सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर | Aims Study Center

Author
By -
1

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर

online-today-current-affairs
चालू घडामोडी 

कोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, देशाच्या पातळीवरील महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत.  कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी म्हटले की, चालू घडामोडी हा कोणत्या स्पर्धा परीक्षेचा आत्मा समजला जातो. 

आगामी होणाऱ्या 7000 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा उपयुक्त असतील अशा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. 

🔘 महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर ✓✓

प्रश्न : देशाची पहिली अंडर-२० वर्ल्ड चॅम्पियन कोण ?
उत्तर : अंतिम पंघाल 

प्रश्न : अंतिम पंघाळने बल्गेरियातील २० वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत कोणते पदक जिंकून पहिली भारतीय मल्ल ठरली आहे
उत्तर : सुवर्ण पदक 

प्रश्न : कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय परमाणू चाचणी विरोधी दिन' म्हणून साजरा केला जातो ? 
उत्तर : २९ ऑगस्ट 

प्रश्न : भारतातील पहिला वैज्ञानिक पक्षी ॲटलास कोणत्या राज्यांनी तयार केला आहे ? 
उत्तर : केरळ 

प्रश्न : केरळ राज्याच्या राज्य फुलपाखराचे नाव काय ?
उत्तर : बुधा मयुरी ( Papilio Buddha, the Malabar Banded Peacock)

प्रश्न : प्रसिद्ध लेखिका संगीता बर्वे यांना कोणत्या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार-२०२२ जाहीर झाला आहे ?
उत्तर : पियूची वही 

प्रश्न : २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधी दरम्यान आशिया कप २०२२ ( The Asia Cup 2022) चे आयोजन (Host) कोणता देश करणार आहे ?
उत्तर : युनाइटेड अरब एमिरेट्स (UAE)

प्रश्न : सध्याचे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत ? 
उत्तर : देवेंद्र फडणवीस 

प्रश्न : सध्या महाराष्ट्रात एकूण किती सायबर फॉरेन्सिक लॅब आहेत ? 
उत्तर : ३४

प्रश्न : प्रवासी भारतीय दिनाची सुरुवात भारतात कोणत्या साली करण्यात आली ?
उत्तर : २००३

#currentaffairs #currentnews #todaygk #mpsc

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!