(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र वय, पात्रता व ऑनलाईन अर्ज कसा करावा?

Author
By -
0

(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र वय, पात्रता व ऑनलाईन अर्ज कसा करावा?

Mukhyamantri ladlki behin yojana maharashtra
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना 

Mukhyamantri Majhi ladki behin yojana maharashtra 2024: महाराष्ट्र राज्यातील श्रमबल पाहणीनुसार स्त्रियांची रोजगाराची टक्केवारी २८.७० टक्के स्त्रियांची टक्केवारी आहे. तसेच महाराष्ट्रात महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण ५० पेक्षा जास्त आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी "मुख्यमंत्री-माझी लाडली बहीण" योजना सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. सदरची परिस्थिती लक्षात घेता, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटूंबातील त्याही निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना सुरु केली आहे.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश: 

  • राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे. 
  • त्यांचे आर्थिक, सामाजिकपुनर्वसन करणे. 
  • राज्यातील महिला स्वालंबी, आत्मनिर्भर करणे. 
  • राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे. 
  • महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा. 
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरूप: 
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु १,५००/-  इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रु. १,५००/- कमी लाभ घेत असले तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. 

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कोण आहेत? 
  • महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वयोगटातील, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
  • मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी एका कुटूंबातील दोन महिलांना लाभ घेता येणार आहे.  
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत:  १ जुलै ३१ ऑगस्ट २०२४

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण पात्रता: 
१) महिला उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. (अट शिथिल)
२) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आदी  निराधार महिला. 
३) किमान वयाची २१ वर्षे पुरणे व कमाल वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत.
४) उमेदवाराकडे बॅंकखाते असणे आवश्यक आहे. (नसले तरी चालेले) 
५) लाभार्थ्यांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. (अट शिथिल)
 
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे: 
  1. अर्जदाराचा फोटो 
  2. अर्जदारांचे आधारकार्ड
  3. बँक पासबुक (असल्यास देऊ शकता)
  4. अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला. 
  5. उत्पन्न दाखला किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड.  
  6. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे.
  7. अर्जदाराचे हमीपत्र  
Note: उत्पन्न दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र या प्रमाणपत्राची अट शिथिल

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची निवड कशी होईल? 

  • मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या उमेदवारांची पात्रता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/ मुख्यसेवीका/सेतू सुविधा केंद्र /ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वॉर्ड/अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यांनतर महिला उमदेवारांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. 
  • अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर ( संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी)
  • अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी ( संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती)
Mukhyamantri Majhi ladki behin yojana maharashtra 2024 online apply App: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी नारीशक्ती दूत हा अँप प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल करा. 
  1. अँप च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नारीशक्ती दूत हा अँप डाउनलोड करा. 
  2. कार्यक्षेत्र(ग्रामीण भाग): अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका/ सेतू सुविधा केंद्र/ ग्रामपंचायत/ ग्रामसेवक
  3. कार्यक्षेत्र (शहरी भाग): अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका/ वार्ड अधिकारी/ सेतू सुविधा केंद्र 
वरील ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करू शकता. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ग्रामीण/शहरी भारतातील कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकारी यांच्या मार्फत अर्ज सादर करा.  

फॉर्म PDF येथून डाउनलोड करा- View PDF


महिला अर्जदार हमीपत्र डाउनलोड करा-View PDF 


मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र GR-View PDF

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!