SCO Summit 2022 | Chalu Ghadamodi Question and Answer in Marathi | Aims Study Center

SCO Summit 2022 | Chalu Ghadamodi Question and Answer in Marathi

shanghay-cooperation-organization
SCO summit 2022

एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी समरकंद येथे उपस्थित होते. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनाझेशन 2022 बद्दल वस्तुनिष्ठ प्रश्न आणि उत्तरे येथे दिले आहेत. जे सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्वाचे असतील. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे चालू घडामोडी दहा प्रश्न आणि उत्तरे देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. स्पेशल पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त वन लायनार प्रश्नोत्तरे. कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी आणि सर्व सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, देशाच्या पातळीवरील महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी म्हटले की, चालू घडामोडी हा कोणत्या स्पर्धा परीक्षेचा आत्मा समजला जातो.

आगामी होणाऱ्या 7000 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा उपयुक्त असतील अशा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

SCO Summit 2022 | Chalu Ghadamodi Question and Answer in Marathi


प्रश्न : शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनाझेशन (SCO Summit 2022) समिट २०२२ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ? 
उत्तर : समरकंद, उझबेकिस्तान 

प्रश्न : एसीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांच्या राष्ट्राध्यक्षक मंडळाच्या कितव्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते ? 
उत्तर : २२ व्या 

प्रश्न : उझबेकिस्तनाचे पंतप्रधान महामहिम कोण आहेत ? 
उत्तर : अब्दुल्ला अरिपोव्ह 

प्रश्न :सध्याचे SCO अर्थात शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनाझेशनचे महासचिव कोण आहेत ? 
उत्तर : झांग मिंग (चीन)

प्रश्न : शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनाझेशनची स्थापना केंव्हा करण्यात आली ? 
उत्तर : १५ जून २००१

प्रश्न : शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनाझेशनमध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे किती टक्के लोकसंख्या आहे ?
उत्तर : ४०% 

प्रश्न : एसीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेचे मुख्यालय कोठे स्थित आहे ? 
उत्तर : बीजिंग, चीन 

प्रश्न : शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनाझेशनचे एकूण सदस्य देश किती आहेत ? 
उत्तर : नऊ ( चीन, भारत, इराण, कझाकस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकीस्तान, उझबेकिस्तान) 

प्रश्न : SCO अर्थात शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनाझेशनचे १५ सप्टेंबर २०२२ रोजी कोणत्या देशाने सदस्यत्व स्वीकारले आहे ? 
उत्तर : इराण 

प्रश्न : शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनाझेशनचे भारत आणि पाकिस्तानने केंव्हा सदस्यत्व स्वीकारले आहे ? 
उत्तर : ९ जून २०१७ 

आपल्या मित्रांना share करायला विसरू नका !
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon