महाराष्ट्रातील समाजसुधारक: राजर्षी छत्रपती शाहू महाराज | Aims Study Center

महाराष्ट्रातील समाजसुधारक: राजर्षी छत्रपती शाहू महाराज

rajarshi-chatrapti-shahu-maharaj
 राजर्षी छत्रपती शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज:(जन्म: २६ जून, १८७४) परिचय: आरक्षणाचे जनक, वसतीगृहाचा निर्माता, दिनदलितांचा कैवारी, लोकराजा असे ब्रिदवाली ज्यांना बोलण्यासाठी लागते ते दुसरे कोणी नसून महाराष्ट्राचे समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक अशा सर्व क्षेत्रात आदर्श कामगिरी करणारे आणि लोककल्याणासाठी शेवटच्या क्षणापर्यंत काम करणारे आणि राजकीय नेत्यांपुढे आदर्श निर्माण करणारे असे थोर समाज सुधारक म्हणून राजर्षी शाहू महाराज यांची ओळख सांगता येते.

वडील: जयसिंगराव आबासाहेब घाटगे
आई: राधाबाई
मूळनाव: यशवंतराव घाटगे
दत्तक: १७ मार्च १८८४ (चौथे शिवाजी यांची पत्नी आनंदबाई यांनी घाटगे घराण्यातील जयसिंगराव आबासाहेब घाटगे याना दत्तक घेतले. १७०८ मध्ये कोल्हापूर स्वतंत्र राज्य निर्माण झाले. पत्नी: लक्ष्मीबाई [वय ११ वर्ष] (बडोद्याचे गुणाजीराव खानविलकर यांची कन्या) विवाह: १ एप्रिल १८८१, राज्याची सूत्र: २ एप्रिल १८९४


शिक्षण: (१८८५ मध्ये राजकोट राजकुमार कॉलेज) इंग्रजांच्या राजवटीत राजे महाराजे यांच्या शिक्षणासाठी सोई सुविधा होत्या. तर राजर्षी शाहू महाराज याना दत्तक घेण्यापपूर्वीच त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ झाला होता. त्यांचे शिक्षक म्हणून कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले हे त्यांचे मुख्य शिक्षक होते. इ.स. १८८५ ते १८८९ पर्यंत महाराजांनी राजकोट येथील महाविद्यलयात शिक्षण पूर्ण केले. (प्राचार्य: मॅकनौटंन) इ.स. १८८९ ते १८९४ या काळात महाराजांचे शिक्षण धारवाड येथे झाले.(शिक्षक: सर स्टुअर्ट फ्रेझर आणि सर रघुनाथ व्यंकोजी सबनीस). इस.१८८९ मध्ये इंग्रज सरकारने महाराजांचे ट्युटर या गार्डियन म्हणू फ्रेझर याना नेमले.
 
राज्यकारभारातील सुधारणा:
१) सल्लागार मंडळ स्थापन केले, कारण पूर्वी राजप्रतिनिधी मंडळ ला दिलेले अधिकार काढून त्या ठिकाणी सल्लागार मंडळ स्थापन केले. ( मुख्य सचिव रघुनाथ सबनीस )
२) लोकांना आर्थिक फायदा व्हावा म्हणून चहा कॉफी लागवड केली .
३) अनियमित पावसामुळे नुकसान होउ नये म्हणून कृत्रिम जलसिंचन सोय केली .
४) शाहूपुरी गुळाची बाजारपेठ.
५) पहिल्यांदा प्लेगची लस टोचून घेतली व लोकांमध्ये प्लेग विषयी जागृती केली.
६. १९०६ मध्ये शाहू छत्रपती स्पिनिंग आणि विव्हिग मिलची स्थापना.
७) १९०७ मध्ये सहकारी तत्वावर कापड गिरणी सुरुवात केली.
८) १९०७ भोगावती नदीवर राधानगरी हे धरण बांधले .
९) गंगाराम कांबळे या मागासलेल्या जातीच्या व्यक्तीला शहरात हॉटेल सुरु करून दिले.
१०) आपल्या राज्यात मल्लविद्या,संगीत, नाट्य, चित्रपट, चित्रकला व कलांना आश्रय दिला.

हे पण वाचा:महाराष्ट्रातील समाजसुधारक: राजर्षी शाहू महाराज यांच्यावरील प्रश्नोत्तरे

काही मुद्दे लक्षात घेण्यासारखे:
श्री शिवाजी वैदिक विद्यालय (जुलै १९२०)

सत्यशोधक समुहाची स्थापना (१९११ ):आद्य सिद्धाराक म्हणून ओळखले जाणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापण केलेल्या सत्यशोधक समाजाची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली. कारण त्यांना समाजात वावरत असताना गोर गरीब आणि दीन दलितांच्या जीवनातील अनुभव स्वतः हा अनुभवायला मिळाले म्हणून त्यांना महात्मा ज्योतिरावांचे विचार समजले व त्यांनी सुद्धा कोल्हापुरात सत्यशोधकी समाजाची ११ जानेवारी १९११ मध्ये स्थापना केली.

अशाप्रकारे सत्यशोधक परशराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
कार्यकारी मंडळ:
अध्यक्ष: भास्करराव जाधव
उपाध्यक्ष: अण्णासाहेब लट्ठे
कार्यवाहक: हरिभाऊ चव्हाण
कोल्हापूर प्रमुख: बाबुराव कदम

आर्य समाजाची स्थापना (१९१८): स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई येथे १० एप्रिल १८७५ रोजी आर्य समाजाची स्थापना केली होती. याच धर्तीवर त्यांनी कोल्हापुरात आर्य समजाची स्थापना केली. छत्रपती शाहू महाराज हे चाणक्षय बुद्धीचे होते आणि त्यांना अभ्यासाची पण आवड होती. त्यामुळे त्यांना चांगल्या गोष्ठी पटकन लक्षात घेणे आणि त्यासाठी योग्य तो पर्याय शोधणे सहज सोपे होते. त्यामुळे त्यांनी राज्य कारभार करताना मानवता हा गुणधर्म रुजवला.


कामगार सुधारणा:
कुलकर्णी वतने नष्ट केली: सक्तीचे सार्वजनिक शिक्षण: सप्टेंबर १९१६ मध्ये सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करण्यात आला आणि शाळेत न आलेल्या पालकांच्या मुलाना प्रत्येक महिन्यास १ रुपया दंड आकारण्यात आला. आपली प्रजा ४ थी पर्यंत किमान शिकावी अशी छत्रपती शाहू महाराजांची इच्छा होती. स्त्री शिक्षणासाठी शाहू महाराजांनी स्त्री शिक्षण अधीक्षका म्हणून मिस. लिटल यांची नेमून केली. (खास अधिकारी होत्या) त्यानंतर १८९५ मध्य त्यांनी रखमाई केळकर यांची शिक्षणाधिकारी म्हणून नेमून केली. तसेच त्यांनी आपल्या विधवा सुनेला सुकवून डॉक्टर बनविले या वरून शाहू महाराजांना स्त्रीशिक्षणाविषयी तळमळ कळते.


प्राथमिक शिक्षणास प्राधान्य: उच्च व व्यवसाय शिक्षण : शाहू महाराजांनी इ.स १८५१ मध्ये कोल्हापुरात इंग्रजी शाळा सुरु केली त्या शाळेचे १८८१ मध्ये राजाराम महाविद्यालय झाले. हे महाविद्यालय आर्य समाजाकडे सोपविले.
खेडेगावात कारभार व्यवसाय व्यवस्थित चालावा यासाठी त्यांनी तलाठी शाळा सुरु केली. तलाठी या पदावर अस्पृश्यांना प्राधान्य द्यावे असाही २६ ऑगस्ट १९१९ मध्ये एक आदेश काढला.

पुढील आणखी काही महत्वाच्या सुधारणा खालिलप्रमाने: 
1) १५ सप्टेंबर १९१८ रोजी त्यांनी कुलकर्णी वतने बंद केली.
2) शाहू महाराजांचा काळात कोल्हापूर हे मल्लविद्धेचे माहेर घर होते. त्यांनी मल्लविद्धेस राजश्रय दिला.
3) १२ जुलै १९१९ रोजी कोल्हापुर इलाख्यात विवाहसंबंधी कायदा पास केला.
4) याशिवाय मुरळी, देवदासी, या भावीण या प्रकारच्या वाईट प्रथा आपल्या राज्यातून काढून टाकल्या.
5) विविध लोकांचे आश्रयदाते छत्रपती शाहू महाराज असल्यामुळे त्यांनी बालगंधर्व नारायण राजहंस व संगीतसूर्य भोसले हे महान कलावंत कोल्हापूर रंगभूमीस लाभले.


अस्पृश्यासाठी वस्तीगृह: 1) मिस क्लार्क नावाची विदुषी अस्पृश्यासाठी काम करत होती तिची आठवण समाजात राहावी म्हणून मिस क्लार्क वसतिगृह सुरु केले. 2) मराठी विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया वस्तीगृह सुरु केले. 3) १५ एप्रिल १९२० रोजी नाशिक येथे श्री. उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृह सुरु केले

महारकीच्या वतनाचा शेवट (२२ मार्च १९२०): माणगांव येथे परिषद भरवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि शाहू महाराज हे प्रमुख वक्ते होते. त्यांनी सर्व अस्पृश्य समाजातील लोकांनां आव्हान केलं की तुम्हीं वतने व बलुते यांच्या मागे न लागत ती सोडून द्यावी. कारण मला ती कमी करणे अवघड झाले आहे असे भर सभेत शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजातील लोकांना आव्हान केले. अस्पृश्यांवर लादलेली हजेरी पद्धत बंद केली. (कारण त्यांना गुन्हेगार जाती ठरवून पोलीस ठाण्यात हजेरीसाठी जावे लागत होते ).

१९५८ मध्ये संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कायदा करून शेवट केला.

बहुजन समाजाच्या उध्दारासाठी प्रत्येक विद्यार्थ्यंसाठी एक रुपय शिष्यवृत्ती सुरु केली. तसेच प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत देण्याचा कायदा केला. याशिवाय पाटील शाळा सुरु केल्या महाराजांच्या या शैक्षणिक कार्यामुळे ते बहुजनांचे उद्धारकर्ते म्हणून ओळखले जाऊ लागले.

शाहू महाराजांनी इ.स १९०१ पासून जातवार वसतिगृह सुरु करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना भारतातील वसतीगृहाचा आद्य जनक म्हणून शाहू महाराजांना ओळखले जाते. व शेवटी, ६ मे १९२२ मध्ये मृत्यूने समाजामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली.
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon