mahatma jyotiba phule information in marathi (महात्मा ज्योतिबा फुले) | Aims Study Center

Mahatma Jyotiba Phule information in Marathi (महात्मा ज्योतिबा फुले)

mahatma-jyotiba-phule
परिचय: आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक,रूढी परंपरेने चालत आलेल्या शुद्रातिशूद्रांच्या व्यथा प्रखड मांडणारे, शेतकऱ्याचे दु:ख वेशीला टांगणारे समाज सुधारक म्हणून ओळख असे असणारे आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले होय.

गाव: कटगून (सातारा) , पुढे हे कुटुंब खानवडी (सध्याचे पुरंदर ,पुणे)
व्यवसाय : सुरवातीला शेळीपालन करत असताना त्यासोबत त्यांनी फुलांचा व्यवसाय सुरु केला.
या परिस्थीतीमध्ये पेशव्यांनी राजश्रय दिला आणि आणि तेव्हापासून फुले हे आडनाव पडले. कारण ते फुलांचा व्यवसाय करत होते.

मूळ नाव: ज्योतिराव गोविंदराव गोऱ्हे
आईचे नाव: चिमणाबाई
जन्म: ११ एप्रिल १८२७

पत्नी: सावित्रीबाई शिक्षण: त्याकाळी शिक्षण हे ठराविक समाजाची मक्तेदारी होती. तेव्हा शिक्षण हे सर्वांना खुले नव्हते. अशावेळी शिक्षण घेणं फार कठीण होते. त्यावेळी काही शाळा होत्या त्यामध्ये मराठी गावठी शाळा, पंतोजीच्या शाळा, आणि ख्रिश्चन मिशनर्यांनी शाळा सुरु केल्या होत्या. अशा वेळी महात्मा फुले यांनी १८३४ ते १८३८ हे चार
वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि काही उच्च वर्णीयांनी गोविंदरावांना फुल्यांना शाळेतून काढण्यासाठी सल्ला दिला. त्यामुळे त्यानां काही काळ शिक्षण थांबवावे लागले होते.
विवाह : पूर्वीच्या काळी बाळ विवाह होता. महात्मा फुले हे १३ वर्षाचे असताना इ.स १९४० मध्ये त्यांचा
विवाह नायगावच्या खंडोजी नेवासे पाटील यांची मुलगी सावित्रीबाई यांच्याशी झाला.

खंडित शिक्षण पुन्हा चालू: गोविंदरावाच्या बागेशेजारी गफ्फार बेग मुन्शी या नावाचे मुसलमान जातीचे विद्वान ग्रस्थ आणि ख्रिश्चन धर्मोपदेशक मिस्टर लेजिट साहेब यांनी ज्योतिराव फुले व गोविंदराव फुले यांना शिक्षणाबाबत चांगला उपदेश केला आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिक्षण सुरु झाले.
वयाच्या १४ व्या वर्षी पुन्हा शिक्षणाला सुरुवात झाली. (इ.स. १८४१).
या काळात शाळेत सदाशिवराव बल्लाळ गोवंडे यांच्याशी मैत्री झाली. या दोघांनी या काळात छत्रपती शिवाजी महाराज , जॉर्ज वॉशिंग्टन यासारख्या थोर पुरुषांची चरित्र वाचली होती.
याचकाळात युरोपिअन लेखक थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मन या पुस्तकाचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर झाला.

महात्मा फुले यांची समाजक्रांतीकडे वाटचाल का झाली?

एका ब्राह्मण मित्रांने त्यांना त्याच्या विवाहाचे निमंत्रण दिले. त्यावेळचं परिस्थितीमध्ये अतिशूद्र समाजास ब्राह्मणांबरोबर चालणे हा हक्क सुद्धा नव्हता. महात्मा फुले यांना माहित नव्हते, तेव्हा तेथील ब्राह्मण मंडळी कुजबुजू लागली. सनातनी ब्राह्मण मंडळीला सहन झाले नाही. व त्यांना मिरवणुकीतून बाहेर जाण्याचं सल्ला दिला. हा ब्राह्मणांकडून झालेला अपमान सहन झाला नाही, तेव्हापासून समाजामध्ये विषमता आपण मोडून काढली पाहिजे अशा परिवर्तनाकडे ते वळले.
म. फुले यांचे बंड हे विशिष्ट जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नसून त्या जातीतील चालत आलेल्या रितीरिवाजाच्या विरोधात होते. गुलामगिरी, हिन व लाचार अवस्था हे दिनदलितांचे भाग्य नसून त्यांच्यावर झालेला अन्याय आहे.


स्त्री शिक्षण: वर्षानु वर्षे चालत आलेली रूढ परंपरा जातिभेद व विषमता या परिस्थिला महात्मा फुले यांनी विरोध केला. समाजातील जातिप्रथेची व विषमतेचो मानवाची वृत्ती नष्ट करण्याचे उद्देशाने महात्मा फुल्यांनी स्त्री शिक्षणाचे काम हाती घेतले. एक स्त्री शिकली पाहिजे म्हणजे संपूर्ण कुटुंब शिकते आणि कुटुंब शिकले म्हणजे संपूर्ण समाज शिक्षित होईल याची जाणीव म. फुल्यांना होती. समाजातील उपेक्षित जनसमाजाला आत्मसन्मानाने
जगण्याची जाणीव करून दिली. कारण समाज परिवर्तन व विकासाच्या दृष्ठीने शिक्षणाला फार महत्त्व आहे असे महात्मा फुले यांचे मत होते.

विद्येविना मती गेली,
मतिविना नीती गेली ,
नीती विना गती गेली ,
गतिविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले.

मुलींची पहिली शाळा: १८४८ मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत भाडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली.
शूद्रातिशूद्रांच्या मुलींची देशातील पहिली शाळा म्हणू ओळखली जाते. या शाळेचे कामकाज पुढील पैकी
मित्रांनी सहकार्य केले: सदाशिव गोविंद हाटे, बापूसाहेब मांडे, सखाराम यशवंत परांजपे, अण्णासाहेब चिपळूणकर
तर त्यावेळसच्या काही सनातन्यानी महात्मा फुले यांना विरोध केला. कारण त्यांच्या मते स्त्री शिक्षण घेऊ लागली तर कुमार्गाने लागेल. घरच्या सुखाचे वाटोळे होईल, शिक्षणाने ती उद्धट होईल, एवढेच नव्हेतर मुलीनी शिक्षण गेहटले तर त्यांना अकाली वैधव्य प्राप्त होईल अशी सर्वत्र चर्चा होती.
हे कार्य करीत असताना वडिलांनी देखील विरोध केला. कारण सनातन्यानी त्याच्यावर दबाव टाकला होता. शेवटी महात्मा फुलेंनी सावित्रीबाई शोभत घराचा त्याग करावा लागला.
अशावेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली. त्यामुळे महात्मा फुले यांनी ठेकेदारीचा तर सावित्रीबाई यांनी घोंगड्या शिवून पैसे कमवायला सुरुवात केली. या थोड्याशा
पैशाने संसाराचा गाडा चालवणे व सुरु केलेल्या शाळेतील मुलांचे कपडे, पुस्तक पुरविणे हे कठीण झाले.
परिणामी काही कालावधीसाठी शाळा ही बंद करावी लागली.


शाळा पुन्हा चालू(मुलींची पहिली शाळा): सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या माध्यमातून जुनागंज पेठेत ती शाळा पुन्हा सुरु केली. पुढे मेजर कॅंडी यांनी या शाळेला पुस्तके पुरविली.
त्यानंतर लगेच: ३ जुलै १८५१ ला: बुधवार पेठेत अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींची शाळा सुरू केली.

मुलींची दुसरी शाळा: १७ सप्टेंबर १८५१ रास्ता पेठेत मुलींची दुसरी शाळा काढली
मुलींची तिसरी शाळा: १५ मार्च १८५२ वेताळ पेठेत काढली.

मित्रांनी सहकार्य केले:
सदाशिव बल्लाळ गोवंडे
सखाराम यशवंत परांजपे,
सदाशिव गोविंद हाटे,
मोरो विठ्ठल वाळवेकर
विषुपंत थत्ते
केशव शिवराम भवाळकर ,
सखाराम यशवंत परांजपे व
देवराई ठोसर यांचे सहकार्य लाभले.

सौ ई .सी जोन्स यांनाही ज्योतिरावांना मदत केली. विषुपंत थत्ते आणि केशव शिवराम भवाळकर यांनी शिक्षक म्हणून काम केले. केशव शिवराम भवाळकर यांनी सावित्रीबाई फुले याना कशा पद्धतीने शिकवायचे यांचे मार्गदर्शन केले. त्यामुळे सावित्रीबाई भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरतात.
तसेच त्यांनी एक कार्यकारी नेमली. त्यामुळे दानशुर लोक त्यांना मद्त करू लागले. त्यांच्या या शैक्षणिक कार्यबद्द्ल १६ नोव्हेंबर १८८२ रोजी मध्ये स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांचा गौरव केला.प्रौढ शिक्षण : इ.स १८५५ मध्ये रात्रीची शाळा सुरु केली. ही शाळा त्यानी आपल्या घरी चालवली.
या शाळेत महात्मा फुले व सावित्रीबाई दररोज २ तास प्रौढ स्त्री-पुरूष यांना शिकवित असत.

एक प्रसंग म . फुले यांच्या जीवनातील:
महात्मा ज्योतिराव यांना मारण्यासाठी आलेले सज्जन रोडे व धोंडिबा कुंभार यांना म. फुले यांनी मारण्यासाठी परवानगी दिली व म्हणाले माझ्या मरणाने तुमचे भले होत असेल आणि प्रत्येकी हजार रुपये मिळणार असेल तर मारू शकता. हे बोलणे ऐकल्यावर रोडे आणि धोंडीराम कुंभार यांनी आपल्या हातातील शस्त्रे फेकून दिली व शरण गेले शेवटी ज्योतिरावांचे अनुयायित्व स्वीकारले.पुढे सज्ज रोडे हे ज्योतिरावांचे अंगरक्षक बनले तर, धोंडीराम कुंभार हा दुसरा मारेकरी म. फुल्यानी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रमुख आधारस्तंभ झाले. त्यांनी वेदाचार हे पुस्तक लिहिले. बालहत्या प्रतिबंध गृह(१८६३): म. फ़ुल्यांना इंग्रज राजवट ही काळ सुधारणेला पोषक ठरेल असा विश्वास होता कारण समाजात बालविवाह, जठरविवाह, सतिप्रथा , केशवपन यासारख्या प्रथा तत्कालीन समाजात मोठ्या प्रमाणात होत्या. इंग्राचे शासन आले तरी समाजातील वाईट चालीरीती मानवी विचाराशी चिंकटून होत्या. इंग्रजांनी आपल्या परीने प्रयत्न केला पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
काशीबाई नावाची ब्राम्हण विधवा स्त्री अनैतिक मार्गाने गरोदर राहिली. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. व इ.स. १८६५ मध्ये ज्या मुलाला तिने जन्म दिला होता तो मुलगा दत्तक (इ.स १८७३) म्हणून घेतला.

त्यांचा मुलगा: यशवंत ज्योतिबा फुले.

विधवा विवाहाचा यासाठी प्रयत्न्: महात्मा फुल्यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली होती. यातुन त्यांनी विधवांची काय दु:ख असते हे जवळून पहिले होते. जोपर्यन्त विधवा स्त्रीयांचा विवाह होत नाही तोपर्यन्त त्याना समाजात मनाचे स्थान नाही हे त्यांचे मत होते. म्हणून इंग्रज सरकारने २५ जुलै १८५६ रोजी विधवा विवाह कायदा सामंत केला.पुढील कालावधीमध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांनी विधवेचा पुनर्विवाह व्हावा यासाठी. ८ मार्च १८६४ रोजी त्याच्या प्रयत्नानें पुण्यात गोखलेंच्या बागेत एका शेणवी जातीतील १८ वर्षाच्या नर्मदा या विधवेचा पुनर्विवाह घडून आणला हा पहिला पुनर्विवाह होय.

बहुपत्नीत्वाला विरोध केला: त्या काळात बहुपत्नीत्व प्रथा प्रचलित होती. स्त्री व पुरुष सामान असल्यामुळे हा अन्याय आहे असे त्यांना वाटत होते.

अस्पृश्यासाठी शाळा: दलितांचे उधार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला . त्या काली मांग,महार, चांभार, ढोर, इत्यादीसाठी अस्पृशतेच्या नावाखाली अत्याचार होत असे. अस्पृश्यासाठी शिक्षणाची दारे खुली व्हावी यासाठी १८५१ मध्ये पुणे येथे नानापेठेत पहिली अस्पृश्यासाठी शाळा काढली. पुण्यामधे अस्पृश्यासाठी १८६८ मध्येविहिर खुली केली. १८७३ मध्ये अस्पृश्यता निवारण्यासाठी जाहीर नामा काढला. तसेच व्यसनमुक्तीसाठी देखील लढा दिला.

१८७६ ते १८८२ या कालावधीत ते पुणे नगर पालिकेचे सदस्य होते. त्यांनी आपल्या शहरात संपूर्ण पाने दारूबंदी केली.जगातील कोणतेच ग्रंथ हे ईश्वराने निर्माण केले नसून ते मानवाने तयार केले असे त्याचे मते होते.

सत्यशोधक समाजाची स्थापना: (२४ सप्टेंबर १८५३):
महात्मा फुले यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता या साठी कार्य केले . यासाठी संघटनात्मक प्रयत्न करण्याचे ठरविले. त्यातुन त्यांनी मार्ग काढण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली .
सर्व मानव ही एकाच निर्मिकाची (ईश्वराची) लेकरे आहेत उपेक्षित माणसाला त्यांच्या बिकासाच्या संधी मिळाल्या पाहिजे. ही चळवळ कोणत्याही धर्माची एका समाज व धर्माचे नेतृत्व करणारी नाही. तर ती सर्वसामान्य अस्पृश्य समाजाची आहे. या व्यासपीठावरून सत्याचा आग्रह धरून समाज जागृती करावी.

सत्यशोधक समाजाची तत्त्वे:
१) ईश्वर एक असून तो निर्गुण निरंकारी आहे.
२) ईश्वराची भक्ती करणे म्हणजे कोणत्याही मुक्यप्राण्याचा बळी देने असे नव्हे तर सर्व समाजाला समानतेची वागवणूक देणे हे ईश्वराची भक्ती आहे.
३) मनुष्य जातीने श्रेष्ठ नाही तर तो गुणाने ठरतो.
४) ईश्वर एक असून तो सत्य स्वरूप आहे. सर्व मनुष्याची त्याची प्रिय लेकरे आहेत.
५) परमेश्वर कोणत्याही रूपाने अवतार घेत नसतो.
६) कोणताही ग्रंथ सर्वांशी प्रमाण या ईश्वरप्रणित नसून तो मानवनिर्मित आहे.
७) आईला भेटण्यास आगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाने मध्यस्थाची जरुरी नसते. त्याप्रमाणे
देवाची प्रार्थना करण्यास पुरोहित किंवा भटजी गुरु, यांची गरज नाही.
पुढील कालावधी मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना या संस्थेचे सभासदत्व खुले होते.


सत्यशोधक समाजाची कार्य: (मुखपत्र दीनबंधू )
१) समजतील जातीभेदाचे विचार कमी करण्याचा प्रयत्न केला.
२) ब्राह्मणाशिवाय व मराठीतून मंगलाष्टके म्हणून विवाह लावण्यास सुरुवात केली.
३) विभिन्न ठिकाणी श्रुद्रातिशूदांसाठी शाळा स्थापन करून शिक्षणाची दारे खुली केली.
४) सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी व अन्यायाविरुद्ध सामाजिक परिवर्तनाची मागणी प्रथम केली.
५) देशासाठी स्वातंत्र्यासाठी लढा देत असतांना तुरुंगवास सहन करणाऱ्या लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगारकरांचा सत्कार केला.
६) इ.स १८१८ मध्ये या समाजाने आपल्या नेतृत्वाखाली पुणे शहरात मोठी मिरवणूक काढली व सामान्य जनतेला एकत्र आणले.
७) सत्यशोधक समाजाने प्रथमच सामाजिक परिवर्तनासाठी चळवळ सुरु केली.

मजूर व शेतकरी चळवळ:
खडकवासला येथील तलावाचे काम् पूर्ण करीत असताना किंवा येरवड्याचा पूल बांधत असताना मजुराची
उच्च-वर्णियाकांडून कशी पिळवणूक होते याचे चित्र त्यांनी पोवाड्यात रेखाटले. तसेच त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात लिहिला आहे. एवढेच नाहीतर हरी रावजी चिपळूणकर यांच्या सन्मानर्प्रित्यर्थ आमंत्रित असलेले ब्रिटिश राजपुत्र डुक ऑफ कनॉट यांच्या २ मार्च १८८८ रोजी आयोजित भोजन कार्यक्रमात महात्मा फुले हे शेतकऱ्यांच्या वेषात गेले होते.
मिल कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांनी १८८० मध्ये नारायण मेघनाजी लोखंडे यांच्या माध्यमातून देशातील प्रथम कामगार संघटना " बॉम्बे मिल हॅंड असोसिएशन " ही संघटना सुरु केली.


महात्मा फुले पुणे नगर पालिकेची सभासद होत त्या वेळी राज्यपाल लॉर्ड रे यांचे नाव त्या इमारतीला देण्यात आले. त्यावेळी इमारती मध्ये दुकान देण्यासाठी भाजीपाला बिक्रेत्याला जबरदस्ती केली जात होती. तेव्हा महात्मा फुले यांनी विरोध केला कारण जनतेचा पैसे हा जनतेसाठी खर्च करावा असे त्यांनी प्रतिपादन केले होते.

हंटर कमिशन व महात्मा फुले: (१९ ऑक्टोबर. १९८२) या निवेदनात त्यांनी सरकारला पुढील सूचना केल्या.
१) प्राथमिक शाळांच्या कारभारावर शिक्षण विभागाचे पूर्ण नियंत्रण असावे.
२) लोकलसेस फ़ंडापैकी जास्त भाग प्राथमिक शिक्षणावर खर्च करावा.
३) प्राथमिक शाळांची संख्या- गावा गावांमध्ये वाढवावी
४)आदिवासी जाती- जमातींच्या विद्यार्थ्यंना शिक्षणात प्राधान्य देण्यात यावे.
५) प्राथमिक शाळांना प्रांतिक सरकारने भरपूर अनुदान द्यावे.
६) प्राथमिक शाळेतील शिक्षकाला पुरेसे प्रशिक्षण देण्यात यावे.
७) १२ वर्ष वर्षापर्यन्त वय असलेल्या सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण शक्तीचे करावे.
८) प्राथमिक शाळांवर होणाऱ्या खर्चाची जबाबदारी स्थानिक नगरपालिकांनी घ्यावी.
९) अस्पृस्यासाठी त्यांच्या वसाहतीत स्वतंत्र शाळा सुरु कराव्यात.
१०) मागासलेल्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती देण्यात यावी.
११) शाळेतील विद्यार्थांना शेतीचे प्राथमिक शिक्षण देण्यात यावे.
१२)अभ्यासक्रमासाठी नवी पुस्तके तयार करावी.
१३) स्त्रीया शूद्रातिशूद्रांचे शिक्षणाची जबाबदारी शासनाने स्वीकारावी.
१४) नैतिक व आरोग्य विषयांचे ज्ञान प्रत्येक विध्यार्थ्यांना देण्यात यावे.
१४).शिक्षण प्राप्त झाल्यानंतर शिक्षण घेतलेल्या विध्यार्थ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे.

शिवजयंती व महात्मा फुले: छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगडावर महात्मा फुल्यांनी जाऊन या समाधीचा जीर्णोद्धार केला. महात्मा फुले यांच्या विचाराने प्रभावित्त होऊन ठाण्याच्या जिल्याधिकारी सिक्लेकर यांनी स्व:खर्चाने छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी दुरुस्त केली. या करायला २५ रुपये खर्च केला. आणि दरवर्षी चार रूपयांचे वर्षांसन मंजूर केले. पुढील कालावधी मध्ये थांबले काम हे लोकमान्य टिळकांनी १९८५ पासून सुरु केले.

महात्मा फुले यांनी स्रिया दलित, शेतकरी, कामगार यांच्या उद्धाराचा विडा उचललेला होता. कारण त्यांना सर्वांविषयी अतिशय तळमळ होती. १ एप्रिल १९८९ रोजी सार्वजनिक सत्यधर्म हा आपल्या डाव्या हाताने लिहिला व पूर्ण केला. कारण त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. या ग्रंथाचे त्यांच्या मृत्युनंतर प्रकाशन त्यांचा मुलगा दत्तकपुत्र यशवंत ज्योतिबाराव फुले यांनी इ.स १८९१ मध्ये केला.
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon