World Population Day 11 July: जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै याबद्दल माहिती | Aims Study Center

Author
By -
0

 World Population Day 11 July: जागतिक लोकसंख्या दिन11 जुलै याबद्दल माहिती

jagtik-loksankhya-din-2021
       WORLD POPULATION DAY 11 JULY     

जागतिक लोकसंख्या दिन या दिवशी म्हणजेच ११ जुलै १९८७ रोजी जगाची लोकसंख्या ५ अब्ज झाली होती. वाढती लोकसंख्या कशाप्रकारे नियंत्रणात आणता येईल याची दखल युनोने वर्ष १९८७ साली घेतली आणि लोकांमध्ये लोकसंख्या वाढीबद्दल जागृती करण्यासाठी "जागतिक लोकसंख्या दिन" साजरा करण्याचे ठरवले. पहिला जागतिक लोकसंख्या दिन वर्ष १९८९ पासून साजरा करण्यात येऊ लागला. या दिवशी कुटूंबनियोजन, गरिबी लैंगिक समानता, नागरी हक्क आदी विषयांची चर्चा केली गेली.

जगाची लोकसंख्या एक अब्ज होण्यासाठी हजारो वर्षे लागली पण, त्यानंतर अवघ्या दोनशे वर्षात सात अब्ज पर्यंत लोकसंख्या वाढ झाली. या लोकसंख्या वाढीच्या समस्या म्हणजेच गरिबी वाढू लागली आणि त्यामुळे स्थलांतरामध्ये वाढ झाली. त्याच बरोबर लैंगिक समानता आदी समस्या उदभवू लागल्या आहेत. लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी अनेक देशाने पावले उचली यामध्ये भारतात मध्ये सरकारी नोकरीसाठी दोन अपत्य असणे आवश्यक अशी अट घातली आहे. (सध्याला जपान आणि चीन हे देश लोकसंख्या वाढीसाठी जी अट घातली आहे. ती स्थितील करण्यासाठी पावले उचलीत आहेत) 

जागतिक लोकसंख्या वाढीचे टप्पे:(वर्ष आणि लोकसंख्या वाढ) 
  1. 1804: 01 अब्ज 
  2. 1927: 02 अब्ज 
  3. 1960: 03 अब्ज 
  4. 1974: 04 अब्ज 
  5. 1987: 05 अब्ज 
  6. 1999: 06 अब्ज 
  7. 2011: 07 अब्ज 
जगाची लोकसंख्या २०११ मध्ये सात अब्ज होती. आता ती सुमारे ९.७ अब्ज इतकी आहे. आता पर्यंतच्या लोकसंख्या वाढीच्या वेगाचा अभ्यास केला असतात असे असे लक्षात येते की, पुढील काही वर्षात पुढीलप्रमाणे लोकसंख्या वाढ होऊ शकते.
वर्ष  जगाची लोकसंख्या (अब्ज) 
२०३० ८.५
२०५०  ९.७
२१००  १०.९
सर्वात जास्त लोकसंख्या असलेले देश: चीन, भारत अमेरिका, नायजेरिया, ब्राझील आणि बांग्लादेश या देशांची लोकसंख्या जास्त आहे.  चीनची लोकसंख्या १८.४७ टक्के, भारताची लोकसंख्या १७.७० टक्के आणि अमेरिकेची लोकसंख्या ४.७ टक्के आहे 
लोकसंख्या वाढीचे काही कारणे: 
  1. जन्मदरापेक्षा मृत्युदरामध्ये घट 
  2. प्रजनन दरामध्ये बदल 
  3. नागरीकरणामध्ये वाढ 
  4. स्थलांतरमध्ये वाढ इत्यादी
भारतातील लोकसंख्येबद्दल परीक्षेच्या दृष्टीने माहिती: 
भारतात दर १० वर्षांनी लोकसंख्या जनगणना होते. पहिली जनगणना स्वातंत्रपूर्व काळात म्हणजे इ.स १८७२ मध्ये झाली होती. त्यानंतर नियमित लोकसंख्या जनगणना दर १० वर्षांनी होत असते. आता २०२१ मध्ये भारताची लोकसंख्या जनगणना होईल. या आगोदर १५ वी लोकसंख्या २०११ मध्ये झाली. ही स्वातंत्र्यानंतरची ७ वी जनगणना होती. सन २०२१ मध्ये होणारी भारताची लोकसंख्या जनगणना ही स्वातंत्र्यानंतची ८ वी जनगणना असेल तर भारताची आतापर्यंतची एकूण १६ वी जनगणना होणार आहे. 

युनाइटेड नेशन्सने सन १९७४ हे वर्ष  "आंतरराष्ट्रीय लोकसंख्या वर्ष" म्हणून जाहीर केले. 
जागतिक लोकसंख्या दिन २०२१ ची थीम
"Rights And Choices Are the Answer: Whether baby boom or bust, the solution to shifting fertility rates lies in prioritising all people's reproductive health and rights"
"२०३० पर्यंत शाश्वत विकासाचे उद्दिष्ट हे जगामधील सर्वांच्या उत्तम भविष्यासाठीची ब्लू-प्रिंट आहे. हे उद्दिष्ट साधत करताना त्याचा लोकसंख्यावाढ, वृद्धत्व, स्थलांतर, शहरीकरण यांच्यासह बदलते जनसांख्यकी यांच्याशी जवळचा संबंध आहे." 
-अँटीनियो गुटेरस, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्र

(सौजन्य:विकिपीडिया आणि महाराष्ट्र टाइम्स)

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!