GK In Marathi General Knowledge In Marathi | GENERAL KNOWLDEGE - सामान्य ज्ञान | Aims Study Center

GENERAL KNOWLDEGE- सामान्य ज्ञानकोणत्याही सरकारी परीक्षेला विचारले जातील असे सामान्य ज्ञानवरचे GK प्रश्न

GK_General_knowledge_question
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानवरील प्रश्न विचारले जातात. स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा अभ्यासासाठी या व्यासपीठावर विनामूल्य सामान्य ज्ञानाचे प्रश्न व उत्तरे सहज मिळू शकतात. करंट अफेयर्स टेस्ट 2021 आणि पोलीस भरती साठी टेस्ट उपलब्ध करून दिल्या आहेत.


आज आपण सामान्य ज्ञान (GK) "टॉप 25 GK प्रश्न आणि उत्तरे वर आधारित असे महत्त्वपूर्ण प्रश्न दिले आहेत जे तुम्हाला GK प्रश्न आणि उत्तरे विषयाबद्दल RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानवरील प्रश्न कसे विचारले जातात याची कल्पना येईल. एमपीएससी, यूपीएससी, एसएससी, पीएससी, आरआरबी, एसबीआय, आयबीपीएस सारख्या स्पर्धा परीक्षामध्ये सामान्य ज्ञान प्रश्नांची नक्कीच मदत होईल.

Current Affairs 2021 : येत्याकाही महिन्यांमध्ये अनेक सरकारी विभागात भरती होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले प्रश्न हे वर्तमान परिस्थितीशी निगडित असतात. त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधील प्रश्नांचा अभ्यास जसा तुम्ही करता, त्याचप्रमाणे चालू घडामोडींच्या बाबतही तुमचे ज्ञान अदयावत असायला हवे.
GENERAL KNOWLDEGE - सामान्य ज्ञान - 01

Q. जगात सर्वप्रथम करोना विषाणू कोणत्या शहरात आढळून आला?

(अ) हाँग-काँग
(ब) वूहान✔️✔️
(क) ल्हासा
(ड) तैपेई

Q. बेनी प्रसाद वर्मा यांचे अलीकडे निधन झाले, ते कोणत्या राजकीय पक्षाचे संस्थापक सदस्य होते?

(अ) भारतीय जनता पार्टी
(ब) अखिल भारतीय काँग्रेस
(क) समाजवादी पार्टी ✔️✔️
(ड) राष्ट्रीय तृणमूल काँग्रेस

Q. अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

(अ) सोलापूर
(ब) धुळे ✔️✔️
(क) जळगाव
(ड) अहमदनगर

Q. राष्ट्रीय हरित न्याधीकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोठे सुरु करण्यात आले आहे?

(अ) औरंगाबाद
(ब) पुणे ✔️✔️
(क) नागपूर
(ड) सोलापूर

Q. नुकतेच महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(अ) संजय पांडे
(ब) बिपीन बिहारी
(क) हेमंत नगराळे ✔️✔️
(ड) सुबोधकुमार जयस्वाल

Q. भारतीय संविधान सभेत अनुसूचित जातीचे किती सदस्य होते?

(अ) 87
(ब) 33✔️✔️
(क) 47
(ड) 19

Q. भारताची राजधानी कलकत्यावरून दिल्लीला कोण नेली?

(अ) रॉबर्ट क्लाईव्ह
(ब) लॉर्ड विलिंग्टन
(क) लॉर्ड होर्डिंग (II)✔️✔️
(ड) यापैकी नाही

Q. भारतीय संविधान स्वीकृत केल्यांनतर पहिली घटना दुरुस्ती केव्हा करण्यात आली?

(अ) 1951✔️✔️
(ब) 1952
(क) 1954
(ड) 1956

Q. भारतीय वाटणावळ आणि वित्त गृहाची स्थापना कधी करण्यात आली?

(अ) 1988
(ब) 1991✔️✔️
(क) 1992
(ड) 1995

Q. सेबीचे (The Securities and Exchange Board of India) मुख्यालय कोठे आहे?

(अ) कोलकता
(ब) मुंबई ✔️✔️
(क) नवी दिल्ली
(ड) बंगलोर

Q. जागतिक व्यापार संघटना स्थापन झाली त्यावेळी सदस्य संख्या किती होती?

(अ) 164
(ब) 194
(क) 123✔️✔️
(ड) 169

Q.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

(अ) 1 जानेवारी 1945
(ब) 12 सप्टेंबर 1992
(क) 27 डिसेंबर 1945 ✔️✔️
(ड) 7 एप्रिल 1945

Q. ऑपरेशन संजीवनीअंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषधे आणि अन्नाचा पुरवठा केला आहे?

(अ) नेपाळ
(ब) म्यानमार
(क) अफगाणिस्तान
(ड) मालदीव ✔️✔️


Q. अलीकडे ए. रामचंद्रन यांचे निधन झाले असून, ते व्यवसायाने कोण होते?

(अ) अभिनेता
(ब) डॉक्टर
(क) वैज्ञानिक ✔️✔️
(ड) दिग्दर्शक

Q. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉकडाऊनच्या काळात परदेशात अडकलेल्या पर्यटकांसाठी "Stranded in India' नावाने पोर्टल सुरु केले आहे? 

(अ) गृह मंत्रालय
(ब) पर्यटन मंत्रालय ✔️✔️
(क) परराष्ट्र मंत्रालय
(ड) सामाजिक कल्याण मंत्रालय

Q.भारताच्या आयातीत खालीलपैकी कशाचे प्रमाण जास्त आहे?

(अ) सोने
(ब) खनिज तेल
(क) चहा
(ड) वरील दोन्ही अ आणि ब ✔️✔️

Q. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातून पुढीलपैकी कोणत्या वस्तूची निर्यात केली जात होती?

(अ) सोने
(ब) खनिज तेल
(क) यांत्रिक उपकरण
(ड) मसाल्याचे पदार्थ ✔️✔️

Q. पुढीलपैकी कोणते कार्य ही जागतिक व्यापार संघटनेची (World Trade Organisation) आहेत?

(अ) सदस्य देशांच्या व्यापार धोरणाचे परीक्षण करणे.
(ब) आंतरराष्ट्रीय व्यापारास प्रोत्साहन देणे.
(क) सदस्य देशातील वाद मिटविणे
(ड) वरील सर्व ✔️✔️

Q. पहिली बौद्ध धम्म परिषद अजातशत्रूने कोठे भरवली होती?

(अ) पाटलीपुत्र
(ब) राजगृह ✔️✔️
(क) कपिलवस्तू
(ड) सारनाथ

Q. आझाद हिंद सेनेचे 'विश्वास, एकता व बलिदान' ब्रीद वाक्य असून सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला 23 जानेवारी 2021 ला किती वर्षे पूर्ण होतील?

(अ) 100
(ब) 150
(क) 145
(ड) 125✔️✔️

Q. 'धनविधेयक' सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते?

(अ) राज्यसभा
(ब) लोकसभा ✔️✔️
(क) विधानपरिषद
(ड) कॅबिनेट किचन

Q. लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहात मतभेद झाल्यास राष्ट्रपती घटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार संयुक्त अधिवेशन बोलवू शकतात?

(अ) अनुच्छेद 108✔️✔️
(ब) अनुच्छेद 110
(क) अनुच्छेद 112
(ड) अनुच्छेद 202

Q. पिन कोड नंबर किती अंकाचा असतो, जो नेहमी आपण पत्ता लिहिताना वापर करतो?

(अ) चार अंकी
(ब) सहा अंकी ✔️✔️
(क) आठ अंकी
(ड) बारा अंकी

Q. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत बिनविरुद्ध निवडून आलेले राष्ट्रपती कोण?

(अ) डॉ. राजेंद्र प्रसाद
(ब) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण
(क) डॉ. नीलम संजीव रेड्डी ✔️✔️
(ड) प्रणव मुखर्जी

Q. वर्ल्ड फूड प्रोग्राम (WFP) या संस्थेला कोणत्या पुरस्काने सन्मानित करण्यात आले आहे?

(अ) नोबेल साहित्य पुरस्कार
(ब) नोबेल शांतता पुरस्कार ✔️✔️
(क) नोबेल अर्थशाश्त्र पुरस्कार
(ड) यापैकी नाही

Q. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?

(अ) गोदावरी
(ब) नर्मदा ✔️✔️
(क) तापी
(ड) महानदी

Q. यूनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे असून 2020 मध्ये यूनेस्कोला किती वर्ष पूर्ण झाले आहेत?

(अ) वर्षे 50
(ब) वर्षे 75✔️✔️
(क) वर्षे 100
(ड) वर्षे 125

Q. 'बिहू' हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे?

(अ) मणिपूर
(ब) आसाम ✔️✔️
(क) बिहार
(ड) अरुणाचल प्रदेश

Q. इ.स 1628 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केले की, मानवी शरीरात रक्त प्रवाह हृदयामुळे सुरळीतपणे चालतो?

(अ) आइजक न्यूटन
(ब) आलेक्झांडर बेल
(क) मेरी क्युरी
(ड) विलियम हार्वे ✔️✔️

Q. भारतात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते?

(अ) तामिळनाडू
(ब) आंध्र प्रदेश
(क) कर्नाटक ✔️✔️
(ड) केरळ

Q. ब्रिटिशकाळात सतीबंदीचा कायदा केव्हा पास करण्यात आला?

(अ) 1829✔️✔️
(ब) 1882
(क) 1854
(ड) 1960

Q. सम्राट अशोकाच्या शिलालेखाचे वाचन करणारा प्रथम इंग्रज कोण?

(अ) सर जॉन मार्शल
(ब) जेम्स प्रिंसेप ✔️✔️
(क) लॉर्ड वेलस्ली
(ड) रॉबर्ट क्लाईव्ह

Current Affairs 2021 : येत्याकाही महिन्यांमध्ये अनेक सरकारी विभागात भरती होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले प्रश्न हे वर्तमान परिस्थितीशी निगडित असतात. त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधील प्रश्नांचा अभ्यास जसा तुम्ही करता, त्याचप्रमाणे चालू घडामोडींच्या बाबतही तुमचे ज्ञान अदयावत असायला हवे.
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon