Chalu Ghadamodi 2024-आजच्या ठळक चालू घडामोडी मराठी MPSC व इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त
चालू घडामोडी मराठी |
Chalu Ghadamodi 2024-आजच्या ठळक चालू घडामोडी मराठी MPSC व इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त
1. नव्या गुन्हेगारी कायद्यांच्या नावांबद्दलचा वाद थेट मद्रास उच्च न्यायालयात
|
2.सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याची सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून निवड केली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून केरळचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती पी. सथाशिवम हे होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १० जुलै रोजी नवी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारणार आहे. कृषी नेतृत्व पुरस्काराचा उद्देश: नावीन्यपूर्ण धोरणे आणि उच्च-प्रभावी विकासात्मक उपक्रमांद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या अपवादात्मक योगदानाला हा पुरस्कार दिला आहे. सर्वोतकृष्ट कृषी राज्य पुरस्कार २०२४ : महाराष्ट्र सर्वोतकृष्ट कृषी राज्य पुरस्कार २०२३ : बिहार सर्वोतकृष्ट कृषी राज्य पुरस्कार २०२२ : तामिळनाडू & उत्तर प्रदेश |
3.शासकीय सेवा व अन्य स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना चाप बसणार, यामध्ये पैसे घेऊन प्रश्नपत्रिकेविषयी कोणती माहिती उघड करणे, त्याविषयी इतरांना माहिती देणे, अनधिकृतपणे परीक्षा केंद्रात प्रवेश करणे आदी कोणत्याही प्रकारे पेपरफुटी किंवा अन्य गैरप्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई होणार आहे. १) परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना तीन ते पाच वर्षे तुरुंगात आणि २) १० लाख रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबतचे विधेयक महाराष्ट्र विधानसभेत सादर केले आहे. |
4.ब्रिटनमध्ये लेबर पक्षाचा एकूण ६५० जागापैकी ४१० जागांनी दणदणीत विजय. १) कन्झर्व्हेटिव्ह पक्ष १४ वर्षांपासून सत्तेत होता. २) आता लेबर पक्षाचे कि स्टार्मर होणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान ३) कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला केवळ ११९ जागा मिळाल्या |
5. पहिली सीएनजी बाईक पुण्यात लाँच करण्यात आली. बजाजकडून जगातील पहिली सीएनजी बाईक पुण्यात लाँच करण्यात आली आहे. उद्घाटन: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ठिकाण: पिंपरी चिंचवड |
If You have Doubts, Please Let Me Know