लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विषयी स्पर्धा परीक्षेसाठी माहिती व वस्तुनिष्ठ प्रश्न | Aims Study Center

Author
By -
0

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विषयी स्पर्धा परीक्षेसाठी माहिती व वस्तुनिष्ठ प्रश्न

gk-in-marathi-about-lokmanya-Gangadhar-Tilak
Lokmanya Bal Gangadhar Tilak (photo_wikipedia)

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आजच्या लेखात आपण त्यांच्या विषयी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने माहिती पाहणार आहोत. ही माहिती कोणत्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असेल या दृष्टीने देण्याचा प्रयत्न केला आहे.  

लोकमान्य टिळकांनी सुरुवतीच्या काळात जहाल नेत्यांची भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रे, राष्ट्रीय उत्सव व राष्ट्रीय शिक्षण या माध्यमाचा वापर केला. 'केसरी व 'मराठा' या वृत्तपत्रांच्या जोडीला लोकमान्य टिळकांनीं सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव आयोजित केले. आपापसातील सर्व भेद विसरून लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात राष्ट्रीय जागृती व्हावी  हा राष्ट्रीय उत्सवांचा हेतू होता.  तत्कालीन गणेशोत्सवातील कार्यक्रमांमधून लोकांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न केले जात. 

लोकांनी कृतिशील बनण्यावर लोकमान्य टिळकांचा भर होता. हा कर्मयोग सांगण्यासाठीच मंडालेच्या कारावासात त्यांनी 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला. वंगभंगानंतर सुरु झालेली प्रभावी जनआंदोलन पाहून सरकार अस्वस्थ झाले. या आंदोलनाला पायबंद घालण्यासाठी सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकरले. अनेक वृत्तपत्रांवर निर्बंध लादल. सरकारवर टीका केल्याच्या आरोपावरून अनेक छापखाने जप्त केली. लेखकांना व संपादकांना तुरुंगांत डांबले. सरकाने जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली. लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना सहा वर्षे मंडालेच्या तुरुंगात पाठवले. लोकमान्य टिळक कारावासाची शिक्षा भोगुन सन १९१४ मध्ये भारतात आले. 

होमरूल चळवळ: होमरूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे, यालाच 'स्वशासन' म्हणतात. आयर्लंड या देशात वसाहत वादाविरुद्ध अशी चळवळ झाली होती. त्याच धर्तीवर भारतीय होमरूल चळवळीने स्वशासनाचे अधिकार ब्रिटिश सरकारकडे मागितले. अशा परिस्थिती डॉ.ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळ सुरु केली. या चळवळीला पार्श्वभूमी होती ती म्हणजे ऑगस्ट १९१४ मध्ये युरोपात पहिले महायुद्ध सुरु झाले. या युद्धाची झळ भारतालाही लागली.  

डॉ.ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी देशभर झंझावाती दौरे केले व स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोचवली. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच' असे टिळकांनी ठामपणे सांगितले. 

मॉंटेग्यू-चेम्सफर्ड कायदा-१९१९: या कायद्याने भारतात जबाबदार राज्यपद्धतीचा पाया घातला जाईल, अशी सर्वांची अपेक्षा होती; परंतु प्रत्यक्षात या कायद्याने सर्वांचीच निराशा केली. 'हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे', अशा शब्दांत लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली. स्रोत: शालेय पुस्तक इयत्ता आठवी- आधुनिक भारताचा इतिहास

या लेखात आपण सर्व माहिती ही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने घेतली आहे. नक्कीच ही माहिती तुम्हाला आगामी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असेल. पुढे काही महत्वाचे वस्तुनिष्ठ स्वरूपाची प्रश्न आणि उत्तरे दिली आहेत. हे सर्व प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत, एक दोन प्रश्न बगळता. 

लोकमान्य  बाळ गंगाधर टिळक व इतिहासाशी संबंधित महत्वाचे प्रश्न (MPSC ने विचारलेले प्रश्न) 

Q१ : शिवजयंती उत्सव महाराष्ट्रात कोणी सुरु केला ? 
⇒   बाळ गंगाधर टिळक 

Q२: सप्टेंबर १९१६ मध्ये होमरूल लीग ची स्थापना _________ यांनी केली? 
⇒ डॉ.ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक

Q३: होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरु झाली होती? 
⇒ आयलॅंड 

Q४: १९१९ मध्ये, ब्रिटिश पार्लमेंटने कोणता कायदा संमत केला. 
⇒ मॉंटेग्यू-चेम्सफर्ड कायदा

Q५: महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते? 
⇒ लोकमान्य टिळक 

Q६ :डॉ.ॲनी बेझंट व __________ यांनी होमरूल चळवळ सुरु केली? 
⇒ लोकमान्य टिळक 

Q७: १९१९ च्या मॉँट-फोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नवे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली? 
⇒ लोकमान्य टिळक 

Q८: लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेऊन त्यांना _______ वर्षे मंडालेच्या तुरुंगात पाठवले? 
⇒ ६ वर्षे 

Q९ : लोकमान्य टिळक कारावासाची शिक्षा भोगून __________ मध्ये भारतात परत आले? 
⇒ १९१४ 

Q१० : _______ च्या मॉन्टेग्यु- चेम्सफर्ड कायदयाने दिलेल्या सुधारणा असमाधारक होत्या? 
⇒ १९१९ 

Q११ : _____ ते _______ हा कालखंड भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतीळ जहाल मतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो? 
⇒१९०५-१९२०

Q१२ : लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात ___________ हा ग्रंथ लिहिला?
⇒ गीतारहस्य 

Q१३ : लोकांना कृतिशील बनवण्यावर ______ यांचा भर होता ? 
⇒ लोकमान्य टिळक 

Q१४ : औरंगजेबाने जे मुगल साम्राज्यात केले, तसेच लॉर्ड कर्झनने केले असे कोणी लिहिले? 
⇒लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 

Q१५ : ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल असे १९१७ साली ______ यांनी घोषित केले? 
⇒ मॉन्टेग्यु 

Q१६ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे कोणत्या राज्याचे होते? 
⇒ पंजाब 

Q१७: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात केंव्हा करण्यात आली? 
⇒ १९८१ 

Q१८: २०२१ चा लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे? 
⇒ सायरस पुनावाला 

Q१९: २०२२ चा लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 
⇒ डॉ. टेसी थॉमस 

Q२०: २३ जुलै १८५६ रोजी लोकमान्य टिळकांचा जन्म कोठे झाला? 
⇒ रत्नागिरी 

असाच नवं नवीन माहितीसाठी आम्हाला ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज @aimsstudycenter ला follow करा. 

दररोजच्या चालू घडामोडी प्रश्नांसाठी  आमचे टेलिग्राम चॅनेल: https://t.me/aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!