EURO CUP 2020। इटलीला युरो कप 2020 चे विजेतेपद | Aims Study Center

Author
By -
0

EURO CUP 2020। इटलीला युरो कप 2020 चे विजेतेपद

EURO CUP 2020

2018 च्या फुटबॉल वर्ल्डकपसाठी पात्र न ठरलेल्या इटलीने युरो कपावर आपले नाव कोरले. फायनलमध्ये इंग्लड आणि इटली 1-1 ने बरोबरीत होते. यामुळे या सामन्याला अधिकचा वेळ गेला. त्यातही गोल होऊ न शकल्याने पेनल्टी शूटआऊट झाले. या पेनल्टी शूटआऊट सोबतच इटलीने 3-2 ने विजय मिळवला. युरो चषक स्पर्धा-2020 या स्पर्धेत इटलीने एकही सामना गमवला नाही.


आतापर्यंत सर्व सामन्यांमध्ये चाहत्यांना आनंद देणारी टीम इंग्लड पेनल्टी शूटआऊट मध्ये चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाही. वर्षे 1968 नंतर प्रथमच युरो चषकावर इटलीने आपले वर्चस्व प्रस्थपित केले. सर्वप्रथम इटलीने 1968 मध्ये युरो चषक जिंकला होता त्यानंतर तब्बल 43 वर्षानंतर युरो कप स्पर्धा इटलीने दुसऱ्यांदा जिंकली. अशा प्रकारे 55 वर्षाचा दुष्काळ संपवण्याचे इंग्लडचे स्वप्न हे धुळीस मिळाले आहे. इंग्लडचा या स्पर्धेत 3-2 अशा फरकाने पराभव झाला.


इटलीचे राष्ट्रपती: सर्जिओ माटेरेला आणि विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेचा उपविजेता माटेओ बेरेट्टीनी यांनी इटली संघाच्या युरो चषक-2020 विजेते खेळाडूचे स्वागत केले.


युरो चषक-2020 ही यूरोप खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुलबॉल संघाची एक स्पर्धा आहेत. जागतिक फुटबॉल स्पर्धेतील सर्वात श्रीमंतनं स्पर्धा आहे. युफा (UEFA) ही युरोपियन फुटबॉल संस्था दार चार वर्षांनी ही स्पर्धा आयोजित करते. या स्पर्धेची सुरुवात वर्षे 1960 मध्ये झाली. एकूण 24 देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ सहभागी होतात.

1.ठिकाण: वेम्बले स्टेडियम, लंडन
2.जॉजिओ चेलिनी: (कर्णधार, इटली)
3.हॅरी केन: (कर्णधार, इंग्लड)
4.कालावधी: (11 जून ते 11 जुलै 2021)
5.विजेता संघ: इटली
6.उपविजेता संघ: इंग्लड

EURO CUP 2020 पुरस्कार खेळाडूचे नाव

1] स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू जिआनलुइगी डोनारुमा (इटली)
2] सामनावीर लिओनार्डो बानूची (इटली)
3] गोल्डन बूट ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)
4] स्पर्धेतील सर्वोत्तम युवा खेळाडू पेड्री (स्पेन)
5] सिल्वर बूट पॅट्रीक एस (झेक प्रजासत्ताक)
6] ब्रॉन्झ बूट करीम बेंझेमा (फ्रांस)
7] गोल्डन बॉल ग्यानलुइगी डी (इटली)


EURO CUP 2020 ही स्पर्धा दर चार वर्षांनी होत असते. यापुढील EURO CUP 2024 ही स्पर्धा जर्मनी येथे होणार आहे. आतापर्यंत सर्वाधिक विजेतेपद जर्मनी आणि स्पेन प्रत्येकी तीन वेळा जिंकले. EURO CUP 2016 या स्पर्धेचे विजेतेपद पहिल्यांदा पोर्तुगालने जिंकले होते. तर युरो कप या स्पर्धेचे सर्वाधिक वेळा आयोजन फ्रांस या देशाने केले आहे.

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!