MPSC Combine Exams 2021: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2021 | Aims Study Center

Author
By -
0

MPSC Combine Exams 2021: महाराष्ट्र  दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2021

mpsc-combine-recruitment-2021

Combine Exams 2021

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण ६६६ पदांच्या भारतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२१ करिता पुढील पदांसाठी सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी एकूण ६६६ पदांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त परीक्षा-२०२१, शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी, २०२२ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरीतासाठी https://mpsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरीतासाठी अधिकृत संकेतस्थळ:https://mpsc.gov.in
प्रस्तुत भरावयाच्या विविध संवर्गातील पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

१) सहायक कक्ष अधिकारी- १०० पदे

२) राज्य कर निरीक्षक- १९० पदे

३) पोलीस उपनिरीक्षक- ३७६ पदे

वेतनश्रेणी: एस-१४, रुपये ३८६००-१२२९०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
 
वयोमर्यादा: १ फेब्रुवारी २०२१ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे (सहायक कक्ष अधिकारी व राज्य कर निरीक्षक) तर पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी किमान १८ वर्षे ते कमाल ३१ वर्षे. (राज्य शासनाने मागासवर्गीयच्या वयोमर्यादेतील घालून दिलेल्या शिथिलतेनुसार त्या संवर्गातील उमेदवारांना त्याचा बेनेफिट्स मिळेल) (Note : विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.)

शैक्षणिक अहर्ता: १) सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अहर्ता. २) पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील, परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरिता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकरण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. ३) अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्विकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे. ४) मराठी भाषचे ज्ञान आवश्यक.
 
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी विकल्प नमूद करणाऱ्या उमेदवारांकडे उपरोक्त अहर्तसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अहर्ता असणे आवश्यक आहे.
पुरुष :
I) उंची १६५ से.मी. (अनवाणी) कमीत कमी
II) छाती न फुगविता ७९ से.मी. फुगविण्याची क्षमता ५ से.मी. आवश्यक
महिला:
(I) उंची १५७ से.मी. (अनवाणी) कमीत कमी

शुल्क (रुपये): अमागास - रु. ३९४ । मागासवर्गीय /आ.दु.घ./अनाथ - रु. २९४
 
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2021
Events Combine Exam Recruitment 2021
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक29 ऑक्टोबर 2021
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक19 नोव्हेंबर 2021
पूर्व परीक्षा दिनांक (Tentative)26 फेब्रुवारी 2022
परीक्षा केंद्र 37 जिल्ह्या केंद्रांवर 
अधिकृत वेबसाईट (जाहिरीतीसाठी)https://mpsc.gov.in/
ऑनलाईन अर्जासाठी लिंकApply Now
अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरीसाठी MPSC च्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या: https://mpsc.gov.in/
अशाच नवनवीन Update साठी दररोज डिजिटल प्लॅटफॉर्म एम्स स्टडी सेंटर या स्पर्धा मंचाला भेट द्या. माहिती स्रोत: https://mpsc.gov.in/


आपल्या प्रत्येक मित्राला SHARE करा. ट्विटर | फेसबुक । व्हाट्सअँप । इंस्टाग्राम
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!