Amravati District।अमरावती जिल्ह्याचा इतिहास आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने संपूर्ण माहिती | Aims Study Center

Amravati District।अमरावती जिल्ह्याचा इतिहास आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने संपूर्ण माहिती  all-informartion-about-amaravati-dist

Amravati Dist

अमरावती जिल्ह्याचा स्थान व विस्तार: अमरावती जिल्हा 20° 32' आणि 21° 46' उत्तर अक्षांश आणि 76° 37' आणि 78° 27' पूर्व रेखांश दरम्यान स्थित आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 12,235 वर्ग कि.मी.आहे. अमरावती जिल्हाच्या उत्तरेस मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्हा व ईशान्य दिक्षेस नागपूर जिल्हा, आग्नेश वर्धा जिल्हा आहे, दक्षिणेस यवतमाळ, नैर्ऋत्यला वाशिम , पश्चिमेस अकोला व बुलढाणा जिल्हा आहे.


अमरावती जिल्हा क्षारता दर: 88.23%. नागपुर शहरापासुन अंतर 152 कि.मी.आणि मुंबईपासुन अंतर 663 कि.मी.राष्ट्रीय महामार्ग 6 हा अमरावती जिल्ह्यातून जातो. 

अमरावती जिल्हयातील महत्वपुर्ण व्यक्तीमत्व: संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रतिभाताई पाटील (पहिले राष्ट्रपती) असे मौल्यवान रत्ने अमरावती शहराने देशाला दिले.  

अमरावती जिल्ह्यातील एकूण तालुके:(14) अचलपूर, अंजनगाव सुर्जी, अमरावती,चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा,तिवसा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, धारणी, नांदगाव -खांडेश्वर, भातकुली, मोर्शी, वरुड.

अमरावती नाव का पडले? अमरावती जिल्हयाचे मूळनाव उमरावती होते कारण तेथे उंबराचे झाडे खूप होते.
तसेच त्या जिल्ह्याला इंद्राची नगरी असे ही म्हणतात. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून म्हणून अमरावतीला ओळखले जाते. विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ही अमरावतीला ओळखले जाते. 1903 मध्ये वऱ्हाड हा मध्यप्रांताला जोडण्यात आला (लॉर्ड कर्झन)द्वारे. 1964 मध्ये अमरावतीमधून यवतमाळ जिल्हा वेगळा करण्यात आला.

अमरावती हे दाट लोकवस्ती असलेल्या महानगर क्षेत्रांमध्ये 7व्या क्रमांकावर येते. शहरात ऐतिहासिक अशी अंबा व श्रीकृष्ण मंदिरे आहेत. 1983 मध्ये अमरावती महानगरपालिका स्थापन झाली. ही 'खाजगी जकात' म्हणून ओळखली जाणारी भारतातील पहिली महानगरपालिका आहे.

अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या: 6,46,801 (2011) नुसार, 

अमरावती जिल्ह्यातील पाहण्यासारखी ठिकाणे: भातकुले येथील जैन मंदिरे प्रसिद्ध आहेत. पोहरादेवी अभयारण्य पाहण्यासारखे आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (अमरावती विद्यापीठ), श्री शिवाजी पटवर्धन यांनी स्थापण केलेले "तपोवन" हे कुष्ठरोग्यांसाठीचा प्रकल्प शहराच्या पूर्वेला आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे आहे. काही पर्यटन व प्रेक्षणीय स्थळे पुढीलप्रमाणे अंबादेवी मंदिर,अमरावती, एकविरा देवी मंदिर, बांबू उद्या अमरावती, श्री क्षेत्र कोंडेश्वर अमरावती, छत्री तलाव, वडाळी तलाव

चिखलदऱ्याजवळची काही आकर्षण केंद्रे: मेळघाट व्याघ्रप्रकल्प, कोलखास आणि सेमाडोह हे निसर्गरम्य स्थळे, गाविलगड किल्ला, नर्नाळा किल्ला, पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन, ट्रायबल म्युझियम. अमरावती शहरात आणखी 

थंड हवेचे ठिकाण: चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण व मेळघाट अमरावती जिल्ह्यात आहे. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे. अप्पर वर्धा धरण (नल -दमयंती सागर) हे सुद्धा अमरावती जिल्ह्यात आहे. अमरावती जिल्हा हा पूर्णपणे दख्खच्या पठारावर आहे. 1903 मध्ये वऱ्हाड हा मध्यप्रांताला जोडण्यात आला (लॉर्ड कर्झन)द्वारे

शेती: अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक कापूस, तापी व वर्धा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये रेगूर ही काळी मृदा मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे आहे. अमरावती जिल्ह्यातील इतर काही नद्या त्यांच्या उपनद्या पुढील प्रमाणे आहेत. बुर्शी नदी, सुखी नदी, टिग्रीया नदी, खंडू नदी, खाप्रा नदी, सांगिया नदी, गाडागा नदी, वान नदी, वर्धा नदी, विदर्भ नदी, बोर नदी, पाक नाला, मारू नदी, नरहा नदी, चार्गर नदी, शहानूर नदी

अमरावती जिल्ह्यातील महत्वाचे पिके, थंड हवेचे ठिकाण, सर्वात उंच ठिकाण, स्थान व विस्तार, महत्वाची व्यक्ती, प्रमुखा नद्या, यवतमाळ जिल्हा कधी निर्माण झाला, लॉर्ड कर्झन, आणि इतर महत्वाच्या घडामोडी तसेच प्रमख तालुके अशा प्रकारची थोड्याक्यात माहिती आपण या जिल्ह्याविषयी घेतली. 

आपण संपूर्ण माहिती शेवट पर्यंत वाचली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. Thank You 
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon