Talathi Bharti 2022: तलाठी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती संपूर्ण माहिती
तलाठी भरती 2022
Talathi Bharti 2022: खुशखबर ! तलाठी भरती (Talathi Bharti 2022) करणाऱ्यांसाठी लवकरच एक हजार पदांची जाहिरात येणार आहे. तर मग कशाला करता उशीर तलाठी पदाचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती याबद्दल संपूर्ण माहिती. (Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern in Marathi) आपण जाणून घेणार आहोत. तलाठी पदाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तलाठी पदासाठीचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत याबद्दल संपूर्ण माहिती (Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern in Marathi). महाराष्ट्र्रात (मुंबई, उपनगर सोडून) सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची भरती (Talathi Bharti 2022) करण्यात येते. आगामी काळात होऊ घातलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी आपण अभ्यासक्रम (Talathi Syllabus) आणि परीक्षा पद्धत (Exam Pattern) याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Talathi Bharti 2022 पदांसाठीचा अभ्यासक्रम हा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या घटकावर आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण खाली दिली आहे. Talathi Bharti 2022 चा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती आपल्याला माहित असेल तर अभ्यास करताना अडचण येणार नाही. Talathi Bharti 2022 चा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.
मराठी अभ्यासक्रम: मराठी वर्णमाला व उच्चारस्थान, शब्दांच्या जाती, विभक्ती व सामान्यरूप, वाक्य व वाक्याचे प्रकार, काळ आणि प्रयोग, मराठी भाषेची शब्दसिद्धी, सामाजिक शब्दरचना, मराठी भाषेतील वाक्यप्रचार आणि म्हणी, सामाजिक शब्दरचना, समानार्थी, विरुद्धार्थी शब्दरचना, एका शब्दाचे अनेक अर्थ, शब्द समूहाबद्दल एकच शब्द, अलंकारिक शब्दरचना आणि उताऱ्यावर प्रश्न या घटकांचा समावेश तलाठी पदाच्या परीक्षेमध्ये असतो.
इंग्रजी अभ्यासक्रम: Part of speech, Articles, Sentence, Tense, Active and Passive voice, Direct Indirect speech, Punctuation and Question tag, Synonyms and Antonyms, one word, Idioms and Phrases, Question on Passage etc.

सामान्य ज्ञान अभ्यासक्रम: भूगोल- जगाचा, भारताचा व महाराष्ट्राचा, इतिहास- भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा, सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व आरोग्यशास्त्र. प्रसिद्ध लेखक व दिनविशेष चालू घडामोडी- भारतातील व जागतिक. नागरिकशास्त्र- भारतीय राज्यघटना आणि महाराष्ट्राचे ग्रामीण प्रशासन इत्यादींचा तलाठी पदाची तयारी करताना सामान्य ज्ञान या घटकाचा अभ्यास करावा.
बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम: संख्यांचा क्रम, श्रेणी, संख्यामालिकेतील समसंबंध विसंगत संख्या ओळखणे, आकृत्यांमधील संख्या ओळखणे, वर्गमालिकेची क्रमश्रेणी सोडविणे, सांकेतिक शब्दरचना, सांकेतिक शब्दलिपी, संगत शब्दरचना, विसंगतपद ओळखा, सांकेतिक वर्णमाला, बसण्याचा क्रम ओळखणे, आकृत्यांचे पृथक्करण, घनाकृतीवर आधारित प्रश्न, नातेसंबंध, आकृतीवरील कूट प्रश्न, दिशेवर आधारित प्रश्न, घड्याळ, वेळ व कालमापन आणि दिनदर्शिका इत्यादी.
अंकगणित अभ्यासक्रम: संख्याज्ञान व स्थानिक किंमत, गणिताच्या प्राथमिक क्रिया, विभाजतेच्या कसोट्या, लसावि आणि मसावि, व्यवहारी व दशांश अपूर्णांक, सरासरी, गुणोत्तर प्रमाण, शतमान व शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढव्याजात नफा व तोटा, काम, काळ आणि वेग, दशमान व कालमापन, क्षेत्रफळ व परिमिती इत्यादी.
परीक्षा पद्धत: तलाठी भरती परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणे 200 गुणांचा पेपर असतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञ व बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचा कालावधी 2 तास असतो.
तलाठी भरती टेस्ट सिरीज साठी येथे क्लिक करा 👉 | Click Here |
---|
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon