Marathi Vyakaran Practice Test - मराठी व्याकरण सराव प्रश्न उत्तर | Aims Study Center

Marathi Vyakaran Practice Test- मराठी व्याकरण सराव प्रश्न उत्तर

marathi-bhasha
मराठी व्याकरण

"भाषेची देवाण-घेवाण म्हणजे भाषिक व्यवहार व्यवस्थित रितीने चालावा यासाठी काही नियम देण्यात आलेले आहेत. त्या नियमांना व्याकरण म्हणतात."
भाषा म्हणजे विचारांची देवाण-घेवाण करण्याचे साधन." भाषेचे दोन प्रकार पडतात
(१) स्वाभाविक / नैसर्गिक भाषा
(२) कृत्रिम भाषा / सांकेतिक भाषा

संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी होय. भाष - बोलणे / बोलवायचा व्यवहार होय
मराठातील पहिला शिलालेख कर्नाटक श्रावण बेळगोळे येथीलगोमटेश्वर मूर्तीखाली सापडला.
इ. स. ९८३ च्या सुमारास.एक वाक्य कोरलेले होते ते म्हणजे'

श्री चावुण्डराये कारवियले'

भाषा हा शब्द 'भाष ' धातूपासून तयार होतो.
A) श्रीसंत ज्ञानेश्वरांनी (श्री ज्ञानेश्वरी व अमृतानुभव) ग्रंथ लिहिले
B) म्हाइंभट यांनी (लीळाचरित्र ) हा आद्य ग्रंथ लिहिला .
C) आद्यकवी मुकुंदराज यांनी ( विवेकसिंधु) हा ग्रंथ लिहिला.
D) मराठी हि देवनागरी लिपी आहे. (बाळबोध लिपी)

💻Marathi Vyakaran Practice Test - मराठी व्याकरण सराव प्रश्न आणि उत्तर सराव संच

Q1 : मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत करतात?

A) मोडी
B) रोमन
C) देवनागर
D) यापैकी नाही

Q2. खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण वर्ण नाही?
A) भ
B) च
C) ढ
D) ठ

Q3. वर्णांची एकूण उच्चारस्थाने किती?
A) दोन
B) सात
C) पाच
D) नऊ

Q4. खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा.
A) इ-ए
B) अ-ई
C) आ-ऊ
D) ओ-औ

Q5.योग्य विधाने ओळखा.
A) मराठी वर्णमालेत अं, अ: ही दोन स्वरादी आहेत.
B) ॲ, ऑ यांना नवीन स्वरादी असे म्हणतात.
C) ॲ, ऑ यांही नवीन स्वरादी हिंदी भाषेतुन मराठीत समाविष्ट झालेलीआहे.
D) वरील A आणि B बरोबर

Q6.'श' हे खालीलपैकी काय आहे?
A) अर्धस्वर
B) महाप्राण
C) स्वरादी
D) उष्मे

Q7.'संदेश' या शब्दातील अनुनासिकाची योग्य फोड ओळखा.
A) सन्देश
B) संम्देश
C) सदेश
D) यापैकी नाही

Q8. खालीलपैकी द्वित असलेला शब्द ओळखा. 
A) पत्र
B) मन
C) मल्ल
D) यापैकी नाही

Q9. वाक्य म्हणजे काय?
A) अर्थहीन बोलणे
B) अर्थपूर्व बोलणे
C) शब्दांचा समूह
D) अक्षरांचा समूह

Q10.पुढीलपैकी कोणते दोन वर्ण जोडाक्षर आहेत?
A) प-फ
B) ब-भ
C) ज-झ
D) क्ष-ज्ञ

Q11. अनुनासिकाचे दुसरे नाव काय?
A) उष्मे
B) अंतस्थ व्यंजन
C) कठोरवर्ण
D) परसवर्ण

Q12.'ए-ऐ' या वर्णांचे उच्चारस्थान ओळखा.
A) तालव्य
B) कंठतालव्य
C) कंठोष्ठ्य
D) दंततालव्य

Q13) खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा.
A) घ
B) ड्
C) ज्ञ
D) व

Q14.'औ' हा कोणता स्वर आहे?
A) संयुक्त
B) दीर्घ
C) ऱ्हस्व
D) यापैकी नाही

Q15.खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. 
A) मराठी भाषेत एकूण 48 वर्ण आहेत.
B) स्पर्श व्यंजन व उष्मे यांच्या दरम्यान येणाऱ्या वर्णांनाअंतस्थ व्यंजन असे म्हणतात.
C) दोन स्वर मिळून तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर असेम्हणतात.>
D) वरील सर्व बरोबर

उत्तरे :
1 - देवनागरी
2 - च
3 - नऊ
4 - ओ-औ
5 - वरील A आणि B बरोबर
6 - उष्मे
7 - सन्देश
8 - मल्ल
9 - शब्दांचा समूह
10 - क्ष-ज्ञ
11 - अंतस्थ व्यंजन
12 - कंठतालव्य
13 - ड्
14 - दीर्घ
15 - वरील सर्व बरोबर
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng