Padma Awards 2022: पद्म पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना जाहीर व संपूर्ण यादी | Aims Study Center

Author
By -
0

Padma Awards 2022: पद्म पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना जाहीर व संपूर्ण यादी

padma-awards-2022
Padma Awards 2022

Padma Awards 2022: या वर्षीचे पद्म पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली असून महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एकूण 128 पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. या मध्ये कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि आभियांत्रिकी क्षेत्र, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य व शिक्षण, खेळ, सिव्हिल सर्व्हिस इत्यादी.

दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एकूण 128 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या मध्ये सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली. कला क्षेत्रातून प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच संरक्षण क्षेत्रातून भारताचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सोनू निगम, लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.


Padma Awards 2022: यंदाच्या पद्म पुरस्कारामध्ये 4 जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहे तर 17 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले असुन पद्मश्री पुरस्कार 107 जणांना जाहीर झाले आहेत. या वर्षी जाहीर झालेल्या 2 जोडी प्रकरणांसह 128 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास महामहिम राष्ट्रपती महोदयांनी मान्यता दिली आहे. पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी 34 महिला आहेत. तसेच या पद्म पुरस्कारांमध्ये परदेशी/ NRI/PIO/OCI या श्रेणीतील 10 व्यक्ती आणि 13 मरणोत्तर पुरस्कारप्राप्त व्यक्तींचाही समावेश आहे. आपण सर्व 128 पद्म पुरस्कारांची यादी खालीलप्रमाणे दिली आहे.




महाराष्ट्रातील दहा व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यांचे नावे पुढील प्रमाणे:
1) डॉ.हिंमतराव बावस्कर
2) डॉ.बालाजी तांबे (मरणोत्तर)
3) डॉ.विजयकुमार डोंगरे
4) सोनू निगम
5) अनिलकुमार राजवंशी
6) सुलोचला चव्हाण
7) डॉ.भीमसेन सिंगल
8) प्रभा अत्रे
9) नटराजनचंद्र शेखरन
10) सायरस पूनावाला

Padma Awards 2022: 2022 सालातील संपूर्ण पद्म पुरस्कारांची यादी: यंदाच्या पद्म पुरस्कारामध्ये 4 जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहे तर 17 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले. तर पद्मश्री पुरस्कार 107 जणांना जाहीर झाले आहेत.

पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींची यादी:(एकूण: 4)
1) प्रभा अत्रे ( कला)
2) कल्याण सिंग (सार्वजनिक व्यवहार- मरणोत्तर)
3) जनरल बिपीन रावत (सिव्हील सर्व्हीसेस- मरणोत्तर)
4) राधेश्याम खेमका (साहित्य- मरणोत्तर)


पद्मभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींची यादी:(एकूण: 17)
1) बुद्धदेव भट्टाचार्य
2) गुलाब नबी आझाद
3) गुरमित बावा (मरणोत्तर)
4) व्हिक्टर बॅनर्जी
5) नटराजन चंद्रशेखरन
6) मधुर जेफरी
7) क्रिष्ण इला व सुचित्रा इला
8) राशीद खान
9) देवेंद्र झांजरीया
10) राजीव मेहरश्री
11) सुंदरंजन पिचाई
12) सायरस पुनावाला
13) संजया राजाराम (मरणोत्तर)
14) प्रतिभा रे
15) स्वामी सच्चिदानंद
16) वशिष्ठ त्रिपाठी
17) सत्य नारायण नडेला




पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे नाव व राज्य यादी:( एकूण : 107)
1) श्री. प्रल्हाद राय अग्रवाल, प. बंगाल
2) श्री. नजमा अख्तर, दिल्ली
3) श्री.सुमीत अंतील, हरियाणा
4) श्री.टी. सेंका आवो, नागालँड
5) कामलीनी अस्थाना आणि नलिनी अस्थाना, उत्तर प्रदेश
6) श्री.सुब्बाना अय्यापण, कर्नाटक
7) श्री. जे.के.बजाज, दिल्ली
8) श्री. सिरपी बालासुब्रमण्यम, तामिळनाडू
9) श्रीमद बाबा बलिया, ओडिशा
10) संघमित्रा बंधोपाध्यय, पं बंगाल
11) माधूरी भरठवाल, उत्तरांखड
12) श्री.अखोने असगर अली बशारत, लडाख
13) डॉ. हिम्मतराव बावस्कर, महाराष्ट्र
14) श्री.हरमोहिंदर सिंग बेदी, पंजाब
15) श्री.प्रल्हाद भगत, ओडिसा
16) श्री.एस.बालेश भजंत्री, तामिळनाडू
17) श्री.खांडू वांगचूक भूतिया, सिक्कीम
18) श्री.मारिया ख्रिस्तोफर बायरस्की, पोलंड
19) आचार्य चंदनजी, बिहार
20) सुलोचना चव्हाण, महाराष्ट्र
21) श्री. नीराज चोप्रा, हरियाणा
22) शंकुतला चौधरी,आसाम
23) श्री. शंकरनारायण मेनन चुनडेयील, केरळ
24) श्री.एस.दामोदर, तामिळनाडू
25) श्री. फैसल अली दर, जम्मू आणि काश्मीर
26) श्री.जगजीत सिंग दरदी, चंदीगड
27) डॉ.पोकर दासगुप्ता, युनाटेड किंग्डम
28) श्री.आदित्य प्रसाद दास, ओडिशा
29) डॉ.लता देसाई, गुजरात
30) श्री.मळजी भाई देसाई, गुजरात
31) बसंती देवी, उत्तराखंड
32) लौरेमबम बिनो देवी, मणिपूर
33) मुक्तामनी देवी, मणिपूर
34) श्यामामणी देवी, ओडिसा
35) श्री.खलील धांतेज्वी, गुजरात
36) श्री.सवाजी भाई ढोलकिया, गुजरात
37) श्री.अर्जुन सिंग ध्रुवे, मध्य प्रदेश
38) डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे, महाराष्ट्र
39) श्री.चंद्रप्रकाश द्विवेदी, राजस्थान
40) श्री. ज्ञानेश्वर इंगती, आसाम
41) श्री.ओम प्रकाश गांधी, हरियाणा
42) श्री.नरसिम्हा राव गरिकापती, आंध्र प्रदेश
43) श्री.गिरधरी राम गोंजू, झारखंड
44) श्री.साईबल गुप्ता, बिहार
45) श्री.नरसिंग प्रसाद गुरु, ओडिसा
46) श्री.गोसावीडू शेख हसन, आंध्र प्रदेश
47) श्री.रायको हिरा, जपान
48) सोसाम्मा इपे, केरळ
49) श्री.अवध किशोरे जडीया, मध्य प्रदेश
50) सोवकार जानकी, तामिळनाडू
51) तारा जौहर, दिल्ली
52) वंदना कटारिया, उत्तराखंड
53) श्री.एच.आर. केशवमुर्थी, कर्नाटक
54) श्री.रूटगेर कोर्टनहोर्स्ट,आर्यलँड


55) श्री.पी.नारायण कुरूप, केरळ
56) अवनी लेखरा, राजस्थान
57) श्री.मोती लाल मदन, हरियाणा
58) श्री. शिवनाथ मिश्रा, उत्तर प्रदेश
59) डॉ.नरेंद्रनाथ प्रसाद मिश्रा, मध्य प्रदेश
60) श्री.दर्शनम मोगीलैआह, तेलंगणा
61) श्री.गुरुप्रसाद मोहापात्रा, दिल्ली
62) श्री.थाविल कोंगमपटू,ऐ.व्ही.मुरुगैयन,पदुचेरी
63) आर.मुथुकान्नाम्माल, तामिळनाडू
64) श्री.अब्दूल कादेर नडाकात्तीन, कर्नाटक
65) श्री.अमाई महालिंगा नाईक, कर्नाटक
66) श्री.त्सेरिंग नामग्याल,लडाख
67) श्री.ऐ.के.सी नटराजन, तामिळनाडू
68) श्री.व्ही.एल.न्घाका, मिझोराम
69) श्री.सोनू निगम, महाराष्ट्र
70) श्री.राम सहाय पांडे, मध्य प्रदेश
71) श्री.चिरापत प्रपांडाविद्या, थायलंड
72) के.व्ही.राबिया, केरळ
73) श्री.अनिलकुमार राजवंशी, महाराष्ट्र
74) श्री.शीश राम, उत्तर प्रदेश
75) श्री.रामचंद्रह, तेलंगणा
76) डॉ.शुंकरा वैंकटा आदिनारायण राव, आंध्र प्रदेश
77) गामित रामिलाबेन रायसिंगभाई, गुजरात
78) पद्माजा रेड्डी, तेलंगणा
79) गुरू टुल्कू रीनपोचे, अरुणाचल प्रदेश
80) श्री.ब्रम्हानंद संखवालकर
81) श्री.विद्यानंद सारेक, हिमाचल प्रदेश
82) श्री.काली पाडा सारेन, पं. बंगाल
83) डॉ.वीरस्वामी सेशीअह, तामिळनाडू
84) प्रभाबेन शाह, दादरा, नगर हवेली आणि दमन आणि दिव
85) श्री.दिलीप शहानी, दिल्ली
86) श्री.राम दयाल शर्मा, राजस्थान
87) श्री.विश्वमुर्ती शास्त्री, जम्मू आणि कश्मीर
88) तातिअना ल्वोवना शौम्यान, रशिया
89) श्री.सिद्धालिंगाह, कर्नाटक
90) श्री.काजी सिंग,पं. बंगाल
91) श्री.कोंसम इबोमचा सिंग, मणिपूर
92) श्री.प्रेम सिंग, पंजाब
93) श्री.सेठ पाल सिंग, उत्तर प्रदेश
94) विद्या विंदू सिंग, उत्तर प्रदेश
95) बाबा इकबाल सिंग जी, पंजाब
96) डॉ.भिमसेन सिंघल, महाराष्ट्र
97) श्री. शिवानंदा, उत्तर प्रदेश
98) श्री.अजय कुमार सोनकर, उत्तर प्रदेश
99) अजीता श्रीवास्तव, उत्तर प्रदेश
100) सदगुरू ब्रम्हेशानंद आचार्य स्वामी, गोवा
101) डॉ.बालाजी तांबे, महाराष्ट्र
102) श्री.रघुवेंद्र तन्वर, हरियाणा
103) डॉ. कमलाकर त्रिपाठी, उत्तर प्रदेश
104) ललीता वकील, हिमाचल प्रदेश
105) दुर्गा बाई व्याम, मध्य प्रदेश
106) श्री.जयंतकुमार मगनलाल व्यास, गुजरात
107) बडाप्लीन वार, मेघालय

मित्रांनो आपण सर्व पद्म पुरस्कारांची नावे मराठीत देण्याचा प्रयत्न केला आहे. काही नावे इंग्रजी नावानुसार मराठीत अनुवाद केलेली आहेत. जर आपणास काही त्रुटी निदर्शणास आल्यास कमेंट करावे. आपण त्यात सुधारणा करु. माहिती स्रोत: पीआयबी दिल्ली(PIB Delhi). ज्या विद्यार्थी मित्रांना इंग्रजी मध्ये पद्म पुरस्कारांची pdf हवी त्यांनी येथे क्लीक करून डाऊनलोड करू शकता.
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!