(International Yoga Day 2024) आंतरराष्ट्रीय योग दिन व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती | Aims Study Center

Author
By -
0

(International Yoga Day 2024) आंतरराष्ट्रीय योग दिन व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती

International Yoga Day 2024


Internation-Yoga-Day-2024-Theme

(toc) #title=(Table of Content)

I(caps)nternational Yoga Day 2024: आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 संयुक्त राष्ट्र संघटेनद्वारे 21 जून, 2015 पासून जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. 21 जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. त्याच प्रमाणे व्यक्तीने योगा केल्यास त्याला दीर्घ आयुष्य आणि निरोगी जीवन योगामुळे प्राप्त होते. 


(International Yoga Day 2024) आंतरराष्ट्रीय योग दिन सुरुवात: 2015



आंतरराष्ट्रीय योग दिन: पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून, 2015 ला साजरा करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day 2024) सुरु करावा म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेत 27 सप्टेंबर, 2014 रोजी योगाचे महत्त्व सांगितले होते. भारतात फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा व योग साधना ही अमूल देणं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून संयुक्त राष्ट्रने 11 डिसेंबर, 2014 ला मतदान घेतले यामध्ये 177 सदस्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रस्तवाला मंजुरी दिली होती. संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्वात कमी दिवसात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव पास झाला व आंतरराष्ट्रीय योग दिवस हा कमी कालावधीत पास झालेला हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे 90 दिवसाच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तवाला मंजुरी मिळाली.


(International Yoga Day 2024) आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जुनलाच का साजरा केला जातो?



आपण सर्वांना हा प्रश्न पडला असले कि, (International Yoga Day 2024) आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जुनलाच का साजरा केला जातो. याचे कारण असे की, 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. ज्याला उन्हाळी संक्रांती देखील म्हणून ओळखले जाते. भारतीय परंपरेनुसार उन्हाळ्याच्या संक्रांतीनगर सूर्य दक्षिणायन असतो. हा काळ आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी फायदेशीर आहे असे मानले जाते.

International Yoga Day 2024 Theme: आंतरराष्ट्रीय योग दिनाचे संकल्पसुत्र-2024:

International Yoga Day 2024 Theme: या वर्षी जगभरात 21 जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 साजरा करत आहेत. दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन वेगवेगळ्या थीमसह साजरा केला जातो. त्याच प्रमाणे याही वर्षी योग दिन, "स्वतःसाठी आणि समाजासाठी योग" (Yoga for self and Society) अशी असणार आहे. खालील तक्त्यामध्ये 2015 पासून ते आतापर्यंतच्या दरवर्षीच्या योग दिनाच्या थीम दिल्या आहेत.


International Yoga Day 2023 Theme:

आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 ची थीम वसुधैव कुटूंबकम साठी योग (Yoga for Vasydhaiva Kutumbakam) अशी होती.



आंतराष्ट्रीय योग दिन वर्ष थीम (International Yoga Day Years & Theme):

आंतराष्ट्रीय योग दिन- 2015 Yoga for Harmony and Peace
आंतराष्ट्रीय योग दिन- 2016 Connect with Youth
आंतराष्ट्रीय योग दिन- 2017 Yoga for Health
आंतराष्ट्रीय योग दिन-2018 Yoga for Peace
आंतराष्ट्रीय योग दिन-2019 Yoga for Heart
आंतराष्ट्रीय योग दिन-2020 Yoga at Home and Yoga with Family
आंतराष्ट्रीय योग दिन-2021 Yoga for Well-Being
आंतराष्ट्रीय योग दिन-2022 Yoga for Humanity
आंतराष्ट्रीय योग दिन-2023 Yoga for Vasydhaiva Kutumbakam
आंतराष्ट्रीय योग दिन-2024 Yoga for self and Society




आंतराष्ट्रीय योग दिवसाचे महत्त्व काय आहे? ( What is Importance of International Yoga Day):

योग हा भारतीय कलेचे प्रतिक आहे. योग हा भारताला पाच हजार पासून दिलेली लाभलेली देणगी आहे म्हणजेच फार पूर्वीपासून महर्षी पतंजली यांच्या पासून योग करण्याची परंपरा भारतात आहे. त्यामुळे महर्षी पतंजली यांना योगाचे जनक म्हणून ओळखले जाते. योग हा व्यक्तीला दीर्घ आयुष्य देतो, योग्य हा निरोगी आणि आनंदी जीवनाचा मार्ग आहे. भारतीय योग हा साकारात्म आणि सुदृढ जीवन जगण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि योगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा योग दिवसाचा मुख्य उद्देश आहे. नुकताच आंतराष्ट्रीय योग दिन 2024 साजरा जगभरात करण्यात आला आहे.






पहिला योग दिन कधी साजरी केला होता: (first International Yoga Day 2021)
पहिला योग दिन 21 जून 2015 साजरा करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या योग दिवस साजरा करण्याच्या भूमिकेला जगातील सर्व देशांनी सहमती दाखवली आणि 177 सदस्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. सर्व देशाचा उद्देश हाच होता की, सर्व देशातील व्यक्ती स्वस्थ राहावे. तसेच 21 जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. त्याच प्रमाणे निरंतर योगाभ्यास केल्यास व्यक्तीला दीर्घ आयुष्य लाभते. त्यामुळे या दिवसाला योग दिवसाच्या रूपाने साजरा करण्यात यावे अशा निर्णय संयुक्त राष्ट्र संघटनेतील सदस्यांनी घेतला आहे.
Image Source: United Nations
Info Source: pib.gov.in

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!