UNESCO World Heritage Sites of India 2021: भारतातील जागतिक वारसा स्थळे यादी | Aims Study Center

UNESCO World Heritage Sites of India 2021: भारतातील जागतिक वारसा स्थळे यादी

UNESCO-world-heritage-site-ofo-indiaUNESCO World Heritage Sites of India 2021 (Photo: Wikipedia)

भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्को द्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत. भारतात एकूण 3691 स्मारके आणि स्थळे आहेत. त्यापैकी भारतातील एकूण 40 जागतिक वारसा स्थळे युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहेत. यामध्ये 32 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक, आणि 1 मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहे. जगात जागतिक वारसा स्थानांच्या संख्येनुसार (40) नुसार भारत सहाव्या क्रमांकावर आहे. इटली या देशामध्ये सर्वाधिक 58 जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यानंतर चीन या देशामध्ये 56 वारसा स्थळे आहेत. या पाठोपाठ जर्मनी(51), फ्रांस (49), स्पेन (49) आणि भारताचा (40) क्रमांक लागतो. जगातील एकूण 1154 जागतिक वारसा स्थळे UNESCO च्या यादीमध्ये समाविष्ट आहेत.

गुजरातचे हडप्पा काळातील शहर धोलवीराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत भारतातील एकूण 40 स्थळांचा समावेश जागतिक वारसात झाला आहे. गुजरातमध्ये या आधी पावागढजवळ चंपानेर, पाटणमध्ये राणी की वाव आणि अहमदाबाद, धोलावीरा, या स्थळांचा समावेश होता. धोलावीरा हे जगातील पहिलं प्राचीन महानगर समजले जाते.

13 व्या शतकातील अभियांत्रिकी चमत्कारीत काकतीय रुद्रेश्वर, (रामप्पा) मंदिर 2019 च्या जागतिक वारसा साईट टॅगसाठी एकमेव नामांकन म्हणून प्रस्तावित केलेले मंदिर होते. काकतीय रुद्रेश्वर, (रामप्पा) मंदिर या मंदिराला 25 जुलै 2021 रोजी झालेल्या अधिवेशनात 39 वे भारताचे जागतिक वारसा स्थान म्हणून मान्यता मिळाली आहे. (List of UNESCO World Heritage Sites of India 2021). जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये वारसा स्थळांच्या संख्येनुसार (40) भारताचा जगात सहावा क्रमांक लागतो. जगामध्ये सर्वाधिक वारसा स्थळे इटली(58) आणि चीन मध्ये (56), त्यानंतरचा क्रमांक जर्मनी (51), फ्रांस (49) आणि स्पेन(49) असा अनुक्रमे वारसा स्थळांच्या संख्येनुसार लागतो.

UNESCO: संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था (United Nations Educational, Scientific and Cultural Organization). स्थापना: 16 नोव्हेंबर 1945 (मुख्यालय- पॅरिस)


जागतिक वारसा दिन:(World Heritage Day) जगातील निवडक वारसा स्थळांचा सुवर्ण इतिहास आणि बांधकाम जतन करण्यासाठी दरवर्षी 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 1982 पासून जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. 1982 मध्ये स्मारक आणि स्थळे यावरील आंतरराष्ट्रीय परिषद (ICOMOS) यांनी 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन म्हणून घोषित केले आहे. दरवर्षी ICOMOS जागतिक वारसा दिनाची एक थीम सेट करते. जागतिक वारसा दिन 2021 (World Heritage Day 2021 Theme)ची थिम: Complex Past, Diverse Future ही होती. जागतिक वारसा दिन 2022 (World Heritage Day 2022 Theme)ची थीम: "वारसा आणि हवामान" ही आहे. यंदाची जागतिक वारसा दिन 2023 (World Heritage Day 2023 Theme)ची थीम: "बदलता वारसा"(Heritage Changes) अशी आहे.

भारतातील जागतिक वारसा स्थळे यादी-2021 (UNESCO World Heritage Sites of India-2021)
क्र.सांस्कृतिक वारसा स्थळ-32राज्यवर्ष
01अजिंठा लेणीमहाराष्ट्र 1983
02छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महाराष्ट्र  2004
03चर्चगेट आणि फोर्ट परिसरातील गॉथिक शैलीतील इमारती महाराष्ट्र2018
04आग्रा किल्ला उत्तर प्रदेश1983
05बिहारमधील नालंदा, नालंदा महावीराचे पुरातत्व स्थान राजस्थान ,बिहार2016
06सांची येथे बौद्ध स्मारके मध्य प्रदेश1989
07चंपानेर-पावागढ पुरातत्व उद्यान गुजरात2004
08चर्च आणि गोवा कॉन्व्हेंट्स चंदीगड1986
09एलिफंटा लेणी महाराष्ट्र 1987
10एलोरा लेणी महाराष्ट्र1983
11फतेपूर सिक्री उत्तर प्रदेश 1986
12ग्रेट लिव्हिंग चोल मंदिरे तामिळनाडू1987
13हंपी येथे स्मारकांचा गटकर्नाटक1986
14महाबलीपूरम येथे स्मारकांचा गट तामिळनाडू 1984
15पट्टडकल येथे स्मारकाचा गटकर्नाटक1987
16राजस्थानचे हिल किल्ले राजस्थान2013
17अहमदाबाद ऐतिहासिक शहर अहमदाबाद, गुजरात2017
18हुमायूंची थडग, दिल्ली दिल्ली1993
19जयपूर शहर राजस्थान2019
20खुजराहो ग्रुप ऑफ स्मारक मध्य प्रदेश1986
21बोधगया येथे महाबोधी मंदिर परिसर बिहार2002
22माउंटन रेल्वेतामिळनाडू1999
23कुतुब मिनार आणि त्याची स्मारकेदिल्ली1993
24गुजरातमधील पाटण येथे राणी-की -वाव (क्वीन्स स्टेपवेल)गुजरात2014
25रेड फोर्ट कॉम्प्लेक्स दिल्ली2003
26भीमबेटकाचे रॉक आश्रयस्थान मध्य प्रदेश2003
27सूर्य मंदिर, कोणार्क ओडिसा1984
28ताजमहालउत्तर प्रदेश1983
29आर्किटेक्ल्चर वर्क ऑफ ली कॉरर्ब्यूसीअर, आधुनिक चळवळीचे उत्कुष्ट योगदान चंदीगड2016
30जंतर मंतर, जयपूर राजस्थान2010
31काकतीय रुद्रेश्वर, (रामप्पा) मंदिर तेलंगणा2021
32धोलावीरा गुजरात 2021
क्र.नैसर्गिक वारसा स्थळ-7राज्यवर्ष
01काझीरंगा नॅशनल पार्क आसाम1985
02केवलादेव नॅशनल पार्क राजस्थान1985
03नंदादेवी नॅशनल पार्क अँड व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उत्तराखंड1988, 2005
04मानस वाईल्डलाईफ सँच्युरी आसाम1985
05सुंदरबन नॅशनल पार्क पं.बंगाल1984
06वेस्टर्न घाट/ पश्चिम घाट महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ2012
07ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हिमाचल प्रदेश2014
क्र.मिश्रित वारसा स्थळ-1 राज्य वर्ष
01खांगचेंडझोगा नॅशनल पार्क सिक्कीम2016
भारतातील जागितक वारसा स्थळे/स्थाने यावर कोणत्याही परीक्षेत एक तरी प्रश्न विचारण्याची शक्यता असते. त्यामध्ये स्थळाशी संबंधित असेल किंवा राष्ट्रीय उद्यान किंवा जागितक वारसा स्थळ तसेच भू वारसा स्थळ इत्यादी. आपण एक आयोगाचा प्रश्न पाहूया म्हणजे आपल्याला समजेल की, आयोगाने अश्या प्रकाराचा यापूर्वी प्रश्न विचारलेला आहे.

प्रश्न: खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? (MPSC PRE 2017)
(1) जुलै 2016 पर्यंत भारतात 35 जगातील वारसा स्थळांचा युनेस्कोने मान्यता दिली आहे.
(2) लाल किल्ला परिसर आणि खुजराहो ही भारताची दोन वारसा स्थळांच्या यादीत पहिल्यांदा समाविष्ट केली होती.
(3) नुकतीच समाविष्ट झालेली खांगचेंडझोगा(Khangchenzonga) राष्ट्रीय उद्यान आणि इतर दोन
(4) जुलै 2016 मध्ये ली कॉरर्ब्यूसीअर( Le corbusier) यांच्या सात देशातील सतरा प्रकल्पचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे.

उत्तर: 2

महाराष्ट्रातील सांस्कृतिक/नैसर्गिक स्थळे: (एकूण 6)
1) अजिंठा लेणी: 1983
2) वेरूळ लेणी: 1983
3) घारापुरी लेणी: 1987
4) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस: 2001
5) कासचे पठार: 2012

चर्चगेट आणि फोर्ट परीशारीतील गॉथिक शैलीतील इमारती: 2018
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon