इरफान खान: निधनवार्ता -चालू घडामोडी | irrfan-khan-passed-away | Aims Study Center

इरफान खान: निधनवार्ता- चालू घडामोडी मराठी-Irrfan-khan-passed-away

irrfan-khan
इरफान खान उर्फ साहबजादे इरफान खान (जन्म : जयपूर, ७ जानेवारी १९६७; मृत्यू : मुंबई, २९ एप्रिल २०२०) हा एक हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांत, नाटकात तसेच दूरचित्रवाणीवर काम करणारा भारतीय अभिनेता होता.
एम.ए. करत असताना त्याला दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची शिष्यवृत्ती मिळाली.
नेमसेक, स्लमडॉग मिलेनियरर या इंग्रजी व पानसिंग तोमर, मकबूल या चित्रपटांतील कामामुळे प्रकाशझोतात आला.

 इरफान खानचे प्रमुख हिंदी/इंग्रजी चित्रपट
  1. ॲसिड फॅक्टरी (इंग्रजी)
  2. एक डॉक्टर की मौत
  3. ज्युरासिक वर्ल्ड (इंग्रजी)
  4. द अमेझिंग स्पायडरमॅन (इंग्रजी)
  5. द वॉंरियर (इंग्रजी)
  6. नेमसेक (इंग्रजी)
  7. पानसिंग तोमर
  8. मकबूल
  9. रोग
  10. रोड टु लडाख (लघुपट)
  11. लाईफ ऑफ पाय (इंग्रजी)
  12. लाईफ इन मेट्रो (इंग्रजी)
  13. सच अ लॉंग जर्नी (इंग्रजी)
  14. सलाम बॉंबे
  15. स्लमडॉग मिलेनियर (इंग्रजी)
  16. हासिल
दूरचित्रवाणी मालिका
  1. चंद्रकांता
  2. चाणक्य
  3. डर
  4. भारत एक खोज
  5. द ग्रेट मराठा (रोहिला सरदार नजीब-उद-दौलाच्या भूमिकेत)
जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान खान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला होता.

लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या.
इरफान खानने मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं.

त्याने सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. २०१९ मध्ये परतल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खानचं कौतुक करण्यात आलं होतं.

१३ मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ६ एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला. ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली.
कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.


निधन:-

आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे निधन झाले. ५४ व्या वर्षी इरफानने जगाचा निरोप घेतला.
इरफानला २८ एप्रिल २०२० ला संध्याकाळी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते.
२९ एप्रिल ला सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भारतीय सिनेमासृष्टीने एक मोलाचा हिरा गमावला अशी हळहळ बॉलीवूड मधल्या अनेक दिग्गज अभिनेत्यांनी व्यक्त केली. भारत सरकार आणि राजकीय नेते यांनी इरफानच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon