Dr. Babasaheb Ambedkar- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान भाग-2 | Aims Study Center

Dr. Babasaheb Ambedkar- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

bharatratna_dr_babasaheb_ambedkarमूळनाव: भीमराव रामजी सकपाळ (जन्म : १४ एप्रिल १८९१ (महू ,मध्य प्रदेश) मृत्यू: ६ डिसेंबर १९५६ )
पिता: रामजी मालोजी सकपाळ (ब्रिटिश काळात शिपाई)
माता: भीमाबाई (धर्माजी मुरबाडकर यांची कन्या)
पत्नी: रमाबाई आंबेडकर
मूळनाव: आंबवडे, दापोली (रत्नागिरी)

बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळगाव हे आंबवडे असल्यामुळे त्यांचे आडनाव आंबवडेकर झाले. शाळेत शिकत असताना तेथील कृष्णाजी केशव आंबेडकर या शिक्षकांनी त्यांचे नाव बदलून आंबेडकर असे ठेवले.
शाळेची नाव: गव्हर्नमेंट हाईस्कूल ( आताचे नाव :- प्रतापसिंह हायस्कूल )
शाळेत नाव नोंदणी दिनाक: ७ नोव्हेंबर १९०० ( आज आपण विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो )

III ) मनुस्मृतीचे दहन १९२७: अशा मनुस्मृती या धर्मग्रंथाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी दहन केले. या कृतीतून दलितांचे मनोबल अधिकच वाढले. ४ सप्टेंबर , १९२७ 'समता संघ ' ची स्थापना.

IV )अंबादेवी मंदिर सत्याग्रह: ( १३ नोव्हेंबर, १९२७ ) अमरावती येथे अंबादेवीचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह सुरु झाला. व मंदिर विश्वस्त दादासाहेव खापर्डे यांनी अस्पृश्याना मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब याना दिले.जून १९२८- मुंबई येथे सरकारी विधी महाविद्यालयात प्राध्यपक



२९ जून- १९२८ 'समता ' पाक्षिकाचा आरंभ
२३ ऑक्टोबर, १९२८ 'सायमन कमिशन 'पुढे साक्ष
१९२९ मध्ये अस्पृश्यासाठी ३३ % आरक्षण ठेवण्याबाबत मुंबई विधीमंडळात भाषण
२९ जून- १९२८ 'समता ' पाक्षिकाचा आरंभ
२३ ऑक्टोबर, १९२८ 'सायमन कमिशन 'पुढे साक्ष

पार्वती मंदिर सत्याग्रह: (१३ ऑक्टोबर, १९२९ ) पुणे

V) काळाराम मंदिर सत्याग्रह: हे मंदिर देखल अस्पृश्यासाठी खुले नव्हते. यासाठी ३ मार्च १९३० रोजी सत्याग्रहाला प्रारंभ झाला. नाशिकचा जिल्हाधिकारी गॉर्डन यांनी २ मार्च १९३० रोजी काळाराम मंदिर बंद ठेवण्याचा आदेश दिला. शेवटी अनेक संघर्षातून १९३६नंतर मंदिराचे दरवाजे अस्पृश्यासाठी काही प्रमाणात खुले केले.

२ ऑक्टोबर १९३०- लंडन येथे गोल गोलमेज परिषदेसाठी मुंबईहून रवाना.

(अ) गोलमेज परिषद: ६ एप्रिल १९३० रोजी महात्मा गांधीजीनी दांडी येथे मीठ उचलून मिठाचा सत्याग्रह केला. ही चळवळ देशात जोर धरू लागली त्यामुळे या चळवळीला शह देण्यासाठी आणि भारतातील राजकीय समस्या सोडविण्यासाठी इंग्रज सरकारने लंडन येथे १२ नोव्हेंबर १९३० रोजी पहिली परिषद बोलविली. ९ आठवडे चाललेली ही परिषद सांप्रदायिक प्रश्नावर कोणताही तोडगा निघू न शकल्याने संपुष्ठात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या गोलमेज परिषदेत अस्पृस्यांची बाजू ठामपणे मांडली.

२४ नोव्हेंबर, १९३० 'जनता ' साप्ताहिकाचा आरंभ.
१४ ऑगस्ट, १९३१ मणीभवन येथे गांधीजींसोबत पहिली भेट. (मुंबई)

(ब) दुसरी गोलमेज परिषद: ( ७ सप्टेंबर १९३१ ): ५ मार्च १९३१ च्या गांधी-आयर्विन करारानुसार परिषेदेला काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गांधीजी हजर राहिले, ही परिषद सुरु होऊन ५ दिवस झाले होते. या परिषदेत शीख, मुसलमान, हरिजन , जमीनदार, अँग्लोइंडिअन व ख्रिश्चन या प्रतिनिधींनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती परंतु निर्णय न झाल्याने ही परिषद संपुष्ठात आली. या दोन्ही परिषेदला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या हितसंबंध आणि हक्काची मागणी केली होती. याची जाणीव इंग्लंड पार्लमेंटला करून दिली होती. म्हणून १६ ऑगस्ट १९३२ ला सांप्रदायिक प्रश्ननाच्या संदर्भात आपला निर्णय जाहीर केला त्यालाच मॅकडोनाल्डचा निर्णय किंवा जातीय निवाडा म्हणतात.

या निर्याणानुसार मुसलमान,हरिजन, शीख, ख्रिश्चन, युरोपिअन व अँग्लोइंडिअन या सर्वांना अल्पसंख्याक समजून त्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची घोषणा केली.

१८ ऑगस्ट १९३२ रोजी गांधीजीनी रॅम्से मॅकडोनाल्ड यांना पत्र पाठवून कळविले की , हरिजनसाठी सरकारने जाहीर केलेला स्वतंत्र मतदारसंघाचा निर्णय रद्द न केल्यास मी आमरण उपोषण करीन. त्यानुसार त्यांनी २० सप्टेंबर १९३२ रोजी येरवाड्याच्या कारागृहात आमरण उपोषण सुरु केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी डॉ. जयकर, घनश्याम बिर्ला. चुन्नीवाल मेहता आणि राजगोपालाचारी यांच्यासमवेत २१ सप्टेंबर १९३२ रोज गांधीजींची भेट घेतली. या भेटीत बाबासाहेब व गांधीजींच्या मुंबई योजनेस मान्यता दिली. २३ सप्टेंबर १९३२ रोजी त्यांच्यात समझोता घडून आला. यालाच पुणे करार या नावाने ओळखले जाते. २५ सप्टेंबर १९३२- पुणे करारावर स्वाक्षरी.

करारातील कलमे :
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यासांठी स्वतंत्र मतदार संघाचा करावा
२) संयुक्त मतदारसंघाचा स्वीकार करावा.
३) हरिजनांसाठी १४८ राखीव ठेवण्यात आल्या.
४) केंद्रात १८ % जागा राखीव ठेवण्यात आल्या. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी महात्मा गांधींजीनी प्रयत्न करण्याचे मान्य केले.
५) परंतु हा पुणे करार दलितांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणारा ठरला असे म्हणता येईल.
२६ नोव्हेंबर, १९३१ - गांधी-आंबेडकर-पंचम जॉर्ज यांची भेट.

(क) औरंगाबाद येथील बैठी सभा: १५ ऑक्टोबर १९३३ (औरंगाबाद सदिच्छाभेट )
दलित प्रबोधनासाठी डॉ. बाबासाहेबांनी घेतलेली ही बैठी सभा मराठवाड्यातील पहिलीच सभा आहे.
२७ मे, १९३५ पत्नी रमाबाई याचे निधन.
२ जून, १९३५ मुंबई, विधी महाविदयालयात प्राचार्य पदावर नियुक्ती.
१३ ऑक्टोबर, १९३५ येवला- 'हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मारणार नाही. ' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा.
मे, १९३५' जातिप्रथेचे उन्मूलन' भाषण प्रकशित.
३१ मे, १९३६ ' मुक्ती कोण पथे ' विख्यात भाषण, मुंबई.
१५ ऑगस्ट, १९३६ स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.
१७ सप्टेंबर, १९३७ मुंबई असेम्बली निवडणूक, डॉ. बाबासाहेब आंबडेकर विजयी.

(ड) महार वतन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर:
महार हे गावाचे वतनदार होते. गावाचे वतनदार असेल तरी त्यांना सरकारचे आणि जनतेची विविध प्रकारची कामे करावी लागत होती. कामामध्ये टाळाटाळ केल्यास त्यांना बाली ठरवले जात होते. थोडक्यात महारांचे जीवन शून्य झाले होते. वतनाच्या लालसेपोटी महार सर्वस्वी परावलंबी झाले होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महार वर्तनाला विरोध केला. त्यांनी १७ सप्टेंबर १९३७ रोजी मुंबई विधानसभेत महारांच्या वंशपरंपरागत हुद्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली.

१) सरकाने काढून घेतलेल्या महारांच्या जमिनी कॉलेक्टरने परत मिळवून द्याव्या.
२) महारांच्या सरकारी कामाची यादी जाहीर करावी.
३) महारांच्या सरकारी कामाचा पगार सरकारी तिजोरीतून द्यावा.
४) महार वतनामुळे ते उच्चवर्णीयांचे गुलाम बनले आहेत.
(शेवटी १९५८ मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी एक कायदा करून महाराष्ट्रातील महारांच्या वतनाचा शेवट केला )

(ई )मक्रणपूर परिषद: १९३८ औरंगाबाद येथे दलित परिषद चर्चा होती परंतु निजाम सरकाने परवानगी न दिल्यामुळे डॉ. आंबेडकरांनी जळगाव खान्देश जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मक्रणपूर या ठिकाणी सभा ३० डिसेंबर १९३८ रोजी घेतली. या सभेत हैद्राबाद संस्थानामधील दलितांच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थितीवर प्रकाश टाकून त्यांनी निझाम सरकारच्या प्रश्नावर प्रखर टीका केली.

(फ) तडवळे ढोकी परिषद १९४१: २३ फेब्रुवारी १९४१ रोजी मोगलाई मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील महार-मांग वतनदार परिषद सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातील तडवळे (ढोकी) येथे पार पडली. ही शैक्षणिक परिषद होती. निजाम सरकाने राज्यातील अस्पृश्य दलितांना योग्य तो न्याय द्यावा त्याचे दुःख दूर करावे अशी अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निजाम सरकारला केली.

(ग) स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना: (१५ ऑगस्ट, १९३६ )
पुणे करारानंतर तिसरी गोलमेज परिषद घडून आली. या गोलमेजपरिषदेत तडजोडीचा मार्ग निघाला. यातूनच १९३५ च्या कायद्याला अनुसरून घटकराज्यांना स्वायत्ता दिली गेली. या प्रांतामध्ये स्वतंत्र निवडणूक होणार होत्या या निवडणुकीत डॉ. आंबेडकरांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यासाठी १५ ऑगस्ट १९३६ ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. डॉ, बाबासाहेब या पक्षाचे अध्यक्ष व खजिनदार होते. जनता हे या पक्षाचे मुखपत्र होते.

कबाडकष्ट करणाऱ्या वर्गाचे हिट पहाणे हे या पक्षाचे ध्येय होते. पक्षाचे दरवाजे सर्व जनतेला खुले होते. इ. स.१९३७ मध्ये मुंबई प्रांताच्या निवडणूका या पक्षाने लढवल्या. या निवडणुकीत भायखळा-परळ या राखीव जागेवर डॉ. बाबासाहेब निवडून आले .
वऱ्हाड प्रांतामध्ये १५ पैकी ५ जागा आणि मुंबई कायदेमंडळात १५ पैकी ११ जागा स्वतंत्र मजूर पक्षाने जिंकल्या होत्या. या पक्षाच्या विजयी उमेदवार स्पृश्य होते. इ.स १९३७ ते इ.स १९३९ या काळात स्वतंत्र मजूर पक्षाच्या आमदारांनी मुंबई कायदे मंडळात उत्कृष्टपणे काम केले.

डॉ. बाबासाहेबांनी १७ सप्टेंबर १९३७ रोजी होती पद्धत व महार वतन नष्ट करण्यासंबंधीचे विधेयक मुंबई कायदेमंडळात मांडले . शेतकरी व कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न स्वतंत्र मजूर पक्षाने केला. एप्रिल १९४२ मध्ये हा पक्ष विसर्जित करुन अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडेरेशनची स्थापना करण्यात आली.


>१७ फेब्रुवारी, १९३७ मुबई असेंबली निवडूक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी.
>१७ सप्टेंबर, १९३७ कोकणातील 'खोती ' नष्ट करण्याकरिता , मुंबई विधिमंडळात बिल मांडले.
>४ जानेवारी, १९३८ पंढरपूर, मातंग परिषदेत मानपत्र अर्पण.
>१२-१३, फेब्रु. १९३८ मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगार परिषद.
>मे, १९३८ मध्ये मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा राजीनामा .
>७ नोव्हेंबर, १९३८स्वतंत्र मजूर पक्षातर्फे सत्याग्रह.
>जानेवारी, १९३९ महाड शेतकरी परिषेदेचे अध्यक्षपद - काँग्रेसच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका.
>२२ जून, १९४० मुंबई सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत भेट.
>१९४०- 'थॉटस ऑन पकिस्तान ' ग्रंथाचे प्रकाशन

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng