Indian Nationalized Bank List 2021| भारतातील 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण
Nationalized Bank List 2021
भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रमुख उद्देश पुढीलप्रमाणे आहेत:
1] भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे.
2] भारताची गंगाजळी राखणे.
3] भारताची आर्थिक स्थिती सुधारणे.
4] भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे
राष्ट्रीयकरण म्हणजे काय? बँकाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारकडे येते त्यास राष्ट्रीयकरण म्हणतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी करण्यात आले. तर 01 जुलै 1955 रोजी इंपिरिअल बँकेचे राष्ट्रीयकरण करून स्टेट बँक ऑफ इंडियाची (State Bank Of India) ची निर्मिती करण्यात आली.
19 जुलै 1969 रोजी राष्ट्रपतींच्या वटहुकूमाद्वारे 50 कोटी रुपया पेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या 14 बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. बँक व्यावसायिकांनी या वटहुकूमाला न्यायालयात आव्हान देऊन तो घटना बाह्य ठरविला. 14 मार्च 1970 ला नवा वटहुकूम काढण्यात आला. 31 मार्च 1970 त्याचे कायद्यामध्ये रूपांतर करण्यात येऊन पूर्वलक्षी प्रभावानुसार म्हणजेच 19 जुलै 1969 पासून लागू करण्यात आला. यामुळे 84% बँकांची जबाबदारी सरकारकडे आली.14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यासाठी हजारी समितीद्वारे राष्ट्रीयीकरणाची शिफारस करण्यात आली होती.
राष्ट्रीयकरण झालेल्या बँका पुढील प्रमाणे:
1] बँक ऑफ बडोदा
2] बँक ऑफ इंडिया
3] युनियन बँक ऑफ इंडिया
4] पंजाब नॅशनल बँक
5] इंडियन बँक
7] इंडियन ओव्हरसीज बँक
8] सेंट्रल बँक ऑफ इंडिया
9] कॅनरा बँक
10] सिंडिकेट बँक
11] युनाटेड बँक ऑफ इंडिया
12] युनाटेड कमर्शिअल बँक
13] अलाहाबाद बँक
14] देना बँक
15]बँक ऑफ महाराष्ट्र
राष्ट्रीयकरणाचा दुसरा टप्पा: 15 एप्रिल 1980 रोजी ज्या बँकाच्या ठेवी 200 कोटी रुपये पेक्षा अधिक असतील अशा सहा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्या बँका खालीलप्रमाणे आहेत.
1] आंध्र बँक
2] विजया बँक
3] कॉर्पोरेशन बँक
4] ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
5] पंजाब अँड सिंध बँक
6] न्यू बँक ऑफ इंडिया
1980 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आलेली बँक न्यू बँक ऑफ इंडियाचे 1993 ला पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आले. 2005 मध्ये IDBI बँक लिमिटेड या बँकेचे सार्वत्रीकरण करण्यात आले.
If You have Doubts, Please Let Me Know