UNESCO World Heritage Sites of India: भारतातील जागतिक वारसा स्थळे यादी
UNESCO World Heritage Sites of India(Photo: Wikipedia)
वर्ष 2024 मध्ये, भारतातील मोईदाम्स (आसाम) या स्थळाला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झाला आहे. 2023 मध्ये भारतातातील शांतिनिकेतन (पश्चिम बंगाल) आणि होईसळेश्वर मंदिर (कर्नाटक) या दोन ठिकाणांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. गुजरातचे हडप्पा काळातील शहर धोलवीराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत भारतातील एकूण 43 स्थळांचा समावेश जागतिक वारसात झाला आहे. गुजरातमध्ये या आधी पावागढजवळ चंपानेर, पाटणमध्ये राणी की वाव आणि अहमदाबाद, धोलावीरा, या स्थळांचा समावेश होता. धोलावीरा हे जगातील पहिलं प्राचीन महानगर समजले जाते.
भारतातील अलीकडील काळात जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त होणारे ठिकाणे: वर्ष 2024 मध्ये, भारतातील मोईदाम्स (आसाम) या स्थळाला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झाला आहे. 2023 मध्ये भारतातातील शांतिनिकेतन (पश्चिम बंगाल) आणि होईसळेश्वर मंदिर (कर्नाटक) या दोन ठिकाणांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. 13 व्या शतकातील अभियांत्रिकी चमत्कारीत काकतीय रुद्रेश्वर, (रामप्पा) मंदिर 2019 च्या जागतिक वारसा साईट टॅगसाठी एकमेव नामांकन म्हणून प्रस्तावित केलेले मंदिर होते. काकतीय रुद्रेश्वर, (रामप्पा) मंदिर या मंदिराला 25 जुलै 2021 रोजी झालेल्या अधिवेशनात 39 वे भारताचे जागतिक वारसा स्थान म्हणून मान्यता मिळाली आहे. (List of UNESCO World Heritage Sites of India). जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये वारसा स्थळांच्या संख्येनुसार (43) भारताचा जगात सहावा क्रमांक लागतो. जगामध्ये सर्वाधिक वारसा स्थळे इटली(60) आणि चीन मध्ये (57), त्यानंतरचा क्रमांक जर्मनी (52), फ्रांस (52) आणि स्पेन असा अनुक्रमे वारसा स्थळांच्या संख्येनुसार लागतो.
UNESCO: संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था (United Nations Educational, Scientific and Cultural Organization). स्थापना: 16 नोव्हेंबर 1945 (मुख्यालय- पॅरिस)
जागतिक वारसा दिन:(World Heritage Day) दरवर्षी जगभरात 18 एप्रिल रोजी "जागतिक वारसा दिन", ज्याला आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळ दिन असेही ओळखले जाते. जगातील निवडक वारसा स्थळांचा सुवर्ण इतिहास आणि बांधकाम जतन करण्यासाठी दरवर्षी 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 1982 पासून जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. 1982 मध्ये स्मारक आणि स्थळे यावरील आंतरराष्ट्रीय परिषद (ICOMOS) यांनी 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन म्हणून घोषित केले आहे. दरवर्षी ICOMOS जागतिक वारसा दिनाची एक थीम सेट करते. जागतिक वारसा दिन 2025 (World Heritage Day 2025 Theme)ची थिम: Complex Past, Diverse Future ही होती. जागतिक वारसा दिन 2022 (World Heritage Day 2022 Theme)ची थीम: "वारसा आणि हवामान" ही आहे. जागतिक वारसा दिन 2023 (World Heritage Day 2023 Theme)ची थीम: "बदलता वारसा"अशी आहे. जागतिक वारसा दिन 2024 (World Heritage Day 2024 Theme)ची थीम: "विविधता शोधून काढा आणि अनुभव घ्या" अशी आहे. यंदाची जागतिक वारसा दिन 2025 (World Heritage Day 2025 Theme)ची थीम: "आपत्ती आणि संघर्षांतून वारसा: ICOMOS च्या 60 वर्षांच्या कृतींमधून शिकणे" अशी आहे.
भारतातील जागतिक वारसा स्थळे यादी (UNESCO World Heritage Sites of India)
क्र. | सांस्कृतिक वारसा स्थळ-35 | राज्य | वर्ष |
---|---|---|---|
01 | अजिंठा लेणी | महाराष्ट्र | 1983 |
02 | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस | महाराष्ट्र | 2004 |
03 | चर्चगेट आणि फोर्ट परिसरातील गॉथिक शैलीतील इमारती | महाराष्ट्र | 2018 |
04 | आग्रा किल्ला | उत्तर प्रदेश | 1983 |
05 | बिहारमधील नालंदा, नालंदा महावीराचे पुरातत्व स्थान | राजस्थान ,बिहार | 2016 |
06 | सांची येथे बौद्ध स्मारके | मध्य प्रदेश | 1989 |
07 | चंपानेर-पावागढ पुरातत्व उद्यान | गुजरात | 2004 |
08 | चर्च आणि गोवा कॉन्व्हेंट्स | चंदीगड | 1986 |
09 | एलिफंटा लेणी | महाराष्ट्र | 1987 |
10 | एलोरा लेणी | महाराष्ट्र | 1983 |
11 | फतेपूर सिक्री | उत्तर प्रदेश | 1986 |
12 | ग्रेट लिव्हिंग चोल मंदिरे | तामिळनाडू | 1987 |
13 | हंपी येथे स्मारकांचा गट | कर्नाटक | 1986 |
14 | महाबलीपूरम येथे स्मारकांचा गट | तामिळनाडू | 1984 |
15 | पट्टडकल येथे स्मारकाचा गट | कर्नाटक | 1987 |
16 | राजस्थानचे हिल किल्ले | राजस्थान | 2013 |
17 | अहमदाबाद ऐतिहासिक शहर | अहमदाबाद, गुजरात | 2017 |
18 | हुमायूंची थडग, दिल्ली | दिल्ली | 1993 |
19 | जयपूर शहर | राजस्थान | 2019 |
20 | खुजराहो ग्रुप ऑफ स्मारक | मध्य प्रदेश | 1986 |
21 | बोधगया येथे महाबोधी मंदिर परिसर | बिहार | 2002 |
22 | माउंटन रेल्वे | तामिळनाडू | 1999 |
23 | कुतुब मिनार आणि त्याची स्मारके | दिल्ली | 1993 |
24 | गुजरातमधील पाटण येथे राणी-की -वाव (क्वीन्स स्टेपवेल) | गुजरात | 2014 |
25 | रेड फोर्ट कॉम्प्लेक्स | दिल्ली | 2003 |
26 | भीमबेटकाचे रॉक आश्रयस्थान | मध्य प्रदेश | 2003 |
27 | सूर्य मंदिर, कोणार्क | ओडिसा | 1984 |
28 | ताजमहाल | उत्तर प्रदेश | 1983 |
29 | आर्किटेक्ल्चर वर्क ऑफ ली कॉरर्ब्यूसीअर, आधुनिक चळवळीचे उत्कुष्ट योगदान | चंदीगड | 2016 |
30 | जंतर मंतर, जयपूर | राजस्थान | 2010 |
31 | काकतीय रुद्रेश्वर, (रामप्पा) मंदिर | तेलंगणा | 2021 |
32 | धोलावीरा | गुजरात | 2021 |
33 | शांतीनिकेतन | पश्चिम बंगाल | 2023 |
34 | होईसळेश्वर मंदिर | कर्नाटक | 2023 |
35 | मोइदाम्स | आसाम | 2024 |
क्र. | नैसर्गिक वारसा स्थळ-7 | राज्य | वर्ष |
01 | काझीरंगा नॅशनल पार्क | आसाम | 1985 |
02 | केवलादेव नॅशनल पार्क | राजस्थान | 1985 |
03 | नंदादेवी नॅशनल पार्क अँड व्हॅली ऑफ फ्लॉवर्स | उत्तराखंड | 1988, 2005 |
04 | मानस वाईल्डलाईफ सँच्युरी | आसाम | 1985 |
05 | सुंदरबन नॅशनल पार्क | पं.बंगाल | 1984 |
06 | वेस्टर्न घाट/ पश्चिम घाट | महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ | 2012 |
07 | ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क | हिमाचल प्रदेश | 2014 |
क्र. | मिश्रित वारसा स्थळ-1 | राज्य | वर्ष |
01 | खांगचेंडझोगा नॅशनल पार्क | सिक्कीम | 2016 |
प्रश्न: खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? (MPSC PRE 2017)
(1) जुलै 2016 पर्यंत भारतात 35 जगातील वारसा स्थळांचा युनेस्कोने मान्यता दिली आहे.
(2) लाल किल्ला परिसर आणि खुजराहो ही भारताची दोन वारसा स्थळांच्या यादीत पहिल्यांदा समाविष्ट केली होती.
(3) नुकतीच समाविष्ट झालेली खांगचेंडझोगा(Khangchenzonga) राष्ट्रीय उद्यान आणि इतर दोन
(4) जुलै 2016 मध्ये ली कॉरर्ब्यूसीअर( Le corbusier) यांच्या सात देशातील सतरा प्रकल्पचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे.
उत्तर: 2
महाराष्ट्रातील सांस्कृतिक/नैसर्गिक स्थळे: (एकूण 6)
1) अजिंठा लेणी: 1983
2) वेरूळ लेणी: 1983
3) घारापुरी लेणी: 1987
4) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस: 2001
5) कासचे पठार: 2012
चर्चगेट आणि फोर्ट परीशारीतील गॉथिक शैलीतील इमारती: 2018
Post a Comment
If You have Doubts, Please Let Me Know