भीमा कोरेगावच्या लढाईचा इतिहास: 1 जानेवारी 1818 तुम्हाला माहित आहे का?
भीमा कोरेगाव लढाई
भीमा कोरेगावच्या लढाईचा इतिहास:1 जानेवारी 1818 रोजी झालेल्या भीमा कोरेगावच्या लढाईत. इंग्रजांचा विजय झाला होता. तर पेशवाईचा अंत झाला होता. हे कसे झाले आणि का झाले हे या प्रस्तुत लेखात आज आपण पाहणार आहोत. आपणास माहित आहे कि, भीमा कोरेगाव दंगलीला तीन वर्ष 1 जानेवारी 2021 पूर्ण झाले आहेत. म्हणजेच भीमा कोरेगावच्या लढाईला आज 203 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने हा लेख प्रकाशित करत आहोत. या लेखामधील माहिती ही विविध इतिहासकारांचे मते आणि न्युजपपेर मधून घेतली आहे.दुसरे बाजीराव पेशवे कोण होते? दुसरे बाजीराव पेशवे हे रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा मुलगा होता. त्यांचा जन्म 10 जानेवारी 1775 मध्ये, धार येथे झाला. तर मृत्यू 28 जानेवारी 1851बिठूर येथे झाला. 2 मे 1802 ला बाजीरावांचाच दत्तक भाऊ अमृतराव पेशवेपदावर आला. सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर नाना फडणीसाने गादीवर इतर वारस बसविण्याची खटपट केली; पण ती अयशस्वी होऊन बाजीराव पेशवे गादी विराजमान झाले. बाजीराव पेशवा बनवा म्हणून फडणीसांचे कधीच एकमत झाले नाही. परंतु बाजीराव पेशवे ब्रिटिशाना जाऊन मिळाले आणि वसईच्या तहाद्वारे बाजीरावांना काही अटींच्या आधारे पेशवे पद बहाल केले.
डिसेंबर 1802 मध्ये बाजीरावाने इंग्रंजांशी वसईचा तह केला. या तहानुसार इंग्रज बाजीरावाला त्याचे पेशवेपद मिळवून देणार होते. त्या बदल्यात इंग्रजांना त्यांचे सैन्य मराठा साम्राज्यात ठेवण्याची व त्यांचे राजकीय कारभार पुण्यातून करण्याची परवानगी हवी होती. अशाप्रकारे 1803 ला बाजीराव पेशवे पदावर आले.
भीमा कोरेगाव लढाई: 1 जानेवारी 1818 :पुढे बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्यात वसईच्या तहानुसार काही अटी होत्या आणि त्या अटींचे पालन बाजीराव पेशव्यांकडून झाले नाही. इतर राज्यकर्त्यानी बाजीरावांना मदत केली नाही. हे समजताच बाजीराव पेशवे साताऱ्याच्या छत्रपतीं भेण्यास गेले. याची खबर ब्रिटिशांना लागताच जनरल जोसेफ स्मिथने पुण्यावर कब्जा केला आणि शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा झेंडा फडकवला.
पेशव्यांनी कोरेगाव गाठले. जनरल स्टोटंट 500 पायदळ, 2 तोफ आणि 200 घोडदळ घेऊन कोरेगावजवळ विराजमान झाले. कोरेगाव भीमा लढाई - 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांच्या सैनिकासमोर 12 तास अविरत लढून ब्रिटीशांना विजय मिळवून दिला. ईस्ट इंडिया कंपनीच्या दुसऱ्या बॉंबे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनने 28,000 पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला. यामध्ये केवळ 500 महार सैनिकांनी हा विजय मिळवला होता.
1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान झालेल्या युद्धात ब्रिटिशांनी विजय मिळवला होता. ईस्ट इंडिया कंपनी : ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार (अस्पृश्य) सैनिक होते. त्याकाळी भारतीय समाजातील अस्पृश्य लोकांनां महार मानण्यात येत असे.
भीमा कोरेगाव लढाई : (1 जानेवारी 1818 ) महत्त्व काय आहे? महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले. कारण ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरविण्यासाठी नव्हे तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते.
पेशव्यांची सत्तेचे मुख्य ठिकाण हे पुणे होते. त्यामुळे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे 28,000 सैन्य पुण्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज होते.
आक्रमणादरम्यान त्यांच्या समोर ब्रिटिशांच्या 'महार रेजिमेंट'चे 500 सैनिक असलेल्या सैनिकाचा समावेश होता.
पेशव्यांनी कोरेगाव जनरल जोसेफ स्मिथ यांच्यासोबत असलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यावर आक्रमणासाठी 28,000 हजार सैन्य असलेल्या सैनिकांची फौज पाठवलेली होती.
कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या तुकडीत बॉंबे नेटिव्ह इन्फन्ट्री या तुकडीत 500 महार सैनिक होते.या युद्धात महारांनी 12 तास खिंड लढवली.
'महार रेजिमेंट ' चे सैन्य आणि मराठ्यांचे सैन्य पण या युद्धात मध्ये महार रेजिमेंट ने मराठ्यांना जिंकू दिले नाही. यानतर मराठ्यांनी निर्णय बदलला आणि परतले.
या लढाईत इंग्रजांच्या 275 सैनिकांचा मृत्यू झाला. तर पेशव्यांचे 600 च्या आसपास सैनिक मृत्युमुखी पडले, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे.
सैन्यानुसार विभागणी:
ब्रिटिशांचे सैनिक :- 834 (500 पायदळ, 300 घोडदळ आणि 24 तोफा उडवणारे गोलंदाज)
पेशव्यांचे सैनिक :- 28,000 (20,000 घोडदळ 8,000 पायदळ
(जवळजवळ 28,000 सैनिकांनी लढाईत भाग घेतला नेतृत्व 2 तोफखाना प्रमुख)
सारांश:- या लढाईचे स्वरूप वेगळे होते. हे युद्ध जरी इंग्रज आणि पिशव्यांमध्ये झाले. तरी या मध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याचं बळावर पेशवाई विरुद्ध युद्ध पुकारले होते व जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते.
विजय स्तंभ कोणी उभारला: अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेचा, न्यायाच्या या लढाईत प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या काठावर कोरेगाव येथे एक भव्य क्रांती स्तंभ उभारला.
कोरगावच्या लढाईत शौर्य जागवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली. यालाच आपण विजय स्तंभ म्हणून ओळखतो.
अशाप्रकारे कोरेगाव भीमा लढाई - 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांच्या सैनिकाला 12 तास अविरत लढा देऊन ब्रिटीशांना विजय मिळून दिला. ह्या लढाईलाच भिमा कोरेगाव लढाई म्हणतात व तेथे उभारण्यात आलेल्या स्तंभाला विजय स्तंभ म्हणतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मानवंदना: ( 1 जानेवारी 1927) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत क्रांती स्तंभ भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1927 रोजी मानवंदना दिली. डॉ. बाबासाहबे आंबेडकर यांच्या या मानवंदेनंतर दरवर्षी मोठ्या संख्येने भीम अनुयायी कोरेगावातील या विजय स्तंभाला भेट देऊन आदरांजली अर्पण करतात.
अशाप्रकारे कोरेगाव भीमा लढाईला 1 जानेवारी 2021 मध्ये 203 वर्ष पूर्ण होतात. त्यामुळे 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांच्या सैनिकाला 12 तास अविरत लढा देऊन ब्रिटीशांना विजय मिळून दिला.
ह्या लढाईलाच कोरेगाव भिमा लढाई म्हणतात व तेथे उभारण्यात आलेल्या स्तंभाला विजय स्तंभ असे म्हणतात. या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी दरवर्षी मोठ्या संख्येने येऊन आदरांजली अर्पण करतात.
भीमा कोरेगाव लढाईचा संदर्भ हा खालील पुस्तकांमध्ये आढळतो: 'अ हिस्टरी ऑफ द मराठाज' - जेम्स ग्रांट डफ,
हिस्टरी ऑफ द पॉलिटिकल अँड मिलिट्री ट्रान्झॅक्शन इन इंडिया - हेन्री टी प्रिन्सेस.

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon