कोरेगाव भिमाची लढाई नेमकी आहे काय याबाबदल उपयुक्त माहिती
आज आपण कोरेगाव भीमा लढाई - ५०० महार सैनिकांनी २८ हजार पेशव्यांच्या सैनिकासमोर १२ तास अविरत लढून ब्रिटीशांना विजय मिळवून दिला याबद्दल माहिती घेणार आहोत. १ जानेवारी १८१८ रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान झालेल्या युद्धात ब्रिटिशांनी विजय मिळवला होता हे आपण सर्वांना माहित आहे. ईस्ट इंडिया कंपनी: ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार (अस्पृश्य) सैनिक होते. त्याकाळी भारतीय समाजातील अस्पृश्य लोकांनां महार मानण्यात येत असे.
भीमा कोरेगाव लढाई: (१ जानेवारी १८१८) - महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले. कारण ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरविण्यासाठी नव्हे तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते. पेशव्यांची सत्तेचे मुख्य ठिकाण हे पुणे होते. त्यामुळे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे २८ हजार सैन्य पुण्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज होते. आक्रमणादरम्यान त्यांच्या समोर ब्रिटिशांच्या 'महार रेजिमेंट'चे ५०० सैनिक असलेल्या सैनिकाचा समावेश होता. पेशव्यांनी कोरेगाव स्मित ईस्ट इंडिया कंपनीवर आक्रमणासाठी २८००० हजार सैन्य असलेल्या सैनिकांची फौज पाठवलेली होती. कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या तुकडीत बॉंबे नेटिव्ह इन्फन्ट्री या तुकडीत ५०० महार सैनिक होते.या युद्धात महारांनी १२ तास खिंड लढवली.'महार रेजिमेंट ' चे सैन्य आणि मराठ्यांचे सैन्य पण या युद्धात मध्ये महार रेजिमेंट ने मराठ्यांना जिंकू दिले नाही. यांनतर मराठ्यांनी निर्णय बदलला आणि परतले .या लढाईत इंग्रजांच्या २७५ सैनिकांचा मृत्यू झाला. तर पेशव्यांचे ६०० च्या आसपास सैनिक मृत्युमुखी पडले, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे.
सैन्यानुसार विभागणी: ब्रिटिशांचे सैनिक: ८३४ (५०० पायदळ, ३०० घोडदळ आणि २४ तोफा उडवणारे गोलंदाज)
पेशव्यांचे सैनिक: २८,००० (२०,००० घोडदळ ८,००० पायदळ (जवळजवळ २८,००० सैनिकांनी लढाईत भाग घेतला नेतृत्व २ तोफखाना प्रमुख)
सारांश: या लढाईचे स्वरूप वेगळे होते. हे युद्ध जरी इंग्रज आणि पिशव्यांमध्ये झाले. तरी या मध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याचं बळावर पेशवाई विरुद्ध युद्ध पुकारले होते व जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते.
विजय स्तंभ कोणी उभारला: अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेचा, न्यायाच्या या लढाईत प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या काठावर कोरेगाव येथे एक भव्य क्रांती स्तंभ उभारला. कोरगावच्या लढाईत शौर्य जागवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली. यालाच आपण विजय स्तंभ म्हणून ओळखतो.
अशाप्रकारे कोरेगाव भीमा लढाई - ५०० महार सैनिकांनी २८ हजार पेशव्यांच्या सैनिकाला १२ तास अविरत लढा देऊन ब्रिटीशांना विजय मिळून दिला. ह्या लढाईलाच भिमा कोरेगाव लढाई म्हणतात व तेथे उभारण्यात आलेल्या स्तंभाला विजय स्तंभ म्हणतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मानवंदना: ( १ जानेवारी १९२७) - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत क्रांती स्तंभ भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १९२७ रोजी मानवंदना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या मानवंदेनंतर दरवर्षी मोठ्या संख्येने भीम अनुयायी कोरेगावातील या विजय स्तंभाला भेट देऊन आदरांजली अर्पण करतात. अशाप्रकारे कोरेगाव भीमा लढाईला १ जानेवारी २०२० मध्ये २०२ वर्ष पूर्ण होतात.
ह्या लढाईलाच कोरेगाव भिमा लढाई म्हणतात व तेथे उभारण्यात आलेल्या स्तंभाला विजय स्तंभ असे म्हणतात. या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी दरवर्षी मोठ्या संख्येने येऊन आदरांजली अर्पण करतात. म्हणून आपण या लढाई बद्दल महत्वाची माहिती घेतली जी सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये विचारली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon