(Chalu Ghadamodi) चालू घडामोडी मराठी प्रश्न उत्तरे 2024 | Aims Study Center

Author
By -
0

(Chalu Ghadamodi) चालू घडामोडी मराठी प्रश्न उत्तरे 2024

current-affairs-2024
current affairs 2024

Chalu Ghadamodi 2024 in Marathi (चालू घडामोडी): स्पर्धा परीक्षा कोणतीही असो चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी जवळपास १५ गुंणांसाठी चालू घडामोडी (Chalu Ghadamodi 2024 Questions and Answers) प्रश्न विचारले जातात. MPSC State service (एमपीएससी राज्यसेवा), MPSC Group B, (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), सरळसेवा (Saral Seva Bharti, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti & Other State Class III Exams) या सर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी हा आत्मा समजला जातो.

Q1: जगातील क्रीडा प्रेमींचे लक्ष लागून असलेल्या " पॅरिस ऑलिम्पिक २०२४" ची सुरुवात कधी पासून होणार आहे? 

A. १६ जुलै 

B. १९ जुलै  

C. २६ जुलै  

D. ३० जुलै  

योग्य उत्तर: C. २६ जुलै 

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी भारतचे ११७ खेळाडूंचे पथक सहभागी होत आहे. या पूर्वीच्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताने ७ पदके जिंकली होती. मेरी कोम आणि मनप्रीत सिंग हे टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये संयुक्त ध्वजवाहक होते. ११ ऑगस्ट  २०२४ रोजी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताच्या मोहिमेची सांगता होणार आहे. 

(nextPage)

Q2: ऑलिम्पिकचे ३३ वे संस्करण कोणत्या शहरात होणार आहे? 

A. अमेरिका 

B. पॅरिस 

C. इंग्लड 

D. चीन 

योग्य उत्तर: B. पॅरिस  

पॅरिसमध्ये येत्या २६ जुलै पासून ऑलिम्पिकचे ३३ वे संस्करण सुरु होत आहे. पॅरिस शहराला यंदाचा हा तिसऱ्यांदा बहुमान मिळाला आहे. यापूर्वी परीक्षा शहरामध्ये १९०० आणि १९२४ मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. 

(nextPage)

Q3: Euro Cup Football 2024 ची स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे? 

A. अमेरिका 

B. स्पेन 

C. इंग्लड 

D. चीन 

योग्य उत्तर: B. स्पेन 

(nextPage)

Q4:सध्या चर्चेत असलेले ठिकाण व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम कोठे स्थित आहे? 

A. पॅरिस 

B. मेलबर्न 

C. लंडन 

D. टोकियो  

योग्य उत्तर: C. लंडन

ज्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढला होता ते वाघनखं लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम येथे ठेवण्यात आले होते. त्यामुळे हे ठिकाण स्पर्धा परीक्षा दृष्टीने लक्षात राहावे.   

(nextPage)

Q5:पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय पुरुष व महिला संघाची ध्वजवाहक पदाची जबाबदारी कोणाकडे देण्यात आली आहे? 

A. मेरी कोम आणि ए.शरथ कमल 

B. मेरी कोम आणि मनप्रीत सिंग 

C. पी.टी. उषा आणि ए.शरथ कमल

D. ए.शरथ कमल आणि मनप्रीत सिंग

योग्य उत्तर: C. पी.टी. उषा आणि ए.शरथ कमल

(nextPage)

Q6: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चे शुभंकर " फ्रिगियन कॅप्स" चे डिझाईन कोणी केले आहे? 

A. राम सुतार 

B. गिल्स डेलेरिल्स  

C. देनाटेला व्हर्से  

D. बर बेरी  

योग्य उत्तर: B. गिल्स डेलेरिल्स

फ्रेंच लेखक गिल्स डेलेरिल्स यांनी फ्रिगियन कॅप्सला शुभंकर म्हणून निवडले आहे. जे फ्रेंच क्रांतीची भावना साजरी करण्याच्या उद्देशाने आहे.     

(nextPage)

Q7: अलीकडे कोणत्या राज्याने "मुख्यमंत्री युवा कार्य प्रक्षिशण योजना" सुरु केली आहे? 

A. महाराष्ट्र  

B. उत्तर प्रदेश 

C. हरियाणा  

D. कर्नाटक 

योग्य उत्तर: A. महाराष्ट्र 

महाराष्ट्र राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची  नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी "मुख्यमंत्री युवा कार्य प्रक्षिशण योजना" सॅन २०२४-२५ या आर्थिक वर्षांपासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. बारावी, आयटीआय, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केले रोजगार उमेदवार ओंलीने नोंदणी करू शकतात.  

(nextPage)

Q8: २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे? 

A. शंकर महादेवन 

B. श्री नारायण जाधव  

C. सुरेश वाडकर  

D. डॉ. प्रदीप महाजन  

योग्य उत्तर: D. डॉ. प्रदीप महाजन  

काही महत्वाचे पुरस्कार आणि व्यक्ती: 

  1. ग्रॅमी पुरस्कार २०२४ - शंकर महादेवन 
  2. ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार २०२३- श्री नारायण जाधव 
  3. लता मंगेशकर पुरस्कार २०२३ - सुरेश वाडकर 
  4. महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४- डॉ. प्रदीप महाजन 

(nextPage)

Q9:  विम्बल्डन टेनिस स्पर्धा २०२४ महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? 

A. बार्बरा क्रीचीकोवा  

B.  जॅस्मिन पाओलिनी 

C. सेरेना विल्यम्स  

D. स्टेफि ग्राफ 

योग्य उत्तर: A. बार्बरा क्रीचीकोवा 

(nextPage)

Q10: विम्बल्डन टेनिस स्पर्धा २०२४ पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? 

A. कार्लोस अल्काराझ   

B. नोव्हाक जोकोव्हिच  

C. आंद्रे आगासी 

D. रॉड लाव्हार 

योग्य उत्तर: A. कार्लोस अल्काराझ 

जगभरात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे एकेरीच्या अंतिरम सामन्यात कार्लोस अल्काराझने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!