13 वी ब्रिक्स शिखर परिषद नवी दिल्ली, करोनामुळे डिजिटल माध्यमातून संवाद | Aims Study Center

13 वी ब्रिक्स शिखर परिषद नवी दिल्ली, करोनामुळे डिजिटल माध्यमातून संवाद

online-13th-brics-summit
13th BRICS SUMMIT, NEW DELLI

13 वी ब्रिक्स शिखर परिषद नुकतीच नवी दिल्ली येथे(व्हर्च्युल)पार पडली. 2021 ब्रिक्सच्या भारताच्या अध्यक्षतेचा भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षपद भूषविले होते. या वेळी आभासी स्वरूपातील 13 व्या ब्रिक्स परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र मोदी होते, तर ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलेसनरो, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सायरील रामाफोसा उपस्थित होते. भारताचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल, न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष मारकोस ट्रायजो, ब्रिक्स व्यवसाय परिषदेचे अस्थायी अध्यक्ष ओंकार कंवर आणि ब्रिक्स महिला व्यवसाय आघाडीच्या अस्थायी अध्यक्ष डॉ. संगीता रेड्डी शिखर परिषदे दरम्यान नेत्यांना त्याच्या क्षेत्राशी संबंधित त्याअंतर्गत या वर्षी पाठविलेल्या निकालांचे अहवाल सादर कारणात आहेत.



13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे बोधवाक्य? शिखर परिषदेचे बोधवाक्य: BRICS@15: सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीची आंतर-ब्रिक्स सहकार्य (BRICS@15: Intra- BRICS Co-operation for Continuity, Consolidation and Consensus) असे आहे.


भारताने अध्यक्षतेच्या काळासाठी पुढील रूपरेषा मांडली:
1] बहुक्षेत्रीय प्रणालीतील सुधारणा
2] दहशतवाद विरोध
3] SDGs शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान साधनांचा वापर करणे
4] व्यक्तींमधील परस्पर संबंध दृढ करण्यासाठी एक्सचेन्ज प्रोग्रॅमचा वापर करणे

भारताकडे आतापर्यंत तीन वेळा ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद: भारताकडे आतापर्यंत तीन वेळा ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. वर्षे 2012, वर्षे 2016 आणि वर्षे 2021, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत दोन वेळा (वर्षे 2016 आणि वर्षे 2021) ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. 


मागच्या 15 वर्षात ब्रिक्स देशांनी चांगली कामगिरी केली आहे. आज आपण जगाच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावी आवाज आहोत. विकसनशील देशांच्या प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मंच उपयुक्त ठरला आहे. पुढील 15 वर्षात ब्रिक्स अधिक उत्पादनक्षम असेल याची खात्री आहे. ब्रिक्सने प्रथमच 'काउंटर टेररिज्म ऍक्शन प्लान ' स्वीकारला आहे", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

13 व्या ब्रिक्स परिषदेतून पुढील गोष्टी सध्या होण्यास मदत होत आहे: 
1) ब्रिक्स दहशतवादाविरोधात कृती आरखडा स्वीकार
2) रिमोट सेन्सिंग उपग्रह संरचना संदर्भात करार
3) सीमाशुल्क विभागांच्या सहकार्याने- ब्रिक्समधील आंतर-व्यापार सुलभ होण्यास मदत.
4) आभासी माध्यमातून ब्रिक्स लसीकरण संशोधन
5) विकास केंद्र सुरु करण्यात एकमत
6) हरित पर्यटनाबाबत ब्रिक्स आघाडी इत्यादी.
स्रोत: https://pib.gov.in/
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon