चालू घडामोडी - Current Affairs In Marathi -April 2021
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
१. भारतीय केंद्रिय अर्थसंकल्प संसदेत १ फेब्रुवारी २०२० ला खालीलपैकी कोणत्या अर्थमंत्र्यांनी मांडला ?
१. निर्मला सीतारामन✔️✔️
२. इंदिरा गांधी
३. डॉ. मनमोहनसिंग
४. अरुण जेटली
२. महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून खालील पर्याय मधून कोणी शपथ घेतली व केव्हा?
१. देवेंद्र फडणवीस- (२३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९)
२. पृथ्वीराज चव्हाण- ( ११ नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४)
३. अशोक चव्हाण- ( ७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१०)
४. उद्धव ठाकरे- ( २८ नोव्हेंबर २०१९ ते आतापर्यंत )✔️✔️
३. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिला निर्णय कोणता घेतला ?
१. रायगड संवर्धन आणि परिसर विकास✔️✔️
२. म. जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
३. दहा रुपयात शिवभोजन
४. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट
४. महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळेस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली?
१. एक वेळा
२. दोन वेळा
३. तीन वेळा✔️✔️
४. दहा वेळा
५. सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आली?
१. ओडिसा.
२. उत्तर प्रदेश
३. पंजाब
४. मणिपूर ✔️✔️
सराव प्रश्न संच. २: उत्तरे आणि स्पष्टीकरणसहितप्रश्न
१) उत्तर: निर्मला सीतारामन
स्पष्टीकरण:
अ) निर्मला सीतारामन: मात्र निर्मला सीतारमन यांना पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री ठरण्याचा मान मिळाला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.
ब) इंदिरा गांधी:1969 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आणि त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री झाल्या.
क) डॉ. मनमोहनसिंग: डॉ. मनमोहनसिंग यांना सहा वेळा बजेट मांडण्याची संधी मिळाली.
ड) अरुण जेटली: माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 5 वेळा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला
प्रश्न २) उत्तर: उद्धव ठाकरे
अधिक माहिती :
अ) देवेंद्र फडणवीस ( २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ ,पूर्वी ३१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०१९)
ब) पृथ्वीराज चव्हाण ( ११ नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४)
क) अशोक चव्हाण ( ७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१०)
ड) उद्धव ठाकरे ( २८ नोव्हेंबर २०१९ ते आतापर्यंत )
प्रश्न ३) उत्तर: रायगड संवर्धन आणि परिसर विकास
स्पष्टीकरण:
अ) रायगड संवर्धन आणि परिसर विकास ( पहिला - महाविकास आघाडी )
ब) म. जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ( दुसरा -महाविकास आघाडी )
क) दहा रुपयात शिवभोजन ( तिसरा- महाविकास आघाडी )
ड) २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट ( केंद्र सरकार
प्रश्न ४) उत्तर: तीन वेळा
स्पष्टीकरण:
अ) एक वेळा:पहिल्यांदा : १९८० मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली
कालावधी: ( १७ फेब्रुवारी १९८० ते ९ जून १९८० पर्यंत )
दिवस: ११२ दिवस
ब) दोन वेळा: दुसऱ्यांदा : २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी
राष्ट्रपती काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिल्यामुळे. राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण सरकार अल्प मतात आले
दिवस: ३२ दिवसांसाठी
कालावधी: २ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
क) तीन वेळा: तिसऱ्यांदा : १२ नोव्हेंबर २०१९ ते २३ नोव्हेंबर २०१९
ड) दहा वेळा:१० वेळा : सार्वधिक वेळा मणिपूर राज्यात लावण्यात आली .
प्रश्न ५) उत्तर: मणिपूर
स्पष्टीकरण :
अ) ओडिसा. ( ६ वेळा )
ब) उत्तर प्रदेश (९ वेळा )
क) पंजाब ( ८ वेळा)
ड) मणिपूर (१०
If You have Doubts, Please Let Me Know