Police Recruitment 2022: महाराष्ट्रात लवकरच 7 हजार पदांची नवीन पोलीस भरती | Aims Study Center

Police Recruitment 2022: महाराष्ट्रात लवकरच 7 हजार पदांची नवीन पोलीस भरती

police-recruitment-2022
पोलीस भरती 2022

Police Recruitment 2022: महाराष्ट्रात लवकरच 7 हजार पदांची नवीन पोलीस भरती. येत्या 2 महिन्यात राज्यात तब्बल 7 हजार पदांची नवीन भरती होणार आहे. या पोलीस भरती मध्ये तुम्हाला वर्दीचे स्वप्न पूर्ण कार्याचे असेल तर आताच मैदानी चाचणीची आणि लेखी परीक्षेचा अभ्यास चालू करा. एम्स स्टडी सेंटर या स्पर्धा डिजिटल मंचावर 118+ जास्त 25 गुणांच्या पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट अपलोड केल्या आहेत. या सर्व टेस्ट तुम्ही अगदी मोफत सोडवू शकता. त्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा. पोलीस भरती टेस्ट सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. आपण आरोग्य भरती, तलाठी भरती, म्हाडा क्लार्क इत्यादी परीक्षांची तयारी करत असाल तर येथे क्लिक करा. सर्व स्पर्धा परीक्षेचा आत्मा म्हणजे चालू घडामोडी या घटकाची आपली तयारी व्हावी या करिता एम्स स्टडी सेंटर स्पर्धा मंचने अगदी चालू घडामोडी सराव प्रश्नसंच हा उपक्रम सुरु केला आहे. चालू घडामोडी सराव प्रश्नसंच सोडविण्यासाठी येथे क्लिक करा  

Police Recruitment 2022: गृह विभागातर्फे ही पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. सात हजार पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती पार पडणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ही भरती जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे. लवकरच यासंबंधी जाहिरात देखील प्रसिद्ध केली जाणार आहे. त्या दृष्टीने गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे. पुढच्या दोन महिन्यात 7 हजार पदांसाठी पोलीस भरती (Police Recruitment 2022) प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली. आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती पदे रिक्त आहेत याचा तपशील गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार पुढीलप्रमाणे आहे.(पोलीस भरती संदर्भात गृहमंत्रालयाची माहिती).   

जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती पोलीस भरती?

शहर  एकूण पदे  
मुंबई 1431
नवी मुंबई 358
मीरा भाईंदर 505
लोहमार्ग मुंबई 505
गडचिरोली 415
नांदेड  128
अहमदनगर 139
बुलढाणा 117
पालघर  115
ठाणे शहर 236
पुणे शहर 182
पुणे ग्रामीण 158
नागपूर ग्रामीण  108
नागपूर शहर 153
जळगाव  154
सोलापूर ग्रामीण 145
(स्रोत: टीव्ही9 मराठी)
हे पण पहा : पोलीस भरती प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी येथे क्लिक करा 
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon