नीरज चोप्राने ट्रॅक आणि फिल्ड इव्हेंट प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला खेळाडू | Aims Study Center

Author
0

नीरज चोप्राने ट्रॅक आणि फिल्ड इव्हेंट प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला खेळाडू

olympic-tokyo-2020
नीरज चोप्रा

२३ वर्षीय 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा यांच्या विषयी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने माहिती. नीरज चोप्राने भालाफेक मध्ये भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. नीरजने १२१ वर्षाची प्रतीक्षा संपवली आहे. कारण भारताने नीरज चोप्राच्या रूपाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समधील पहिल्याच सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.


ब्रिटिश भारताकडून नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९०० च्या ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती. परंतु त्यांनी ब्रिटिश भारताकडून पदके जिंकली होती. त्यामुळे त्यांना आपण भारतीय आहेत असे मानू शकत नाहीत.नीरज चोप्राने ट्रॅक आणि फिल्ड इव्हेंट प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भालाफेकत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. १०० वर्षाचा ट्रॅक आणि फिल्ड इव्हेंट मधील भारताचा आतापर्यंतचा ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदकासह ॲथलेटिक्समध्ये इतिहास घडला आहे. सुमारे १३ वर्षानंतर एखाद्या भारतीय खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं.

नीरज चोप्राचे प्रशिक्षक- Uwe Hohn हे आहेत.  नीरज चोप्राची आतापर्यंतची कामगिरी पुढीलप्रमाणे आहे. 

  1. सुवर्ण पदक: २०२० टोकियो ऑलिम्पिक 
  2. सुवर्ण पदक: आशियाई खेळ २०१८ जकार्ता 
  3. सुवर्ण पदक: राष्ट्रकुल खेळ २०१८ गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया 
  4. सुवर्ण पदक: आशियाई चॅम्पियनशिप २०१७, भुवनेश्वर ओडिशा 
  5. सुवर्ण पदक: दक्षिण आशियाई खेळ २०१६, गुवाहाटी/शिलॉंग 
  6. सुवर्ण पदक: वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिप २०१६, बायडगोसझक, पोलंड 
नीरज चोप्राने पोर्तुगालमध्ये लिस्बन ॲथलेटिक्स संमेलनात पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.

पुरस्कार: 
(1) अर्जुन पुरस्कार: २०१८
(2) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार: २०२१
(3) पद्मश्री पुरस्कार: २०२२

भालाफेक नीरज चोप्राने भारताला मिळवून दिले ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्स पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक; अभिनव बिंद्रा नंतरचे हे केवळ दुसरे वैयक्तिक सुवर्ण पदक आहे. अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये (२००८) नेमबाजी या प्रकारात पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेक या इव्हेंट मध्ये सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण पदक जिंकले आहे.

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ७ पदके जिंकले आहेत. या मध्ये १ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्य पदके जिंकले आहेत. टोकियो ओलीम्पिक २०२० मध्ये पदकतालिकेत भारताचा ४८ क्रमांक लागतो. तर अमेरिका, चीन आणि जपान हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, आणि तिसऱ्या क्रमाकांवर आहेत.

भालफेकमध्ये भारताचे हे पहिलेच पदक असून ते ॲथलेटिक्समधील सुद्धा पहिलेच पदक आहे.
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)