी पदार्थाच्या पाचव्या अवस्थेसाठी काही गणना केल्या या आधारावर अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी 1955 मध्ये पदार्थाच्या नव्या अवस्थेबद्दल भविष्यवाणी केली. हि अवस्था म्हणजे विचारलं बोसॉन वायू परमशून्य तापमानापर्यंत म्हणजे 0 k तापमान होय.
6) Correct Answer C
7) Correct Answer D
स्पष्टीकरण: आधुनिक रसायनशास्त्राचा जनक लॅव्हाझुएच्या मते "मूलद्रव्य हा द्रव्याचा असा प्रकार आहे की, ज्याचे विभाजन रासायनिक अभिक्रियेच्या साहय्याने सध्या पदार्थामध्ये करता येत नाही" त्यानुसार 119 पेक्षा जास्त मूलद्रव्य ज्ञात आहेत. त्यापैकी 92 हे नैसर्गिक व 27 हे कृत्रिम किंवा मानवनिर्मित आहेत.
8) Correct Answer B
स्पष्टीकरण: मूलद्रव्यांना दर्शविण्यासाठी डाल्टन या शास्त्रज्ञाने चित्ररूपी संकेताचा/ वर्तुळाचा वापर करण्यासाठी सुचविले तर बर्झेलिअस या शास्त्रज्ञाने संज्ञांचा वापर करण्यासाठी सुचविले. लॅव्हाझुए या शास्त्रज्ञानाला रसायनशास्त्राचा जनक असे म्हणतात. संज्ञा म्हणजेच मूलद्रव्याच्या आद्याक्षररूपी संक्षिप्त रूप होय.
9. Correct Answer C
स्पष्टीकरण: उदाहरण : पाण्यात हायड्रोजन व ऑक्सिजन = 1 : 8 वजनी प्रमाण असते तर आकारमानांनुसार 2 :1 प्रमाण असते.
10) Correct Answer C
स्पष्टीकरण: संयुगांना दर्शविण्यासाठी रेणुसूत्रांचा उपयोग होतो आणि रेणुसूत्र म्हणजे संयुगातील मूलद्रव्यांच्या संज्ञा व अणूंची संख्या यांची एकत्रित मांडणी होय.
If You have Doubts, Please Let Me Know