SEVUM WRD Recruitment Exams 2nd Jan 2024 Questions with Answer | Aims Study Center

Author
By -
0

SEVUM WRD Recruitment Exams 2nd Jan 2024 Questions with Answer

marathi_vyakararn
मराठी व्याकरण 

मराठी व्याकरण म्हणजेच भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असेही म्हणतात. मराठी प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये बोलली जाते. त्यामुळे शासकीय कामकाजामध्ये या भाषेचा वापर नियमित होत असतो. तसेच मराठी भाषा या घटकांवर प्रत्येक स्पर्धा परीक्षेत २५ प्रश्न विचारले जातात. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ५० प्रश्न व विचारले जात आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी मराठी भाषेचा अभ्यास करणे अनिवार्य आहे. प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून मराठी विषय अधिक सोपा व्हावा म्हणून आपण एकूण २० मराठी प्रश्न आणि त्यांचे उत्तर आपल्यापर्यंत ऑनलाईन माधमातून पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. नक्कीच या प्रश्नांनाचा आपल्याला भविष्यात फायदा होईल. आजचे प्रश्न हे SEVUM WRD Recruitment Exams 2nd Jan 2024 रोजी झालेल्या जलसंपदा विभागाच्या पेपरमधील २० प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत.

Q.1 खालील पर्याय लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा.


१. आशीर्वाद
२. आशिर्वाद
३. अशिर्वाद
४. आशीवार्द


Q.2 खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
समाप्ती



१. सत्वर
२. समंती
३. प्रारंभ
४. सांगता


Q.3 खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
जय



१. विक्रम
२. विजय
३. पराक्रम
४. पराजय


Q.4 ईश्वराची विवेकवर कृपा झाली. - 'कृपा ' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.


१. आशीर्वाद
२. जुलमी
३. अवकृपा
४. दयाळू


Q.5 खालील शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द ओळखा.


१. आशीर्वाद
२. आशिर्वाद
३. अशिर्वाद
४. आशीवार्द


Q.6 खालील पर्याय लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा.
ज्यास कोणीही शत्रू नाही असा.



१. मनकवडा
२. अजातशत्रू
३. अल्पसंतुष्ट
४. पराक्रमी


Q.7 खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
थेंबे थेंबे तळे साचे.



१. थोडे थोडे जमवीत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो.
२. पाण्याचा विपुल प्रमाणात वापर करावा.
३. जो वेळेला हजर अस्तिव त्याचा फायदा होतो.
४. अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते.


Q.8 रिकाम्या जागा भरा.


जसे गाईचे हंबरणे तसे घोड्याचे __________.



१. खिंकाळणे
२. डरकाळी
३. कावकाव
४. भूकंणे


Q.9 खालीलपैकी कोणते वाक्य लेखननियमांनुसार आहे?


१. माझ्या प्रिय देशात या कलेला कायमचे निवास्थान मिळुन तीचा उत्कर्ष व्हावा.
२. माझ्या प्रिय देशात या कलेला कायमचे नीवास्थान मिळुन तीचा उत्कर्ष व्हावा.
३. माझ्या प्रीय देशात या कलेला कायमचे निवास्थान मिळुन तीचा उत्कर्ष व्हावा.
४. माझ्या प्रिय देशात या कलेला कायमचे निवास्थान मिळून तिचा उत्कर्ष व्हावा.


Q.10 खालील वाक्यातील प्रायोजक क्रियापद ओळखा.
गुराखी कळपातील मेढ्यांना पळवितो.



१. गुराखी
२. कळपातील
३. पळवितो
४. मेंढ्यांना


Q.11 खालील पर्यायातील भूतकाळ दर्शिविणारे विधान ओळखा.


१. आजी पोथी वाचत असेन.
२. आजीने पोथी वाचली.
३. आजीने पोथी वाचत आहे.
४. आजीने पोथी वाचेल.


Q.12 खालील शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द ओळखा.
आधी जन्मलेला



१. अजात
२. अग्रज
३. अनुज
४. अपूर्व


Q.13 खालील वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा.
पेपर सोपा नव्हता.



१. पेपर अवघड नव्हता.
२. पेपर सोपा नव्हता का?
३. पेपर सोपा होता.
४. पेपर अवघड होता.


Q.14 खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे?
अभाळ भरून आले आणि मोर नाचू लागले.



१. समुच्चयबोधक
२. न्यूनत्वबोधक
३. विकल्पबोधक
४. परिणामबोधक


Q.15 खालील पर्यायातील रीति भूतकाळ दर्शविणारे विधान ओळखा.


१. माझ्या अंगणात चिमणी चिवचिवत आहे.
२. माझ्या अंगणात रोज सकाळी चिमणी चिवचिवत होती.
३. माझ्या अंगणात रोज सकाळी चिमणी चिवचिवत असेन.
४. माझ्या अंगणात रोज सकाळी चिमणी चिवचिवत असे.


Q.16 खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले.



१. आपले काम सोडून दुसऱ्याचे काम करण्यास जाणे.
२. दोन्हीकडून फायदा व्हावा म्हणून प्रयत्न करणे, पण शेवटी निराशाच पदरी पडणे.
३. अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट.
४. आपले नुकसान होत आहे तरीही लाचारीने शांत राहणे अशी परिस्थिती.


Q.17 खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
श्रीगणेशा



१. प्रारंभ
२. आरंभ
३. इतिश्री
४. श्रेष्ठ


Q.18 अंगीकार करणे या वाक्यप्रकारचा योग्य अर्थ सांगा.


१. स्वीकार करणे
२. कार्यपूर्ण करणे
३. कसोटी पाहणे
४. सोडून देणे


Q.19 खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
गाडी चालवताना 'वाहन चालवण्याचा परवाना' सोबत असणे आवश्यक आहे.



१. केवळ वाक्य
२. संयुक्त वाक्य
३. आज्ञार्थी वाक्य
४. मिश्र वाक्य


Q.20 खालीलपैकी 'अत्यंत जुना काळ' या अर्थाचा असलेला शब्द शोधा.


१. श्रेय
२. वैशिष्ठ्यपूर्ण
३. प्रागैतिहासिक
४. कर्तेपण
 
SEVUM WRD Recruitment Exams 2nd Jan 2024 Questions with Answer | उत्तरतालिका


Q 1. उत्तर : १
Q 2. उत्तर : २
Q 3. उत्तर : ४
Q 4. उत्तर : ४
Q 5. उत्तर : ३
Q 6. उत्तर : २
Q 7. उत्तर : १
Q 8 उत्तर : १
Q 9. उत्तर : ४
Q 10. उत्तर : ३
Q 11. उत्तर : २
Q 12. उत्तर : २
Q 13. उत्तर : ४
Q 14. उत्तर : १
Q 15. उत्तर : ४
Q 16. उत्तर : २
Q 17. उत्तर : ३
Q 18. उत्तर : १
Q 19. उत्तर : १
Q 20. उत्तर : ३
 
#TCS_Papers
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!