Milkha Singh- 'फ्लाईंग सीख' मिल्खा सिंग यांच्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती | Aims Study Center

Milkha Singh- 'फ्लाईंग सीख' मिल्खा सिंग यांच्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती

फ्लाईंग सीख' मिल्खा सिंग

Milkha Singh- भारताचे माजी दिग्गज धावपटू "फ्लाईंग सीख" मिल्खा सिंग यांचे कोरोना संक्रमणांमुळे नुकतेच निधन झाले असून त्यांचा जन्म भारत आणि पाकिस्तान विभाजन होण्यापूर्वी म्हणजेच आताच्या पाकिस्तानात (जिल्हा मुझ्झफरगड) गोविंदपूरा, येथे 20 नोव्हेंबर 1929 रोजी झाला होता. त्यानंतर ते भारतात आले. भारताचे माजी दिग्गज धावपटू म्हणून ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे दिनांक 18 जून 2021 ला भारतात निधन झाले आहे. मिल्खा सिंग हे आपल्या कर्तव्यावरून आर्मीमधून कॅप्टन (ऑनररी) पदावरून निवृत्त झाले होते. तसेच क्रीडा व युवक सेवा पंजाब संस्थे मध्ये संचालक म्हणून रुजू होते आणि वर्षे 1998 ला ते तेथून निवृत्त झाले होते. त्याच्या जीवनप्रवासाबद्दल आजच्या लेखात आपण त्यांच्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत.


पत्नीचे नाव: निर्मल कौर (भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार, मृत्यू जून, 2021). मुलगा: जीव मिल्खा सिंग(भारताचा स्टार गोल्फर), मुली: मोना, अलिझा आणि सोनिया

फ्लाईंग सीख ही उपाधी कोणी दिली?1960 मध्ये लाहोर येथे झालेल्या "इंडिया-पाकिस्तान-इराण स्पर्धेत अब्दुल खलीकला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानात भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या मिल्खा सिंग यांना पाकिस्तानचे राष्ट्रपती/ जनरल आयुब खान यांनी "फ्लाईंग सीख" ही उपाधी/ 'किताब जाहीर केला होता. भारताचे माजी दिग्गज धावपटू असलेले मिल्खा सिंग यांचे 91 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारताने महान असा दिग्गज धावपटू गमविला असे म्हणतात येईल. त्यांच्या या जीवन प्रवासाबरोबरच त्यांच्या कार्याविषयी माहिती घेऊ.



फ्लाईंग सीख- मिल्खा सिंग यांचे विक्रम:
राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा वर्ष
बंगळूर-200 व 400 मीटर सुवर्ण 1957
कटक (राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतचा भाग) 200 व 400 मीटर सुवर्ण 1958
त्रिवेंद्रम- 200 व 400 मीटर सुवर्ण 1959
दिल्ली- 100, 200 व 400 मीटर सुवर्ण1960
जालंधर- 400 मीटर सुवर्ण1961 
दिल्ली- 400 मीटर सुवर्ण1963
कोलकत्ता- 400 मीटर रौप्य (माखन सिंगकडून पराभूत)1964
वैयक्तिक सर्वोत्तम वेळ:
100 मीटर: 10.4 सेकंद (आर्मी दक्षिण विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धा पुणे- 1960)
200 मीटर: 20.7 सेकंद (इंडिया-इराण-पाकिस्तान ॲथलेटिक्स स्पर्धा, लाहोर- 1960)
400 मीटर: 45.6 सेकंद (नंतर 45.73 सेकंद) (रोम ऑलम्पिक,1960)


फ्लाईंग सीख" मिल्खा सिंग यांचे प्रमुख आंतरराष्ट्रीय पदके:
1958: कार्डिफ- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा- 400 मीटर यार्डमध्ये सुवर्ण, 4 X 400 यार्ड रिलेत पाचवे स्थान
1958: टोकियो आशियाईक्रीडा स्पर्धा- 200 व 400 मीटर सुवर्ण (4 X 400 रिलेत प्रथम आल्यानंतर भारतीय संघ अपात्र ठरला होता.)
1962: जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धा- 400 मीटर व 4 X 400 रिले सुवर्ण


ऑलम्पिक्स:
1956: मेलबॉर्न- 200 व 400 मीटर
1960: रोम- 400 मीटर- चौथे स्थान- 45.6 सेकंद
1964: टोकियो 4 X 400 रिले


फ्लाईंग सीख" मिल्खा सिंग यांच्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती:
( A). कॉमनवेल्थ गेम्स मध्ये एकल गोल्ड मेडल जिंकणारे पहिले भारतीय धावपटू.
(B). 400 मीटर: 45.6 सेकंद (नंतर 45.73 सेकंद) (रोम ऑलम्पिक,1960) मध्ये चौथे स्थान पटकावले. हा नॅशनल रेकॉर्ड 40 वर्षे कोणी ही मोडू शकलं नाही. याच रोम ऑलम्पिक मध्ये मिल्खा सिंग यांचे 0.1 सेकंदाच्या फरकाने ब्रॉन्झ पदक हरले.
(C). 1959 मध्ये साली मिल्खा यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
(D). 2001 मध्ये मिल्खा सिंग यांना अर्जुन अवॉर्ड घोषित करण्यात आला होता. जो त्यांनी 40 वर्षानंतर आता खूप उशीर आला आहे असे म्हणत स्वाभिमानाने नकार दिला.
(E). आत्मचरित्र: द रेस ऑफ माय लाईफ
(F). मिल्खा सिंग यांच्या नावावर जीवनपट : भाग मिल्खा भाग (फरहान अख्तरने त्यांची भूमिका केली आहे)
(G). मिल्खा सिंग ट्रस्ट 2003 मध्ये स्थापन.


अशा प्रकारे मिल्खा सिंग व त्यांच्या पत्नीच्या आत्म्याला शांतो लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon