छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती (शिवजन्मोत्सव) | Aims Study Center

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारीत उपयुक्त माहिती

Raje_shivaji_maharaj
छत्रपती शिवाजी महाराज

भारतीय नौदलाचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना संबोधले जाते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी) म्हणजेच शिवजन्मोत्सव होय. मानवी मूल्यांचा चिरंतन उद्गाता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगनिर्मितीचे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अवघ्या भारतभर आणि जगातही प्रचंड उत्सहात १९ फेब्रुवारीला साजरी केली जाते. याच अनुषंगाने एम्स स्टडी सेंटरचा ब्लॉगिंग एक उपक्रम या अंकात आपण आज शिवजन्मोत्सव निमित्ताने "छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या जीवनकार्यावर आधारित आजचा अंक प्रकाशित करीत आहोत.

पूर्णनाव : शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
जन्म : १९ फेब्रुवारी १६३०, शिवनेरी किल्ला, पुणे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. (छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्मदिवस महाराष्ट्र राज्य शासनाने २००१ सालापासून शिवजयंती म्हणून साजरी करण्याचे स्वीकारले. (भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रज आल्यांनंतर ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की, भारतात ज्या महापुरुषांचा जन्म तिथीनुसार झाला त्याची जयंती तिथी नुसार साजरी करतात. ( या मध्ये तुकाराम महाराज, बसवेश्वर महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध यांचा जन्म ग्रेगरीय दिनदर्शिका लागू होण्यापूर्वी झाला आहे.)


मृत्यू: ३ एप्रिल १६८० ( रायगड किल्ला, तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुगी छत्रपती शिवाजीरानी केली त्याचे नाव रायगड असे ठेवले. शिवस्वराज्याची राजधानी म्हणून ही रायगडाला महत्त्व प्राप्त झाले आहे.)

कूळ / राजघराणे: भोसले
वडील: छ.शहाजीराजे भोसले
आई: जिजाबाई

कौटुंबिक माहिती व शहाजीराजे भोसले: शहाजीराजे भोसले हे पराक्रम युद्धप्रसंगी बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन व स्वतंत्र राजकारभार या मूलभूत गुण कौशल्य असलेले व्यक्तिमहत्व होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी दख्खमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन सत्तामध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरमधील निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्या दरम्यान बदलली पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी ठेवली.

जिजाबाई (आई) व शिवबा : जिजाबाई पुण्यात राहायला गेल्या त्यावेळी पुण्याची स्थिती फारशी चांगली नव्हती. तेव्हा बाल शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादाजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन्हा स्थापना केली. प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी छत्रपती शिवाजीराजेंना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन केले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत्या.आई जिजाऊने शिवबाला संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादी माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.

छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात अनेक नावाने ओळखले जाते. त्यांचे नावे पुढीलप्रमाणे आहेत. शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवराजे, शिवराय इत्यादी. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा केला जातो.

संघर्ष: विजापूरच्या (आजच्या कर्नाटक) आदिलशाही विरुद्ध, आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा साम्राज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीला शिवकाल असेही म्हणतात.

राजधानी : रायगड (भूगोलाच्या दृष्टीने डोंगरी किल्ला)

राज्याभिषेक: ६ जून १६७४

गनिमी कावा : भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले याचा वापर करणारे गनिमी काव्याचें तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. गनिमी कावा ही एक युद्धनीती आहे.


सैन्य: आपले वडील शहाजीराजेंकडून २००० सैन्याची तुकडी मिळाली होती. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक लाख सैनिकांचे लष्कर उभे केले. हे सर्व करीत असताना त्यांनी राजकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले.

राज्यव्याप्ती आणि संघर्ष: पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डोंगर रांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खान्देशपासून दक्षिण तंजावरपर्यंत.

चलन: होन (सुवर्ण नाणे, वजन २.७ ते २.९ ग्राम ), शिवराई

पहिली स्वारी: तोरणगडावर, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजच वय १७ वर्षे होते. म्हणजे इ.स. १६४७ मध्ये त्यांनी तोरणगड जिंकून घेतला आणि शिवस्वराज्याचे तोरणच बांधले. शिवाजी महाराजांच्या जन्माच्यावेळी तीन सत्ता होत्या. त्यामुळे शिवबाने आदिलशहाच्या ताब्यतला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. पुढील स्वाऱ्यांमध्ये कोंढाणा (सिंहगड), पुरंदर किल्ला. इ.स. १६५९ मध्ये पश्चिम घाटातील आणि कोकणातील जवळपास ४० किल्ले जिकंले. पन्हाळा जिंकून घेतला.

अफजलखान प्रकरण:

प्रतापगडाची लढाई: अफजलखानाचा वध तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतून लावले.

पावनखिंडीतील लढाई : बाजीप्रभू देशपांडे

मोगल साम्राज्याशी संघर्ष: (औरंगजेब)

सुरतेची पहिली लूट : इ.स. १६६४ मध्ये

अशाप्रकारे आपण शिवजन्मोत्सव निमित्ताने आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती निमित्ताने या लेखात थोडक्यात आढावा घेतला आहे. आपल्या मित्राला share करा.
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon