(Home Guard Bharti 2024) होमगार्ड भरती ऑनलाईन नोंदणी सुरु, पात्रता व इतर माहिती
Home Guard Bharti 2024 |
महाराष्ट्र राज्यात होमगार्ड भरती २०२४ नोंदणीची अधिकृत नोटिफिकेशन https://maharashtracdhg.gov.in/ या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्याचे नोटिफिकेशन अपलोड करण्यात आले आहे. होमगार्ड्सची भरती ऑनलाईन पद्धतीने दिनांक २५ जुलै २०२४ पासून सुरु होत आहे. ऑनलाईन पद्धतीने आवेदन करण्याचा अंतिम दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. होमगार्ड्स पदासाठी पात्रताधारक उमेदवारांचे वय २० ते ५० वर्षे असावे. होमगार्ड्स या पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण उमेदवार असावा. होमगार्ड्स या पदासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये होमगार्ड्सची नोंदणी सुरू झाली आहे. सविस्तर व अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ज्या जिल्ह्यामध्ये होमगार्ड्सची नोंदणी करायची आहे. त्या जिल्ह्यांची मूळ जाहिरात पाहून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ: https://maharashtracdhg.gov.in
शैक्षणिक पात्रता: १० वी उत्तीर्ण
वयोमर्यादा: किमान २० वर्षे ते कमाल ५० वर्षे
होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य:
- होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही
- पोलीस दलाच्या मागणी प्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे काम पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पुरविमोचन तसेच रोगराई/महामारीकाळात, संपकाळात प्रशासनांस मदतकार्य अशी कर्तव्ये दिली जातात.
होमगार्ड पात्रतेसह निकष व अटी
पुरुष | महिला |
---|---|
पात्रता : १० पास | १० पास |
वय: २० वर्षे ते ५० वर्षाच्या आत | २० वर्षे ते ५० वर्षाच्या आत |
उंची: १६२ से.मी | १५० से. मी. |
छाती: न फुगविता किमान ७६ से.मी ( ५ सेमी फुगवून) | लागू नाही |
धावणे चाचणी: १६०० मीटर ( वेळ ५ मि. १० सेकंद) | ८०० मीटर ( वेळ २ मि ५० सेकंद) |
गोळा फेक: ८.५० मीटर | ६ मीटर |
जाहिरात pdf | Click here |
Online अर्ज | Click here |
अधिकृत संकेतस्थळ | Click here |
If You have Doubts, Please Let Me Know