Major Dhyanchand Award: मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या विषयी मराठी माहिती | Aims Study Center

Author
By -
0

Major Dhyanchand Award: मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या विषयी मराठी माहिती

rajiv-gandhi-khelratn-award-2020
Major Dhyanchand Award

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार: 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून ही माहिती दिली की, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल. पूर्वी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे खेलरत्न पुरस्काराचे नाव होते. हा पुरस्कार १९९१-९२ या वर्षी सुरु करण्यात आला होता. क्रीडा क्षेत्रातील सर्वोउत्कृष्ट क्रीडा पुरस्कार म्हणून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ओळखला जातो. वर्षभर विविध खेळातील खेळाडू आणि प्रशिक्षक यांनी खेळांमध्ये चांगली कामगिरी केल्यावर हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडू आणि प्रशिक्षक यांना प्रदान करण्यात येतो.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार: (पूर्वी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार)


देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणून मेजर ध्यानचंद पुरस्कार ओळखला जातो. या पुरस्काराची सुरुवात वर्ष १९९१-९२ मध्ये झाली होती. या पुरस्काराचे स्वरूप रोख २५ लाख रुपये आहे. दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी हा पुरस्कार युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येतो. सध्याला या खात्यांचे मंत्री अनुराग ठाकूर आहेत. आतापर्यंत एकूण ४३ खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

खेलरत्न पुरस्कार पुरस्काराची पहिली महिला मानकरी: 

कर्णम मल्लेश्वरी या पहिल्या महिला या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या असून आता पर्यंत एकूण १७ महिला खेळाडूंना या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.


मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार ( पूर्वी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार) या पुरस्काराचे पहिले बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद हे आहेत. आतापर्यंत धनराज पिले, गोपीचंद, अभिनव बिंद्रा, अंजूबॉबी जॉर्ज सचिन तेंडुलकर, राणी रामपाल या खेळाडूंना या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.

मेजर ध्यानचंद यांच्याविषयी थोडक्यात माहिती: 

मेजर ध्यानचंद यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ अशा एकापाठोपाठ तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. याच कारणासाठी त्यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. १९२८ साली ॲमस्टरडॅम येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मेजर ध्यानचंद हे सर्वाधिक गोल करणारे खेळाडू ठरले होते. बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेतील ध्यानचंद यांचा खेळ पाहून जर्मनीचा हुकूमशहा हिटलर यांने मेजर ध्यानचंद यांना जर्मनीचे नागरिकत्व आणि सैन्यातील मोठे पद ही देऊ केले होते. त्यावेळी समय सूचकता दाखवत मेजर ध्यानचंद यांनी नकार दिला होता.
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!