Current Affairs 2022 Question and Answer for Competitive Exam in Marathi | Aims Study Center

Current Affairs 2022 Question and Answer for Competitive Exam in Marathi

gk-current-affairs
Current Affairs 2022

सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्वाचे दहा प्रश्न उत्तर. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे चालू घडामोडी दहा प्रश्न आणि उत्तरे. स्पेशल पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त वन लायनार प्रश्नोत्तरे. कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी आणि सर्व सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, देशाच्या पातळीवरील महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी म्हटले की, चालू घडामोडी हा कोणत्या स्पर्धा परीक्षेचा आत्मा समजला जातो.

आगामी होणाऱ्या 7000 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा उपयुक्त असतील अशा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.


Current Affairs 2022 Question and Answer for Competitive Exam in Marathi



प्रश्न : भारतात जगातील सर्वात उंच कमान असलेल्या पुलाचे बांधकाम कोणत्या नदीवर पूर्ण करण्यात आले आहे?
उत्तर : चिनाब (उंची ३५९ मीटर, लांब, १.३१५ किमी)


प्रश्न : कोणता दिवस ' जागतिक ओझोन संरक्षण दिन (World Ozone Protection Day' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो ?
उत्तर : १६ सप्टेंबर


प्रश्न : भारतात तब्बल किती वर्षांनी चित्ते दिसणार आहेत ?
उत्तर : ७० वर्षांनी


प्रश्न : रॉजर फेडररने त्याच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत एकूण किती ग्रँडस्लॅम विजेतेपद स्वतःच्या नावावर केले आहेत ?
उत्तर : २० ग्रँडस्लॅम ( ऑस्ट्रेलियन ६, फेंच १, विम्बल्डन ८ आणि अमेरिकन ५ असे एकूण २०)


प्रश्न : रॉजर फेडररचे पहिले व शेवटचे ग्रॅडस्लॅम कोणते ?
उत्तर : विम्बल्डन २००३ व ऑस्ट्रेलियन ओपन- २०१८


प्रश्न : रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा टेनिसपटू आहे ?
उत्तर : स्वित्झर्लंड


प्रश्न : सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर : सौरव गांगुली


प्रश्न : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा-२०२२ मध्ये कोणते पदक पटकावले?
उत्तर : कांस्य पदक


प्रश्न : कोणता दिवस 'मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर : १७ सप्टेंबर


प्रश्न : २०२३ मध्ये होणाऱ्या G-२० शिखर संमेलनाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे असणार आहे ?
उत्तर : भारत


आपल्या मित्रांना share करायला विसरू नका...!
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon