10 General Knowledge of Indian Constitution in Marathi | भारतीय संविधान सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
Indian Constitution
एमपीएससी गट-क, लिपिक टंकलेखक, तलाठी,पोलीस भरती, ग्रामसेवक, पोलीस पाटील व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे भारतीय संविधान (10 General Knowledge of Indian Constitution in Marathi) वर आधारित उपयुक्त असे प्रश्न आणि उत्त रे. परीक्षा कोणतेही असो त्यामध्ये सामान्य ज्ञान (gktoday in marathi) आणि चालू घडामोडी या घटकावर प्रश्न नेहमीच विचारले जातात. त्यामुळे आगामी होणाऱ्या पोलीस भरती तलाठी या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने उपयुक्त असे दहा महत्वाचे सामान्य ज्ञान ( General knowledge Questions) प्रकाशित करीत आहोत.
सामान्य ज्ञान हे प्रश्न भूगोल, इतिहास, नागरिकशास्त, सामान्य विज्ञान, राज्यशास्त्र या सर्व विषयावर आधारित प्रश्न असतात. आज फक्त भारतीय संविधान (Indian Constitution) या विषयावर 10 प्रश्नोत्तरे देणार आहोत.
एम्स स्टडी सेंटर या ऑनलाइन स्पर्धा मंचावर चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, पोलीस भरती, तलाठी भरती, म्हाडा लिपिक, आरोग्य भरती व एमपीएससी या स्पर्धा परीक्षासंबंधित नियमित सराव प्रश्नसंच पब्लिश करीत असतो. आपण मोफत सराव प्रश्न सोडविण्यासाठी https://aimsstudycenter.blogspot.com या ब्लॉगर वेबसाईटला नियमित भेट द्या.
भारतीय संविधान सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे । Top 10 General Knowledge(Indian Constitution)
Q1: भारतीय संविधानामध्ये, उच्च न्यायालये कोणत्या अनुच्छेदांतर्गत विशेष आदेश जारी करतात?
(1) अनुच्छेद-220 (2) अनुच्छेद- 221 (3) अनुच्छेद-213 (4) अनुच्छेद-226
Q2: महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली, ती सध्याच्या राज्य सरकारने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे?
(1) वसंतराव नाईक समिती (2) बोंगीरवार समिती (3) बाबुराव काळे समिती (4) पी.बी.पाटील समिती
Q3: भारतीय राज्यघटनेत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्त्व कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतले आहेत?
(1) ब्रिटिश (2) अमेरिका (3) रशियन (सोव्हिएट) (4) आयर्लंड
Q4: भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेदानुसार, संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते.
(1)अनुच्छेद-1 (2) अनुच्छेद-2 (3) अनुच्छेद-3 (4) अनुच्छेद-4
Q5: राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या मुख्यमंत्र्यांसह एकूण सदस्य संख्येच्या टक्क्यापेक्षा जास्त असता कामा नये?
(1) 12% (2)15% (3) 18% (4) 10%
Q6: राज्य विधानसभेच्या तरतुदी कलम 168 ते 212 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात देण्यात आल्या आहेत?
(1) भाग III (2) भाग IV(3) भाग V (4) भाग VI
Q7: भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विसदनीय विधानसभा नाही?
(1) कर्नाटक (2) महाराष्ट्र (3) आंध्र प्रदेश (4) मध्य प्रदेश
Q8: भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम कोणत्या साली झाली?
(1) 1861 (2) 1862 (3)1919 (4) 1935
Q9: खालीलपैकी कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे?
(1) अमेरिका-कॅनडा (2) भारत-जपान (3) अमेरिका-फ्रान्स (4) ब्रिटन-आयर्लंड
Q10: महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत सरपंचाच्या कारकिर्दीच्या पहिल्या ____________ वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही?
(1) दोन वर्षात (2) अडीच वर्षांत (3) अखेरच्या वर्षात (4) चार वर्षात
भारतीय संविधान सामान्य ज्ञान 10 प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे:
प्रश्न | Q1 | Q2 | Q3 | Q4 | Q5 | Q6 | Q7 | Q8 | Q9 | Q10 |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
उत्तर | 4 | 4 | 3 | 3 | 2 | 4 | 4 | 2 | 2 | 1 |
Nice test questions
ReplyDelete