Current Affairs in Marathi | सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्वाचे चालू घडामोडी 2022 प्रश्न उत्तर | Aims Study Center

Current Affairs in Marathi | सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्वाचे चालू घडामोडी 2022 प्रश्न उत्तर

easy-chalu-ghadamodi-questions
Easy Current Affairs 2022

सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्वाचे दहा प्रश्न उत्तर. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे चालू घडामोडी दहा प्रश्न आणि उत्तरे. स्पेशल पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त वन लायनार प्रश्नोत्तरे. कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी आणि सर्व सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, देशाच्या पातळीवरील महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी म्हटले की, चालू घडामोडी हा कोणत्या स्पर्धा परीक्षेचा आत्मा समजला जातो.

आगामी होणाऱ्या 7000 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा उपयुक्त असतील अशा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.


चालू घडामोडी प्रश्न उत्तर | सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्वाचे घडामोडी 2022 प्रश्न उत्तर

प्रश्न : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) धर्तीवर महाराष्ट्रात कोणती योजना लागू करण्यात येणार आहे ? 
उत्तर : मुख्यमंत्री किसान योजना 

प्रश्न : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोठे करण्यात आले ? 
उत्तर : मॉस्को, रशिया 

प्रश्न : आशियाई चित्ता भारतातून कोणत्या वर्षी विलुप्त झाल्याचे घोषित करण्यात आले होते ? 
उत्तर : वर्षे १९५२ 

प्रश्न : भारतात कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे ? 
उत्तर : मध्य प्रदेश 

प्रश्न : ग्रेट नोएडा येथे जागतिक दुग्ध व्यवसाय शिखर परिषद-२०२२ चे उदघाट्न कोणाच्या हस्ते करण्यात आले ? 
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

प्रश्न : 'गोट पॉक्स' हे कशाशी संबंधित आहे ? 
उत्तर : गुरांची लस 

प्रश्न : 'फ्रेंच न्यू वेव्ह'चे प्रणेते अशी ओळख प्रस्थापित करणारे विख्यात दिग्दर्शक ज्याँ-लूक गोदार यांनी कोणत्या साली ऑस्कर अकादमीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला असता त्यांनी तो पुरस्कार नाकारला ? 
उत्तर :वर्षे २०१०

प्रश्न : कोणता दिवस जगभरात 'आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो? 
उत्तर : १५ सप्टेंबर 

प्रश्न : यूएस ओपन (US Open 2022) टेनिस स्पर्धेचे पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकणारा कार्लोस अल्कराझने अंतिम फेरीत कोणाचा पराभव केला ? 
उत्तर : कॅस्पर रुड (नॉर्वे)

प्रश्न : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला किती हजार रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे ? 
उत्तर : १२,०००/ रु.     

आपल्या जवळच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना share करा...!
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon