Police Bharti Online test 25 marks | स्पेशल मुंबई पोलीस भरती मोफत टेस्ट सिरीज | Aims Study Center

Police Bharti Online test 25 marks | स्पेशल मुंबई पोलीस भरती मोफत टेस्ट सिरीज 2024

police_bharti_2024
Police Bharti Test 2024

Police Bharti Online test 25 marks प्रश्न आणि उत्तरे, हाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पोलिसांची भरती करणे ही शासनाची जबाबदारी आहे.

पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police bharti online test 25 marks) #policebhartionlinetest

Police Bharti Online test 25 marks : मिशन खाकी टेस्ट सिरीज 2024 ONLINE Test Series
-: पेपर स्वरूप :-
1) मराठी : 25 प्रश्न
2) गणित : 25
3) बुद्धिमत्ता : 25
4) सामान्य ज्ञान : 25

प्रश्न १ : भाववाचक नाम साधण्यासाठ खालीलपैकी कोणता प्रत्यय वापरला जात नाही? 
(१) गिरी, त्व
(२) ता,कि 
(३) वा, आई 
(४) वरील सर्व 

प्रश्न २ : खालिलपैकी कोणते व्यंजनसंधीचे उदाहरण आहे? 
(१) तपोधन 
(२) चिदानंद  
(३) महर्षी 
(४) सूर्यास्त 

प्रश्न ३ : खालील वाक्य वाचून शब्दयोगी अव्यये असलेले वाक्य निवडा.  
(१) तूं वर ये. 
(२) टेबलाखाली कुत्रा आहे.  
(३) त्याने पाय वर केले. 
(४) पूर्वी मांजर फार होते. 

प्रश्न ४ : तो अभ्यास करत असे. या वाक्यातील काळ ओळखा. 
(१) अपूर्ण भूतकाळ  
(२) पूर्ण भूतकाळ   
(३) रीती भूतकाळ  
(४) साधा भूतकाळ  

प्रश्न ५ : आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. या वाक्याचा प्रकार ओळखा.  
(१) मिश्र वाक्य  
(२) संयुक्त वाक्य   
(३) केवळ वाक्य 
(४) आज्ञार्थी वाक्य 

प्रश्न ६ : विश्वविजेता वर्ल्ड चेस चॅम्पियनशीप २०२४ स्पर्धेचा विजेता कोणता देश ठरला आहे? 
(१) चीन 
(२) जपान   
(३) आस्ट्रेलिया  
(४) भारत 

प्रश्न ७ : विश्वविजेता वर्ल्ड चेस चॅम्पियनशीप २०२४ स्पर्धेचा सर्वात युवा जगज्जेता खेळाडू कोण? 
(१) मिखाईल ता 
(२) डी गुकेश   
(३) मॅग्नस कार्लसन   
(४) इम्युएल लास्कर 

प्रश्न ८ :पर्सन ऑफ द इयर २०२४ पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? 
(१) टेलर स्विप्टची 
(२) वोलोदीमीर झेलेन्स्की 
(३) एलोन मस्क  
(४) डोनाल्ड ट्रम्प 

प्रश्न ९ : घरचोळा म्हणजेच घरात परिधान केलेले कपडे यासाठी २३ वा GI टॅग कोणत्या राज्याला मिळाला आहे? 
(१) राजस्थान  
(२) गुजरात   
(३) कर्नाटक   
(४) महाराष्ट्र 

प्रश्न १० : युनाटेड नेशन्स इन्व्हायर्मेट प्रोग्रामतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'चॅम्पियन ऑफ द अर्थ २०२४'  जीवनगौरव कोणाला जाहीर झाला आहे? 
(१) डोनाल्ड ट्रम्प 
(२) नरेंद्र मोदी  
(३) डॉ.माधव गाडगीळ   
(४) अशोक सराफ 

प्रश्न ११ : भारतीय रिझर्व्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर कोण आहेत? 
(१) संजय मल्होत्रा 
(२) शक्तिकांत दास  
(३) अरविंद मेहता   
(४) संजय वर्मा 

प्रश्न १२ : पालघर जिल्हा कोणत्या वर्षी निर्माण झाला? 
(१) 1998 
(२) 1999
(३) 1982  
(४) 2014 

प्रश्न १३ :महाराष्ट्रात गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? 
(१) चंद्रपूर  
(२) पेंच नागपूर   
(३) अमरावती   
(४) गोंदिया 

प्रश्न १४ : भारताचे मध्यवर्ती स्थान काय आहे? 
(१) पूर्व आणि पश्चिम आशिया 
(२) उत्तर आणि पश्चिम आशिया   
(३) पूर्व आणि दक्षिण आशिया   
(४) उत्तर आणि पूर्व आशिया 

प्रश्न १५ : खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही? 
(१) सीना  
(२) मान    
(३) भामा   
(४) तेरणा   

प्रश्न १६ : 2011 च्या जनणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या घनता कोणत्या जिल्ह्याची आहे? 
(१) वाशीम 
(२) हिंगोली    
(३) गोंदिया   
(४) अमरावती 

प्रश्न १७ : महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या वनांनी व्यापलेले आहे? 
(१) काटेरी वने  
(२) पानगळ वने   
(३) दलदलीची वने   
(४) यापैकी नाही 

प्रश्न १८ : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ने १९९१ मध्ये भारताला मदत देण्यासाठी कोणती अट ठेवली होती? 
(१) आयात वाढ 
(२) निर्यात वाढ    
(३) भारतीय रुपयाचे अवमूल्यन   
(४) वरील सर्व 

प्रश्न १९ : जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोणत्या समितीचे _________ सचिव म्हणून काम पाहतात? 
(१) अस्थायी समिती 
(२) स्थायी समिती    
(३) शिक्षण समिती   
(४) वित्त समिती

प्रश्न २० : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या स्थापनेशी संबंधित असणारा अधिनियम कोणता आहे? 
(१) अधिनियम 1958 
(२) अधिनियम 1961    
(३) अधिनियम 1988  
(४) अधिनियम 1950

प्रश्न २१ : 560 रु. चे 12.5% म्हणजे किती? 
(१) 35 रु. 
(२) 70 रु.    
(३) 140 रु.  
(४) 210 रु.

प्रश्न २२ : 16.67%  चे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. 
(१) 1/6 
(२) 1/4   
(३) 4  
(४) 2/5

प्रश्न २३ : द.सा.द.शे. 15% वार्षिक दराने 1600 रु. चे 2 वर्षाचे सरळव्याज?  
(१) रु. 240
(२) रु. 180   
(३) रु. 480  
(४) रु. 144

प्रश्न २४ : 8000 रु. चे 8% वार्षिक दराने 2 वर्षाचे चक्रवाढव्याज किती?  
(१) रु. 1331.2000
(२) रु. 1357.5000   
(३) रु. 2257.2000  
(४) रु. 1194.1500

प्रश्न २५ : दिलेल्या संख्यामालिकेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.   
2, 8, 26, 80, ?

(१) 262
(२) 416  
(३) 276  
(४) 242
उत्तरे पाहा 

Police Bharti Online test 25 marks | स्पेशल मुंबई पोलीस भरती मोफत टेस्ट सिरीज 2024 चे प्रश्न आणि उत्तरे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon