Global Hunger Index 2021- जागतिक भूक निर्देशांक 2021: भारत 101 व्या स्थानी | Aims Study Center

Author
By -
0

Global Hunger Index 2021- जागतिक भूक निर्देशांक 2021: भारत 101 व्या स्थानी

india-got-101
Global Hunger Index-2021

जागतिक भूक निर्देशांक 2021: भारत 101 व्या स्थानी, एका वर्षात सात स्थानांनी घसरण, 27.2 गुणांसह भारताची परिस्थिती मध्यम ते गंभीर. दरवर्षी हा अहवाल संयुक्तपणे एजन्सी कन्सर्न वर्ल्डवाइड (आयर्लंड) आणि वेल्ट हंगर हिल्फे (जर्मनी) यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात येतो. जागतिक भूक निर्देशांक-2020 मध्ये भारत 117 देशांपैकी 94 व्या स्थानावर होता. 

यंदाच्या अहवालात भारताचे स्थान सात स्थानांनी घसरून 101 व्या स्थानी आले आहे. भारताशेजारील देश पाकिस्तान (88), बांग्लादेश (76), नेपाळ (76), म्यानमार (71) आणि चीन अव्वल स्थानी आहे. भारतात चाइल्ड वेस्टिंग दर सर्वाधिक आहे. वर्ष 2016 ते 2020 या वर्षा दरम्यान चाइल्ड वेस्टिंग दर 17.3% होता.
या अहवालानुसार भारतात खालील सुधारणांच्या कमतरतेमुळे कुपोषणाचे प्रमाण वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 
1) बाल मृत्यूच्या प्रमाणात वाढ
2) बाल मृत्युदर वाढ
3) अपुऱ्या अन्नामुळे
जागतिक भूक निर्देशांक 2021 नुसार सर्वाधिक भुकेची समस्या असणारा देशामध्ये सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक देशाचा क्रमांक लागतो (117 वा) या प्रमाणे पुढील देशांमध्ये सर्वाधिक कुपोषण आढळून येत आहे. सिटरा, लिओन, युगांडा, जिबोटी, कांगो, सुदान, अफगाणिस्तान, झिम्बाबे, तिमोर लेस्टे, हैती, लायबोरिया, झंबिया, मादागास्कर, चाड आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक
जागतिक भूक निर्देशांक तयार करण्यासाठी चार बाबींचे निरीक्षण केले जाते? 
1) कुपोषण
2) अल्प पोषण
3) मुलांच्या वाढीचा दर
4) बाल मृत्यूशी संबधित
जागतिक भूक निर्देशांक 2021 नुसार चीन, ब्राझील आणि कुवैतसह 18 देशांचा पाचपेक्षा कमी जागतिक भूक निर्देशांक आहे.
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!