PMC Recuruitment 2022 Apply Online। पुणे महानगरपालिकेत विविध संवर्गातील पदे भरण्याकरिता ऑनलाइन अर्ज सुरु | Aims Study Center

PMC Recuruitment 2022 Apply Online। पुणे महानगरपालिकेत विविध संवर्गातील पदे भरण्याकरिता ऑनलाइन अर्ज सुरु 

pmc-recruitment-2022-apply-online
 PMC Recuruitment 2022

PMC Recruitment 2022: पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील वर्ग-2 व वर्ग-3 या संवर्गातील एकूण 444 रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पुणे महारानगरपालिका (PMC Recuruitment 2022 Apply Online) आस्थापनेवरील विविध संवर्गातील पदाची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर (www.pmc.gov.in) दिनांक 19 जुलै 2022 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छूक व पात्रता धारक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा दिनांक 20 जुलै 2022 ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधी दरम्यान (www.pmc.gov.in) या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज जाऊन अर्ज भरू शकता.
अधिकृत संकेतस्थळ: https://pmc.gov.in


PMC Recuruitment 2022: प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशाकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक व विधिसेवेतील आहेत. जाहिरात क्रमांक- 1/398 नुसार वरील विविध पदे भरण्यात येणार आहेत.पुणे महानगरपालिकेत सरळसेवेने भरावयाची पदे यांचा तपशील खालीलप्रमाणे दिला आहे.

PMC Recuruitment 2022। पुणे महानगरपालिकेत सरळसेवेने भरावयाची पदे यांचा तपशील:
1) सहायक विधी अधिकारी (श्रेणी-2)- एकूण पदे 4
2) लिपिक टंकलेखक (श्रेणी-2) एकूण पदे 200
3) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3) एकूण पदे 135
4) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (श्रेणी-3) एकूण पदे 5
5) कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) (श्रेणी-3) एकूण पदे 4
6) सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (श्रेणी-3) एकूण पदे 100

उमेदवारांची पात्रता:
1) उमेदवार भारतीय नागरिक असावा

1) सहायक विधी अधिकारी (श्रेणी-2):
A) मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी.
B) शासकीय/निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेकडे न्यायालयीन कामाशी संबंधित पदावरील कामाचा किमान 5 वर्षाचा अनुभव
C) किंवा सत्र न्यायालयातील 3 वर्षे वकिलीचा अनुभव


2) लिपिक टंकलेखक (श्रेणी-2)
A) एस.एस.सी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अहर्ता
B) राज्य शासनाची मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.(GCC) किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि परीक्षा उत्तीर्ण
C) MH-CET संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे
D) मराठी बोलता, लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.


3) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3):
A) मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदवी/पदविका असणे आवश्यक आहे.
B) अभियांत्रिकी कामाचा 3 वर्षाचा अनुभव असावा.

4) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (श्रेणी-3)
A) मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी/ऑटोमोबाइल शाखेची पदविका उत्तीर्ण असावा.
B) किमान 5 वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असावा.


5) कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन):
A) मान्यता प्राप्त विद्यापीठाची B.E (स्थापत्य) किंवा बी.टेक (स्थापत्य) किंवा बी. आर्किटेक्चर व इतर तत्सम


6) सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (श्रेणी-3)
A) माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अहर्ता.
B) शासनाकडील सर्व्हेअर कोर्स अगर सब ओव्हरसिअर कोर्स किंवा अथवा तत्सम कोर्स उत्तीर्ण
C) सर्व्हेअर कामाचा 5 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य (अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी)

वयोमर्यादा: मागास :38, वर्षे अमागास: 43 वर्षे, दिव्यांग माजी सैनिक- 45 वर्षे, अंशकालीन उमेदवार 55 वर्षे

परीक्षा शुल्क:
1) खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी 1000/-
2) मागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी 800/- 
3) माजी सैनिकांसाठी शुल्क माफ राहील
 
 PMC Recuruitment 2022।पुणे महानगरपालिका अर्ज भरण्यासंबंधित माहिती
तपशील  दिनांक  
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचा दिनांक 20 जुलै 2022
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 10 ऑगस्ट 2022
पुणे महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळ www.pmc.gov.in
ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांकपरीक्षेच्या 7 दिवस आधी 
ऑनलाइन परीक्षेचा दिनांक ऑगस्ट/सप्टेंबर 2022 (संभाव्य)
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ www.pmc.gov.in
उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना: इच्छूक व शैक्षणिक अहर्ता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून www.pmc.gov.in या संकेतस्थळावर Recruitment या tab मध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon