श्रीराम बाळकृष्ण लागू-मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक | Aims Study Center

Author
By -
0

श्रीराम बाळकृष्ण लागू-मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक

श्रीराम बाळकृष्ण लागू

श्रीराम बाळकृष्ण लागू: (जन्म 16 नोव्हेंबर, इ.स. 1927 व मृत्यू: 17 डिसेंबर, 2019 पुणे)
पिता- डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू
माता- सत्यभामा लागू.
पत्‍नी- दीपा लागू (नाट्यअभिनेत्री)

परिचय: श्रीराम बाळकृष्ण लागू हे मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक होते. देवाला रिटायर करा अशी आरोळी ठोकत त्यांनी पुरोगामी आणि आणि त्यांच्या मते तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला आहे. ते विज्ञानवादी आणि समाजवादी होते. देवाच्या नावाने व्यापार करणारे धूर्त लोक हे समाजचे शत्रू आहेत हे ते स्पष्टपणे सांगतात, ते महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडलेले होते.


मराठी चित्रपट: सामना (1974), पिंजरा (1972), सिहांसन (1980): हिंदी चित्रपट: अनकही, अरविंद देसाई की अजिब दास्तान, एक दिन अचानक, कमजोर, घरोंदा, फुल खिळे है गुलशन गुलशन, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, सरगम, सैतान

पुरस्कार: फिल्मफेयर (1978) , संगीत नाटक अकादमी फेलोशिप (2010)

नाट्य अभियानाला सुरुवात: (1969): भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी 1969 मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली.


शिक्षण: श्रीराम बाळकृष्ण लागू यांच्या शिक्षणाला सुरुवात पुणे येथून झाली. प्राथमिक शिक्षण भावे हायस्कूल व महाविद्यालय शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली. 1950 च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात 5 वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. 1960 च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता.


श्रीराम लागू यांचे विचार: श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे होते.सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते. नंतर 'देवाला रिटायर करा' नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निष्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहिले होते.

अंधविश्वास निर्मूलन समिती: ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले होते . देव हा सुद्धा एक अंधविश्वासासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. ते विज्ञानवादी आणि समाजवादी होते.. सुशिक्षित लोकसुद्धा नवस वगैरे करतात हे पाहून त्यांना वाईट वाटते. आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार असतो आणि आपले ध्येय साध्य करायचे आपल्याच हातात असते, असा विचार तरूण पिढीला डॉ. लागू नेहमी सांगत असतात.

आपल्या देशातील अंधश्रद्धा गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे लवकर नाहीशी होणार नाही याची त्यांना चिंता वाटते. आता तर बुवाबाजीमुळे परमेश्वराचे बाजारीकरण झालेले आहे हे त्यांना स्पष्ट दिसते. देवाच्या नावाने व्यापार करणारे धूर्त लोक हे समाजचे शत्रू आहेत हे ते स्पष्टपणे सांगतात. आता तर बुवाबाजीमुळे परमेश्वराचे बाजारीकरण झालेले आहे हे त्यांना स्पष्ट दिसते.

अशा थोर मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक व नटसम्राट श्रीराम लागू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!