Dadasaheb Phalke Award 2023 | दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 यादी
दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
या कार्यक्रमात आलिया भटला 'गंगुबाई काठीवाडी' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर रणबीर कपूरला 'ब्रम्हास्त्र' चित्रपटातील शिवा भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आर बाल्की यांना 'चूप : रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' साठी देण्यात आला तसेच मोस्ट प्रोमोसिंग अभिनेता म्हणून ऋषभ शेट्टी यांना 'कांतारा' या चित्रपटातील भूमिकेसाठी पुरस्कार देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट वेब सीरिज 'रुद्र द एज ऑफ डार्कनेस साठी तर क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून वरुण धवन याला 'भेडिया' चित्रपटासाठी पुरस्कार देण्यात आला. वर्षभरातील सर्वोत्कृष्ट दूरदर्शन मालिका म्हणून 'अनुपमा' या मालिकेला मान मिळाला आहे. मुव्ही ऑफ द इयर हा पुरस्कार 'आरआरआर' चित्रपटाला प्रदान करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अभिनेता म्हणून अनुपम खेर यांना ' द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाची भूमिकेसाठी प्रदान करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता (मालिका विभागा)मध्ये जैन इमाम तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मालिका विभागा)मध्ये तेजस्वी प्रकाश यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. (Dadasaheb Phalke Award 2023). आलिया भट आणि रेखा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आले आहे.
खालील प्रमाणे दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ ची संपूर्ण यादी:
दादासाहेब फाळके पुरस्कारांचे नाव | चित्रपट/अभिनेता/मालिका |
---|---|
सर्वोत्कृष्ट सिनेमा | द काश्मीर फाइल्स |
सर्वोत्कृष्ट वेबसीरीज | रुद्र |
सर्वोत्कृष्ट मालिका | अनुपमा |
फिल्म ऑफ द इअर | आरआरआर |
सर्वोत्कृष्ट अभिनेता | रणबीर कपूर |
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री | आलिया भट्ट |
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) | वरुण धवन |
सर्वोत्कृष्ट अभिनेता (प्रॉमिसिंग) | ऋषभ शेट्टी |
अष्टपैलू अभिनेता | अनुपम खेर |
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मालिका विभाग) | तेजस्वी प्रकाश |
सर्वोत्कृष्ट अभिनेता (मालिका विभाग) | जैन इमाम |
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक | आर बाल्की |
If You have Doubts, Please Let Me Know